८
रोहिणी तिचं नाव होतं. ती हिंदू होती व तिचा विवाह केशरशी झाला होता. काही दिवस त्यांचं चांगलं पटलं होतं. परंतु काही दिवसानंतर त्यांच्यात धर्मावरुन वाद होत होते. केशरचं म्हणणं होतं की रोहिणीनं मुस्लिम पद्धतीनं वागावं. तिनं हिंदूंच्या पुर्ण चालीरीती सोडून द्याव्यात. तसं पाहिल्यास रोहिणीनं बऱ्याच गोष्टी परिस्थितीवश जुळवून घेण्याचा प्रयत्न केला होता. तिनं मस्तकावर टिळा लावणं सोडून दिलं होतं. तसं तिनं आपलं नावही बदलवून शाहीन खान ठेवलं होतं. तो बुरखा तिला सहन होत नसतांनाही तिनं बुरख्याचा स्विकार केला होता व ती नाईलाजास्तव का होईना, बुरखा वापरत होती.
आज शाहीन त्याच्याजवळ नव्हती. जेव्हा दंगा झाला होता. त्याचं कारण होतं. त्यांचं मराठ्यांना व हिंदूंना शिव्या हासडणं. केशर नेहमी तिच्यासमोर तिच्या देवाधर्माची टिंगल टवाळकी करीत असे. तिच्यासमोर तिनं मुस्लिम बनावं याचा नेहमी तकादा लावत असे. त्यातच तो मराठेशाहीलाही दुषणे लावत असे.
शाहीनला वाटत होतं, केशरनं तिला काहीबाही वैयक्तीकपणे बोललं तरी चालेल. तिनं त्याच्या बोलण्याचं दुःख पचवून टाकलं होतं. परंतु जेव्हा केशर तिला तिच्या धर्माबद्दल बोलत होता. तेव्हा मात्र तिच्या मस्तकाचा पारा वाढत असे. आज त्याच गोष्टीचा ध्यास घेवून ती जगत होती. सर्व मृगजळ अंगात अगदी लपवून ठेवून.
आज तो तिला तेच बोलला होता. तिला त्यानं ताराबाईवरुन काहीतरी म्हटलं होतं. तशी ताराबाई शाईनची आदर्श होती. तिला वाटत होते की जर ताराबाईनं सन सतराशेव्या शतकात महाराष्ट्राची सत्ता आपल्या हातात घेतली नसती तर कदाचीत औरंगजेबाचा एकछत्री अंमल महाराष्ट्रातही निर्माण झाला असता व औरंगजेब हा धर्मवेडा असल्यानं चित्र काहीसं वेगळंच झालं असतं. कदाचीत महाराष्ट्रच नाही तर संपुर्ण भारतातील जनता मुस्लिम झाली असती. कदाचीत धर्मवेड्या औरंगजेबानं देशातील जनतेला मुस्लिममय करुन टाकलं असतं. त्यासाठी त्यानं जसे कवी कलश व संभाजी महाराजांचे हालहाल केले. तसेच हालहाल हिंदू जनतेचेही केले असते.
औरंगजेब...... ज्याचा दरारा संपुर्ण हिंदुस्थानात होता. ज्याला आलमवीर बनायचे होते. परंतु महाराष्ट्रातील जनतेनं त्याला दाखवलं की हा महाराष्ट्र आहे. आम्ही तुला आलमवीर बनू देणार नाही. तसे शिवाजी महाराज मरण पावताच औरंगजेबाला वाटलं की आता माझी आलमवीर बनायची वाट मोकळी झाली. हे मराठे काय लागले माझ्यासमोर. मी आता दक्षिणेत जातो आणि यांना संपवूनच परत येतो. तसा तो दक्षिणेत आला आणि सोबत फार मोठा लष्करी साठा होता आणि सैन्यही विशाल होते. परंतु त्याच्या सैन्यांना महाराष्ट्रातील सह्याद्री घाटातील चोरवाटांची माहिती नव्हती.
