Danga - 1 - 2 in Marathi Classic Stories by Ankush Shingade books and stories PDF | दंगा - भाग 1 व 2

Featured Books
  • فطرت

    خزاں   خزاں میں مرجھائے ہوئے پھولوں کے کھلنے کی توقع نہ...

  • زندگی ایک کھلونا ہے

    زندگی ایک کھلونا ہے ایک لمحے میں ہنس کر روؤں گا نیکی کی راہ...

  • سدا بہار جشن

    میرے اپنے لوگ میرے وجود کی نشانی مانگتے ہیں۔ مجھ سے میری پرا...

  • دکھوں کی سرگوشیاں

        دکھوں کی سرگوشیاںتحریر  شے امین فون کے الارم کی کرخت اور...

  • نیا راگ

    والدین کا سایہ ہمیشہ بچوں کے ساتھ رہتا ہے۔ اس کی برکت سے زند...

Categories
Share

दंगा - भाग 1 व 2

           दंगा पुस्तकाविषयी थोडंसं. 

           दंगा नावाची ही पुस्तक वाचकाच्या हातात देतांना मला अतिशय आनंद होत आहे. ही पुस्तक तमाम शोषीत हिंदू मुस्लिम व धर्मनिरपेक्षता मानणाऱ्या लोकांना प्रेरणा देणारी आहे. ही पुस्तक लिहिण्यामागे प्रेरणा ही दंग्याचीच आहे. नागपूरमध्ये असाच दंगा उसळला होता. तीच पाश्वभुमी लक्षात घेवून काल्पनिक पद्धतीनं ही दंगा नावाची पुस्तक तयार झाली आहे. सध्या देशात वाद आहेत. काही ठिकाणी धर्मावरुन वाद आहेत तर काही ठिकाणी भाषीक वाद आहेत. धार्मिक वाद हे नेहमीच होत असतात व ते आपण या देशात जेव्हापासून आपले पुर्वज माकड अवस्थेतून मानव अवस्थेत जमीनीवर राहायला आले. तेव्हापासूनच पाहात आहोत. जसे, आर्य व द्रविड वाद, बौद्ध, जैन व वैदिक वाद, हिंदू मुस्लिम वाद. पुर्वीपासूनच असे वाद चालायचे. आज त्यात एका नवीन वादाची तेवढी भर पडली. ज्याला भाषीक वाद म्हणतो. आज देशात धार्मिक वाद, राज्यात भाषीक वाद, समाजव्यवस्थेतील भ्रष्टाचार वाद घोटाळा, नोकरीतील खाजगी वाद, तसेच कुटूंबातील पती पत्नींचे वाद सतत चालत असतात. 
        आज देशात असलेला धार्मिक वाद. राज्यात निर्माण झालेला भाषीक वाद. त्यातच नोकरी ठिकाणीही निर्माण झालेले वाद आणि घराघरातील पती पत्नीचे वाद तसेच समाजव्यवस्थेतील भ्रष्टाचार. या सर्वांची काल्पनिक पद्धतीनं सांगड घालून दंगा नावाची पुस्तक तयार केली आहे. ते आपल्याला आवडेलच असे नाही. परंतु या निमित्यानं एक लेखक म्हणून मी आपला महाराष्ट्रीय इतिहास आपणाला उलगडून दाखवलेला आहे. कदाचीत हा इतिहास आपल्याला आवडेलच असा नाही. तेव्हा कदाचीत हे लेखन आवडले नसल्यास त्याचा बाऊ करु नये. ते फक्त वाचण्यासाठी वापरावे. कारण प्रत्येकाचं मत वेगवेगळं असू शकते. या पुस्तकातील विचार हे माझे असून मी वैयक्तिकपणे व्यक्त केले आहे. 
         आपणास वाचक या नात्यानं नम्र विनंती आहे की दंगा नावाची ही पुस्तक वाचनीय झालेली असून आपण ती वाचावी. बोध घेता येत असेल तर घ्यावा. काही गोष्टी सोडून द्याव्यात. त्यावर जास्त विचार करण्याची गरज नाही आणि मुख्य म्हणजे काही गोष्टी माहीत करुन घ्याव्यात. ज्या गोष्टी आपल्याला कदाचीत माहीत नसतील. 
           आपला नम्र