मुहीउद्दीन मुहम्मद, हिंदुस्थानावर राज्य करणारा सहावा सम्राट. म्हणतात की त्यानं बादशाहा अकबरापाठोपाठ सर्वात जास्त वर्ष हिंदुस्थानावर राज्य केलं होतं. त्यानं आपलं राज्य साडे बारा लाख मैलापर्यंत पसरवलं होतं.
औरंगजेब हा शहाजहान व मुमताजमहल यांचा सहावा मुलगा होता. मुलांमध्ये तो तिसऱ्या क्रमांकाचा. त्याचा जन्म गुजरात इथे झाला. त्याचे वडील त्याचा जन्म झाला तेव्हा गुजरातचे सुभेदार होते. मुघल प्रथेच्या नुसार शहाजहानने औरंगजेबाला दक्षिणचा सुभेदार बनवले. शहाजहानने त्याला दक्षिणेतील सुभेदार बनवताच तो खडकीला आला. ज्या खडकीचं नामाभिधान औरंगजेबानं औरंगाबाद केलं होतं. जे आता बदलून संभाजीनगर झालं आहे. सन १६३७ मध्ये औरंगजेबानं रबिया दुर्रानीशी विवाह केला होता.
औरंगजेबाची एक फार मोठी महत्वाकांक्षा होती, आलमवीर बनायची. त्याला त्याचा एक भाऊ मोठा असल्यानं शहाजहानने मुघल प्रथेनुसार मुघल दरबारातील कामकाज त्याच्या स्वाधीन केले. त्यानंतर औरंगजेबाची एक बहिण एका दुर्घटनेत मरण पावली. त्यावेळेस औरंगजेब थोडा उशिरा आग्ऱ्याला आला असता त्याचे वडील शहाजहानने त्याचेवर क्रोध दर्शवला. त्यावेळेस शहाजहानने त्याला दक्षिणेतील सुभेदार पदावरुन पदच्यूत केले.
वडीलांनी औरंगजेबाला दक्षिणेतील सुभेदार पदावरुन पदच्यूत करताच तो थेट बाहेर पडला. पुढे तो सात महिनेपर्यंत दरबारातच आला नाही. त्यानंतर जेव्हा तो दरबारात परतला. तेव्हा वडीलांना आनंद झाला. वडील शहाजहाननं त्याला गुजरातचे सुभेदार नियुक्त केले. त्यानं त्यावेळेस चांगले काम केल्याने त्याला उत्तर अफगानिस्तानची सुभेदारी मिळाली होती. त्यापाठोपाठ लवकरच त्याला मुल्तान आणि सिंधचेही सुभेदार बनविण्यात आले. त्यानंतर परत त्याला दक्षिणेतील सुभेदार बनविण्यात आले. त्यातच गोवळकोंडा आणि विजापूर मध्ये लढत असतांना ऐन मोक्याचे वेळेस शहाजहानने आपली सेना परत बोलावताच त्याला आपल्या वडीलाचाच राग आला, त्याचबरोबर त्याला आपला मोठा भाऊ दारा शिकोहचाही राग आला. त्याचं कारण होतं, विजापूर आणि गोवळकोंड्याच्या लढाईत ऐन निर्णायक वेळेस सेना परत बोलावणे. ती सेना त्याचाच मोठा भाऊ दारा शिकोहच्या म्हणण्यानुसार शहाजहाननं परत बोलावली होती. त्यातच तो वडीलांवरच भडकला. इथूनच औरंगजेबाच्या मनात नकाराची व तिरस्काराची बीजं रोवली गेली.
शहाजहान एकदा फारच आजारी पडले होते. लोकांचा शहाजहानचा अंत जवळपास आल्यासारखेच वाटत होते. त्याचवेळेस आलमवीर बनण्याची स्वप्न पाहणारा औरंगजेब. त्याच्या मनात सेना परत बोलावण्याच्या घटनेपासूनच आपल्या वडीलांच्या बाबत असुया निर्माण झाली होती. त्यातच दारा शिकोहबाबतही असुया निर्माण झाली होती. शहाजहानला आजारी पाहून त्याचा एक भाऊ शाहशुजाने स्वतःला बंगाल प्रांताचे राज्यपाल घोषीत केले होते. असे असले तरी औरंगजेबानं आपल्या वडीलाच्या आजारपणात त्यांना आगरा येथे नजरकैदेत ठेवले. त्याचबरोबर त्यांना बंदीही बनवले होते. त्याचवेळेस त्यानं स्वतःला शहाजहाननंतर राज्याचा वारस जाहीर करुन टाकलं. शिवाय दारा शिकोहवर अविश्वास प्रस्ताव आणून त्याला फाशी देण्यात आली.
औरंगजेबाची हिंदू नीती ही अतिशय वाईट होती. बादशाहा अकबरानं काढून टाकलेला जिजिया कर त्यानं पुन्हा परत आणला. जो कर हिंदूंसाठी घातक होता. त्यानंच पुढे शरिया कायदा आणला व पुर्ण साम्राज्यासाठी इस्लामी शासनाची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिलेत. शिवाय मंदीर तोडण्यासारख्या कृती केल्याचे संकेत मिळतात.
शाहीनला औरंगजेबाचा हाच इतिहास माहीत होता. त्यामुळंच तिला औरंगजेबाचा राग येत होता. परंतु तसा राग केशरला येत नव्हता. कारण त्यानं कुठंतरी वाचलं होतं की औरंगजेबाच्या शासनकाळात सर्वात जास्त हिंदू हे औरंगजेबाच्या सैन्यात कार्यरत होते व त्यांना मानाच्या जागा होत्या. त्यातच मोठमोठ्या पदावर राजपूत असून ज्यात हिंदूंशी लढाया होत, त्यावेळेस सेनापती पद हे औरंगजेबाच्या शासनात नियुक्त असलेल्या राजपूतांनाच मिळत असे.
शाहीन व केशरमध्ये औरंगजेबावरुन जेव्हा वादविवाद होत असे. तेव्हा ती त्याला म्हणत असे की औरंगजेब हा त्याच्या शासनकाळात हिंदू आणि शिखाविरोधी काम करीत असे. मात्र यावर केशर तिला म्हणत असे की औरंगजेब हा अतिशय चांगला होता व तो स्वतः स्वाभिमानी होता. ज्यात तो स्वतःचा उदरनिर्वाह स्वतःच करीत असे. तो कुराणाची नकल करीत असे व टोप्या शिवून आपला उदरनिर्वाह करीत असे.
त्यांचा वादविवाद हा नित्य चालत होता. कधी हिंदूंची बाजू घेवून शाहीनचं वक्तव्य केशरला छळत होतं तर कधी औरंगजेबाची बाजू घेणारा केशर बोलत असल्यानं तिच्या रागाचा पारा वरखाली होत असे. अशातच केशर तिला म्हणू लागला.
"माहीत आहे तुला. नसेल माहीत तर माहीत कर. औरंगजेबानं अफूची शेती करण्याची प्रथा बंद केली होती. सतीप्रथाही बंद केली होती. ज्यात तुलादान प्रथेचाही समावेश होता."
शाहीननं ते ऐकलं. तशी ती म्हणाली, " तो जर चांगला होता तर त्यानं हिंदूंचे सण उत्सव का बरं बंद केलेत? हे कार्य १६६८ मध्ये घडलं. तसंच त्यानं सन १६९९ मध्ये हिंदू मंदीरं तोडण्याचे आदेश का दिलेत? त्यानंच १६६९ मध्ये बनारस येथील विश्वनाथ मंदिर तोडलं. तसंच मथुरा येथील केशव राय मंदीर तोडलं."