          
        
        हिंदी पहिलीपासून अनिवार्य करण्याला मर्यादा का? त्याचा प्रश्न. तसा तो हिंदी भाषिक होता व धर्मानं मुस्लिम होता. त्यातच सरकारनं निर्णय घेतला होता की हिंदी विषय पहिलीपासून शिकवावा. त्यालाही अगदी तसंच वाटत होतं. 
         हिंदी भाषा पहिलीपासून शाळेत शिकविण्यासाठी अनिवार्य करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला होता. तसं पाहिल्यास परीवर्तनीय शिक्षणाला शालेय जीवनात अतिशय महत्व आहे. हिंदी भाषा पहिलीपासून शिकविणे हे परीवर्तनीय शिक्षणच आहे. परंतु त्यावरही वाद प्रतिवाद होत होते. शिवाय त्यात राजकीय रंगही भरले जात होते. मात्र त्याला वाटत होतं की हिंदी ही आपली राष्ट्रभाषा असल्याने ती भाषा पहिलीपासून शिकण्याला मर्यादा का? तसाच असा प्रश्न प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तींना पडलेला होता. 
         वाद होतच होते. कधी धर्मावरुन तर कधी भाषेवरुन. आमची अमूक भाषा. तीच वापरायला हवी. दुसरी भाषा वापरु नये. त्यातच आता हिंदी भाषेचा वाद. आम्ही मराठी बोलणारे. हिंदी भाषा आम्हाला नको. असा तो वाद. 
         त्याचं नाव केशर होतं व तो लोकांना सांगत सुटला होता की सध्या देशात हिंदी भाषा बोलणाऱ्यांचे प्रमाण सर्वात जास्त असून हिंदी ही केवळ आपली राष्ट्रभाषाच नाही तर ती आपल्या व्यवहाराची भाषा झालेली आहे. आज आपण देशाच्या कोणत्याही कोपर्‍यात गेलो तर हिंदी लोकांना समजते व त्या भाषेतून व्यवहारही करता येतो. याचा अर्थ असा नाही की ती उत्तर भारतीयांची भाषा आहे. म्हणूनच सरकारनं पहिलीपासून हिंदी विषय शिकविण्याचा निर्णय घेतलाय. तसं पाहिल्यास सरकारनं याआधी इंग्रजी हा विषय पहिलीपासून अनिवार्य केलाय. मग हिंदी का अनिवार्य करु नये. असे प्रश्न काही सामान्य लोकांच्या मनात आहेत. जे उघडपणे बोलत नसून त्याचे गुप्त वारे सुरु आहेत. त्यालाच फाटा देत काही राजकीय नेते हिंदी हा विषय पहिलीपासून शिकविण्यावर मर्यादा आणत असून त्या विद्यार्थ्यांचं हिंदी विषयाबाबतीतील भविष्य हे अंधकारमय करीत असल्याचं चित्र दिसत आहे.
           सरकारनं नवीन शैक्षणिक धोरणानुसार हिंदीला महत्व देवून हिंदी पहिलीपासून शिकविण्याचा निर्णय घेतला. त्यातच हिंदीला विरोध करणारे काही लोकं म्हणायला लागले हीते की हिंदी ही आपली भाषा नाही. आपली राज्यभाषा मराठी आहे व मराठीलाच जास्त प्रमाणात प्राधान्य असावे. तसंच मराठीला राज्यात अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने मराठी भाषेच्या प्रचाराची व प्रसाराची गरज आहे. असे असतांना मराठी भाषेला वृद्धींगत करणे सोडून हिंदीच्या मागे लागणे बरोबर नाही. ही महाराष्ट्र भुमी असल्यानं काही नेते म्हणायला लागले होते की आम्हाला हिंदी भाषा शिकणे सक्तीची नको. तो आमचा ऐच्छिक विषय आहे. 
         हिंदी ही आमची राष्ट्रभाषा आहे व मराठी ही आमची राज्यभाषा. आम्ही महाराष्ट्रात राहात असल्याने मराठीला आम्ही आमची मातृभाषा म्हणून स्विकारले आहे. याचा अर्थ आम्ही हिंदी भाषा बोलत नाही असा नाही. 