केशर ते सगळं ऐकत होता. त्यालाही ती सांगत असलेल्या गोष्टी पटत नव्हत्या. तसा तो त्यावर तोड देत औरंगजेबाचं एक एक पिल्लू सांगत होता. म्हणत होता,
"औरंगजेबानं परिवहन कर रद्द केला होता. चुंगी कर अर्थात पानडारी कर बंद केला होता. त्यानं ८० कर बंद केले होते. हे सर्व जनतेच्या फायद्यासाठीच केले होते."
केशरचं ते बोलणं. त्यानंतर शाहीन म्हणाली,
"त्यानं बऱ्याच हिंदूंना मुसलमान बनवलं हे खोटं आहे काय? त्यानं महाराज संभाजीचे हालहाल करुन मारले हे खोटं आहे काय? त्या काळातील कविता तरी आपण वाचल्या काय की ज्यात औरंगजेबाच्या अत्याचाराची माहिती मिळते. माहीत आहे, ज्या महाराज अकबरानं जिजीया कर रद्दबादल केला. त्याच जिजीया कराला औरंगजेबानं आणलं. हे योग्य होतं काय? तो कर, जो मुस्लिम लोकांसाठी बांधील नव्हता. तो कर फक्त गैरमुस्लिम लोकांसाठीच बांधील होता. हा कर सामान्य लोकांच्या मिळकतीतून वसूल केला जायचा."
"हे सगळं बरोबर आहे. परंतु त्यानं या करातून बेरोजगार, शारीरिक दृष्ट्या अशक्त, गरीब यांना वगळलं होतं. जे धनीक होते, त्यांच्याजवळूनच ते कर वसूल करीत असत. तसा आदेशच होता."
"परंतु मला म्हणायचं आहे की तो कर गैरमुस्लिमांकडूनच का? मुस्लिमांकडून का बरं वसूल केल्या जात नसे."
शाहीनचं ते बोलणं. त्यावर काहीवेळ केशर चूप होता. त्यानंतर काही वेळानं तो बोलला.
"मुस्लिमांवरही एक कर होताच ना. ज्याला जकात कर म्हणत. तो कर प्रत्येक श्रीमंत मुस्लिमांना द्यावा लागत असे. तसं पाहिल्यास ब्राम्हण आणि अधिकारी वर्गाला हा कर नव्हताच."
"तेच तर मला म्हणायचंच की त्या जिजिया करात असं काय होतं की ज्या करातून मुस्लिम, ब्राम्हण व अधिकारी सोडले होते औरंगजेबानं. असा भेदभाव का केला होता त्यानं? याचाच अर्थ असा की जिजीया कर हा पक्षपाती कर होता आणि तो आधुनिक काळातील राष्ट्र, धर्म, आणि जातीच्या आधारात बसत नाही. आज आपण जात, धर्म व राष्ट्र असा भेद करीत नाही तसा. त्यामुळंच माझं म्हणणं आहे की औरंगजेबाच्या काळातील व्यवस्था ही अराजकतेचीच दिसून येते."
शाहीन बोलत होती व केशरचं डोकं भन्नावत होतं. अशातच तिच्या बोलण्यानं भडकलेला केशर म्हणाला,
"तुमचे मराठे कर घेत नव्हते असं तुला म्हणायचं आहे का? त्यांचीही व्यवस्था अशीच होती. तेही मुस्लिमांकडून जकात कर वसूल करायचे. त्यातच ते हिंदूंकडून कर वसूल करीत नसत. माहीत आहे, औरंगजेबानं मंदीर विध्वंश केला. काय गरज होती मंदीर विध्वंश करायची? आमच्या हिंदूंची मंदीरं विध्वंश केली त्यांनी. स्वतःच्या धर्माला राजाश्रय देण्यासाठी. हे कितपत बरोबर आहे?"
"तू म्हणते की मंदीर विध्वंश केली. बरीच मंदीरं विध्वंश केली. परंतु माहीत आहे का ती मंदीरं का बरं उध्वस्त केली. त्या मंदीरात व्याभिचार चालायचा पुजारी व सामंत वर्गाकडून. ती मंडळी कौमार्य व सुंदर मुलींना देवदासी बनवत. ज्यात मंदिरातील देवांसाठी वाहिलेली सुंदर मुलगी भोगत असत मंदिरातील पंडे. हे माहीत आहे का तुला? ते औरंगजेबाला सहन झालं नसेल. म्हणूनच त्यांनी अशी मंदीरं तोडली की ज्या ठिकाणी असा विध्वंश चालायचा."