       हिंदी ही आमची राष्ट्रभाषा आहे. तसंच हिंदी ही भाषा प्रसंगी अगदी पहिल्या वर्गातील मुलांना लिहिता बोलता जरी येत नसेल तरी समजणे कठीण जात नाही. याच अनुषंगाने ती भाषा लिहिता व बोलता यावी. हा उद्देश गृहीत धरुन शासनानं हिंदीला पहिलीपासून शिकविण्यावर जास्त भर दिला होता. तसं पाहिल्यास भारताच्या कोणत्याही प्रदेशात गेले असता, त्या प्रदेशात मराठी प्रसंगी समजत नव्हती. परंतु त्या लोकांना हिंदी समजत होती व ही सत्य बाब होती. त्यामुळंच ती संपर्क करण्याची भाषा आहे. असे स्वतः केशर म्हणत होता, ते काही खोटे नव्हतं. कारण हिंदी ही संपर्काची भाषा होती. परंतु ती भाषा काही नेते आपली भाषा मानत नव्हते व त्या भाषेला तेच नेते राष्ट्रभाषाही मानत नसून ती भाषा उत्तर भारतीयांची भाषा मानत असत. 
         केशर हिंदीबाबत सांगत असे. हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे व ती उत्तर भारतीयांची भाषा नाही. हिंदी ही आपली भाषा आहे. शिवाय त्यातून होणारा व्यवहार, ती भाषा साधी व समजण्यास सोपी भाषा असल्यानं करता येवू शकतो. याबाबत आणखी सांगायचं झाल्यास असेही म्हणता येईल की इंग्रजी ही आपली राष्ट्रभाषा नाही, ना ही ती आपली राज्यभाषा आहे. तरीही त्या भाषेचा शिकण्यासाठी पहिलीपासून एक विषय म्हणून आपण स्विकार केला ना. मग ही तर राष्ट्रभाषा आहे. हिचा स्विकार का नाही. शिवाय ही भाषा लहान बाळ का असेना, त्यालाही समजायला हवी. म्हणून सरकारचा निर्णय रास्त आहे. 
          विशेष सांगायचं झाल्यास हिंदी ही राष्ट्रभाषा असून मराठी ही आपली राज्यभाषा आहे आणि इंग्रजी ही आपली कोणतीच भाषा नाही. ना मातृभाषा, ना आपली राज्यभाषा. शिवाय ती पहिलीपासून स्विकारली. तशी ती पहिलीपासून आपण शिकत असलो तरी मोठेही झाल्यावर ती सर्वसामान्य लोकांना व्यवस्थित बोलता येत नाही. व्यवहार करता येत नाही. याऊलट हिंदी ही भाषा आपण पाचवीपासून शिकत असूनही त्या भाषेतून आपण व्यवहार करतो. जो उच्चतम शिकलेला व्यक्ती नसेल, तरीही तो पुढे जावून हिंदीतून सुलभतेनं व्यवहार करु शकतो. असे असतांना व हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा असतांना हिंदी हा विषय पहिलीपासून शिकविण्याला प्राधान्य का नसावं? त्या भाषेबद्दल एवढा तिटकारा का असावा? त्यातच इतर भाषा या राज्यभाषा आहेत व त्या शिकता येणं कठीण आहे. त्यातील मराठी एक. सरकारचं असंच मत. शिवाय मराठी भाषा पाहिजे तेवढी शिकायला सोपी नाही. जेवढी हिंदी सोपी आहे.