"असं होवूच शकत नाही. अहो, ज्या औरंगजेबानं शिख गुरु तेगबहादुरला सोडलं नाही. त्याला आपला धर्म बदलवून मुस्लिम करु पाहिलं. तसंच ज्या औरंगजेबानं त्यांचे नातू फतेहसिंग, सरबजीत, जोरावर व दिलावरला सोडलं नाही. बिचारे सात आठ वर्षाचे असतांनाही ठार केलं. त्या औरंगजेबाकडून चांगल्या गोष्टीची कशी अपेक्षा करता येवू शकते."
शाहीन व केशरचं संभाषण. तिला मराठे वीर वाटायचे तर त्याला त्याचा धर्मीय बादशाहा प्रिय वाटायचा. अशातच केशर म्हणाला,
"अगं तुलाही माहीत नसेल की औरंगजेबानं काही मंदीरं सुद्धा बांधली. ज्यात इलाहाबाद मधील सोमेश्वर नाथ महादेव मंदीर. गुवाहाटी येथील उमानंद मंदीर, चित्रकुट येथील बालाजी मंदीर व बनारस येथील जंगम बाडी मठ यांचा समावेश आहे. तू जर म्हणते की औरंगजेबानं मंदीरं तोडली तर ही मंदीरं का बांधली असावीत?"
"ती लोकांची सहानुभूती मिळविण्यासाठी बांधलीत."
"हे बघ, तू आमच्या औरंगजेबावर लांच्छन लावू नकोस. माहीत आहे, त्या तुमच्या संभाजीला तुमच्याच लोकांनी मारलं. औरंगजेबानं नाही. तुमच्याच लोकांनी पकडून दिलं."
"हा सर्व बहाणा आहे आमच्या मराठेशाहीला बदनाम करण्याचा. आमच्या संभूराजाला आमच्या मराठेशाहीनं मारलं नाही. परंतु आपली कृती ही साप गेल्यावर लाठी मारण्यासारखीच आहे. आमच्या मराठेशाहीला बदनाम करणारी कृती आहे."
"तुझं म्हणणं खरं आहे. परंतु मला सांग, संभूराजे जेव्हा सापडले. तेव्हा तब्बल चाळीस दिवसपर्यंत मराठ्यांनी त्यांना सोडविण्याचा प्रयत्न का केला नाही? का अटकेत ठेवलं बादशाहाच्या? एवढंच नाही तर तुमच्या संभूराजांना एक फेब्रुवारीला पकडल्यावर पंधरा दिवस लागलेत बहाद्दरगडावर जायला. त्या कालावधीत मराठे एवढे पराक्रमी असूनही त्यांना का सोडवलं नाही तुमच्या मराठ्यांनी? का गाफिल राहिले रायगडावर? याउलट तुमच्याच मराठ्यांनी तुमचाच राजा असलेल्या राजारामाला गादीवर बसवलं? याचाच अर्थ असा की तुम्ही औरंगजेबासमोर पर्यायच मोकळे करुन दिलेत की आम्हा मराठ्यांना आमचा राजा सापडला. आम्हाला संभूराजांचा काही उपयोग नाही. मारा त्याला आणि ते तुमचे संताजी अन् धनाजी काय करीत होते? तुम्हाला मोठा गर्व आहे ना त्यांचा. अन् काय मागितलं होतं बादशाहानं त्यांना. धर्मबदल, खजिना कुठं लपवला ते आणि दोनचार किल्ले. मला सांग त्या बादशाहाच्या जागी कोणीही असता तर त्यानं तेच केलं असतं. जे औरंगजेबानं केलं."