          सरकारचं मत असं आहे की देशातील संपुर्ण व्यवहाराची भाषा हिंदी बनावी. कारण इतर भाषा या राज्यभाषा आहेत व त्या कठीण आहेत. शिकायला, बोलायला व लिहायलाही. शिवाय इंग्रजी आपली भाषा नाही. तरी जगाचा विचार करुन त्या भाषेचा आपण शिकवायला व शिकायला पहिलीपासून स्विकार केला. तोच विचार हिंदीबाबतही करावा. त्या भाषेचा विचार केवळ राज्यापुरता करु नये. कारण मराठी ही देशातील सर्वांनाच येते असं नाही. परंतु हिंदी भाषा ही देशातील सर्वच रहिवाशांना येत असून जर मुलाला पहिलीपासून ती शिकवल्या गेली तर ती अगदी सहजपणे सर्व मुलांना येईल. ज्यातून व्यवहार करणे सोपे जाईल. हेच सरकारचं मत. त्यासाठी सरकार पावले उचलत आहेत आणि त्या भाषेला काही राजकीय नेते आपली अस्मिता मानून त्याचा विरोध करीत आहेत. दोन्ही घटक हिंदी पहिलीपासून अनिवार्य करण्या न करण्याला विद्यार्थी दृष्टीनं हितावह आहे की नाही याबद्दल विचार करीत आहेत. त्यावर शिकविणारा घटक हा आपलं मत मांडतांना दिसत नाही आणि दिसेलही तर ते रास्तच मत असेल. परंतु त्या मताला हे राजकीय नेते विशेष महत्व देत नसून शिकणारा जो घटक आहे. त्याला फार अडचणी येणार आहेत. असा बाऊ करीत आहेत. ही गोष्ट लक्षात घेता हिंदीतून शिकविण्यावर अशी मंडळी मर्यादा आणत आहेत व हिंदी पहिलीपासून शिकायची इच्छा ठेवणाऱ्या लोकांच्या विचारांची तसेच प्रत्येक मुलांच्या हिंदी शिकण्याच्या होणाऱ्या आनंदाची कत्तल करीत आहेत. विशेष म्हणजे ज्यांना ज्यांना वाटते की हिंदी विषय पहिलीपासून शिकवला जावू नये. त्यांनी इंग्रजी विषयही पहिलीपासून शिकवला जावू नये यासाठी प्रयत्न करावा. कारण इंग्रजी ही आपली सर्वसामान्य लोकांची भाषा नाही. ना ही ती मातृभाषा आहे. ना ही ती राज्यभाषा आहे. ना ही ती राष्ट्रभाषा. हिंदी तर राष्ट्रभाषा तरी आहे व ती भाषा देशातील कानाकोपऱ्यातील सर्वच लोकांना समजते. त्या भाषेतून व्यवहारही करता येतो. 
        महत्वाचं म्हणजे हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे. त्यामुळं आपली राष्ट्रभाषा आपल्याला यायलाच हवी. ती अगदी लहान बाळालाही यायलाच हवी आणि ती येवू शकते. कारण ती आपल्या मराठीशी मिळतीजुळतीच आहे. त्यामुळं एक विषय म्हणून पहिलीपासून ती असली तर त्यात काय वावगे आहे? काहीच वावगे नाही व त्यामुळं शिकविण्यातही कोणताच फरक पडणार नाही. शिकविणारेही तयार आहेत व शिकणारेही तयारच आहेत. मग यात दोन्ही घटक जर तयार आहेत तर उगाचच बाकीच्यांना त्यात काय घेणं देणं असावं. ही विचार करण्यालायक एक बाब आहे. हिंदी हा विषय इंग्रजीसारखाच पहिलीपासून शिकण्यासाठी अनिवार्य करावा. जेणेकरुन इंग्रजी सोबतच मुलांना हिंदी हा विषय इंग्रजीसारखाच पहिलीपासून शिकण्यासाठी अनिवार्य करावा. जेणेकरुन इंग्रजी सोबतच मुलांना हिंदी हा विषय पण पहिलीपासून शिकता येईल. जर असं होत नसेल तर इंग्रजी हा विषय देखील पहिलीपासून अनिवार्य करु नये. पुर्वीसारखंच मातृभाषा अर्थात मराठी भाषेतूनच शाळेचं शिक्षण असावं. यात शंका नाही. जेणेकरुन विद्यार्थ्यांचं हिंदी या राष्ट्रभाषेबद्दलचं अस्तित्व, माहिती ही अंधकारमय होईल. त्याला देशातील कानाकोपऱ्यात व्यवहार करतांना अडचणी निर्माण होतील. हे तेवढंच खरं.
          केशरचं हिंदीबाबत असलेलं मत. परंतु काही लोकं त्यात राजकीय रंग भरत होते व मराठी भाषेलाच जास्त प्रमाणात महत्व देत असत. ज्यात काही नेते याच मुद्द्यावरुन राजकारणही खेळत होते. परंतु केशरनं तसं मत व्यक्त केल्यानं केशरचा राग संबंध मराठी भाषिकांना होताच. त्यातच काही लोकं केशरचं अस्तित्व बिमोड करण्यासाठी वा संपविण्यासाठी संधी पाहात होते.      
          तो भाषीक वाद. त्यात पडलेला केशर. ते केशरचं वक्तव्य मराठी भाषिकांना आवडलं नाही. अशातच ते संधी शोधत होते. मग ठिणगी पडली. ठिणगीनुसार केशरचा दंग्यातील सहभाग हा मराठी भाषिकांना पुरावा ठरला. मग काय पाहता. आपला बदला काढण्यासाठी मराठी भाषीक लोकं जे पेटून उठले. ज्यातून केशरला कारावास झाला होता. शिवाय त्याला पर्याय ठरलं त्याचं निलंबन. तो एका शाळेत नोकरीवर होता. परंतु संस्थाचालकानं त्याची वागणूक चांगली असूनही त्याचं निलंबन केलं होतं. 
          केशर आज खडी फोडत होता तुरुंगात. त्याचं कारण होतं, त्यानं केलेलं कर्म. त्यानं शहरात वाईट कर्म केले होते. ते वाईट कर्म होते दंगा घढवून आणणे. अचानक तो राहात असलेल्या शहरात हिंदू मुसलमान दंगल उसळली. ज्यात ती दंगल करायला केशरही गेला होता. अशाच वेळेस पोलीस आले. दंगल करणारे पळून गेले. केशर मात्र पळून गेला नाही. तो पोलिसांच्या हाती सापडला. मग काय, पोलिसांना केस बनवायचीच होती. त्यांनी त्याला ताब्यात घेतलं. त्यातच दंग्यानं चिडून असलेल्या पोलिसानी केशरचं काहीही न ऐकता त्याला जबर मारहाण केली व त्याच्याकडून गुन्हा कबूल करुन घेतला. अशातच त्याला दंग्याचा मास्टरमाइंड करार देत तुरुंगात पाठवलं गेलं. 
          तो दंगा होता हिंदी व मराठी भाषेतून निर्माण झालेला. त्यात पुढे धार्मिक रंग भरला गेला. तसं धार्मिकतेवरुन एक प्रकरण झालंच होतं. ज्यातून धार्मिक भावना भडकल्याच होत्या. 
          धार्मिक भावना जेव्हा भडकतात, तेव्हा त्याचा वणवा हा सामान्य लोकांच्या घरापर्यंत पोहोचतो. त्यांच्या घरादारात लोकं शिरतात. त्यांच्यासमोर त्यांच्याच घरात त्यांच्या पत्नीच्या अब्रुच्या चिंध्या होतात. महिलांची अब्रू लुटली जाते. ज्यातून अशी अब्रू लुटली जावू नये म्हणून काही सत्यवती स्रिया जोहार सारखी कृती करतात. जी कृती गतकाळात महाराणी पद्यावती व महाराणी संयोगीतानं केली. ज्यातून कित्येक सामान्य स्रियांचे बळी गेले. ज्यातून कितीतरी सामान्य लोकं मृत्युमूखीही पडले. ज्यातून कितीतरी चल अचल संपत्तीची जाळपोळ झाली.
           केशर लोकांना तेच सांगत होता. आताही तशीच स्थिती असून त्यात सामान्य लोकंच भरडले जातील आणि जे असा वाद निर्माण करतील. ते आपल्या आलेशान बंगल्यात एसीच्या हवेत आरामात बसून मजा पाहतील. ही वास्तविकता असून आतातरी लोकांनी शांत राहावे. वाद वादाच्या ठिकाणी ठेवावा व विनाकारण एखाद्या मुद्द्याला धार्मिक रंग देवून त्याचा बाऊ करु नये म्हणजे झालं.
          धार्मिक भावना भडकणे वा भडकविणे. या प्रकारच्या घटना आजच्या नाहीत. जेव्हापासून धर्म अस्तित्वात आला. तेव्हापासूनच धार्मिक भावना भडकविण्याचं षडयंत्र केलं जात आहे. ज्यात पुर्वीच्या राजामहाराजांच्या काळातही धर्मावरुन वादंग झालेले आहेत. 