केशर बोलून गेला खरा. त्याचा तिला तीव्र राग आला होता. परंतु तो मनात दाबून ती म्हणाली,
"हे बघा, तुम्ही म्हणताय ना की एक फेब्रुवारीपासून पंधरा दिवस मराठे काय करीत होते तर तुमच्या माहितीसाठी सांगतो. संभूराजांना पकडण्यापुर्वी रायगडाला वेढा पडला होता. झुल्फिकारखान, जो असद नावाच्या बादशहाच्या वजीराचा मुलगा होता. त्यानच वेढा दिला होता. त्यामुळंच रायगड धोक्यात होता. रायगड वाचवणं अगत्याचं होतं. कारण ती स्वराज्याची राजधानी होती. तशीच झुल्फिकारखानाची फौज ही लाखोच्या घरात होती. त्यातच जेव्हा संभाजीला मुकर्रबखानानं पकडलं. हे बादशहाला माहीत होताच त्यानं संगमेश्वर ते बहाद्दरगडाच्या मार्गावर आपले लाखोंचे सैन्य पेरुन ठेवले होते. त्यामुळं संभू राजांना वाचविण्याचे प्रयत्न होवू शकले नाहीत. जर या काळात मराठे बादशाहाच्या फौजदार तुटून पडले असते तर कदाचीत मराठे संपून गेले असते. तशीच मराठ्यांची ताकदही संपून गेली असती. तसेच गनिमी काव्यात परीपुर्ण असलेले मावळे. त्या मावळ्यांची ताकद सह्यांद्रीतच आहे. हे बादशाहा ओळखून असल्यानं त्यानं संभूराजांना तेव्हा मैदानात असलेल्या व संपुर्णतः भुईकोट असलेल्याच बहाद्दरगडावर ठेवलं होतं आणि हो, मी मान्य करते की संताजी व धनाजी चूप बसले. परंतु तेही रायगडच वाचविण्याच्या प्रयत्नात होते."
"हो ते सगळं बरोबर आहे. मग एक राजा जीवंत असतांना राजाराम का बरं राजा झाला? तुमच्या राजारामानं तर जीवंतपणीच संभूराजांना मारुन टाकलं राजा बनून."
"हो, तुमचं म्हणणं ठीकच. परंतु ती राजारामाची कृती फसवी नाहीच. ते बादशाहाचा अहंकार तोडण्यासाठी राजे बनले. दाखवलं की तुम्ही लाख पोशिंदे पकडा मराठी साम्राज्याचे. अजूनही आमच्यासारखे हजारो राजे जीवंत आहेत. हेच दाखविण्यासाठी प्रयत्न केला महाराज बनून राजारामानं."
"ठीक आहे, ही देखील गोष्ट मान्य. मग राजे बनताबरोबर राजारामानं संभाजी महाराजांनी कैदेत टाकलेल्या येसाजीची का बरं मुक्तता केली?"
"राज्याला त्यांची गरज होती. शिवाय ते संभाजी महाराजानं कैदेत टाकलेली मंडळी होती. तसा तो त्यांचा निर्णय होता. परंतु राजारामांना मराठेशाहीत उत्साह आणायचा होता. म्हणून त्यांनी येसाजींची कैदेतून मुक्तता केली."
"असं जर आहे आणि तू म्हणते ते खरं आहे तर संभाजी राजांना पकडल्यानंतर काही संभाजी महाराजांच्या समर्थकांचा कडेलोट का करण्यात आला?"
"त्यांच्यापासून राज्याला धोका होता?"
शाहीन व केशरचा वाद. कधी केशरचे प्रश्न व तिची उत्तरं, कधी तिचे प्रश्न व केशरची उत्तर. अशाच प्रश्नांच्या धुमश्चक्रीत त्यांच्यामध्ये विचारांची खडाजंगी उठायची. वेळप्रसंगी शाहीन चूप राहात असे. परंतु केशर चूप राहात नसे. ज्यातून एकाच घरात पती पत्नीत हिंदू मुस्लीम वाद होत असे.