          भारत निर्माण होण्यापुर्वी या भारताला हिंदुस्थान म्हणत. ज्यात एक वैदिक धर्म अस्तित्वात आला. ज्यातील तत्व पसंत नसल्यानं सर्वात प्रथम दोन धर्म अस्तित्वात आले. ते म्हणजे जैन व बौद्ध. त्यातच तत्वावरुन वैदिक, बौद्ध व जैनांच्या आपापसातील भावना भडकायच्या. ज्यातून सत्तेवर असलेल्या राजांची हत्या व्हायची. 
         धार्मिक भावना या जशा हिंदुस्थानात भडकायच्या. तशाच धार्मिक भावना या विदेशातही भडकल्या जायच्या. विदेशात पुर्वी यहुदी व ज्यूचे संघर्ष बरेचदा पाहिलेच आहे. तसेच नाझी पक्षाचीही वाटचाल इतिहासात आहे.
         हिंदू मुस्लिम धार्मिक भावनांचा विचार केल्यास आणि जास्त प्रमाणात झालेला उद्रेक लक्षात घेता पहिल्यांदा धार्मिक भावना इस सातव्या शतकात भडकल्या होत्या. ज्यावेळेस हिंदुस्थानात आलेल्या मोहम्मद बिन कासीमनं इस ७१३ मध्ये राजा दाहिरची हत्या केली होती. त्यानंतर दुसऱ्यांदा मोठ्या स्वरुपाच्या धार्मिक भावना भडकल्या. राजा पृथ्वीराज चव्हाणला बंदी बनवून मोहम्मद घोरीनं नेलं व धर्मपरीवर्तन करायला लावलं होतं. ज्यात महिलांचाही विनयभंग करण्याचा प्रयत्न झाला होता. ज्यातून आपली अब्रू वाचविण्यासाठी महाराणी संयोगीतासह कितीतरी स्रियांनी जोहार केला होता. या जोहार प्रक्रियेत पुढे राणी पद्यावतीचाही समावेश आहे. हिंदुस्थानातील कितीतरी स्रियांनी प्रसंगी याच धार्मिक भावनेचे शिकार होवून आपलं जीवन संपवलं आहे. 
          ते सोळावे शतक की ज्या काळात औरंगजेब बादशाहा झाला. त्याची एक प्रकारची महत्वाकांक्षा होती की मी आलमवीर बनेल. त्याच आलमवीरपणाच्या भानगडीत त्यानं आपलाच भाऊ दारा व शुकोहची हत्या केली आणि आपल्याच वडीलाला म्हणजे शहाजहानला नजरकैदेत टाकले. त्यानंतर तो राजगादीवर आला. विचार केला की मी संपूर्ण हिंदूस्थान जिंकेलच. याचाच विचार करुन त्यानं उत्तर भाग आपल्या ताब्यात आणला आणि आता दक्षिण भागावर ताबा मिळविण्यासाठी त्यानं आपले सरदार दक्षीण भागात पाठवले. परंतु येथे असलेल्या सिसोदिया वंशाचे राजे असलेल्या शिवाजी महाराजांसमोर त्याचे काहीच चालले नाही. कारण त्यांचा धाक व शौर्य औरंगजेब जाणून होता. शेवटी विचारांती औरंगजेब बादशाहा शिवाजी महाराजांच्या मृत्यूची वाट पाहात होता. जसे शिवाजी महाराज मृत्यू पावले. तसं त्याला वाटलं की आता आपण महाराष्ट्र सहजच जिंकू शकू. कारण आता महाराष्ट्रात सक्षम असा शिवाजी महाराजांसारखा राजाच राहिलेला नाही. परंतु अकस्मात तसा विचारही न करणाऱ्या औरंगजेबाला शह दिला, तो म्हणजे महाराज संभाजीनं. संभाजी महाराजांनी बऱ्हानपूर लुटलं व औरंगजेबाला दाखवलं की आम्हीही शिवाजी आमच्या वडीलांसारखेच आहोत. ज्याचा राग येवून संभाजी महाराजांना औरंगजेबानं कुटनीतीनं पकडलं व अतिशय क्रुरपणे हत्या केली. त्यानंतर इथे असलेल्या व संभाजीनंतर राजगादीवर आलेल्या महाराज राजारामनं व त्यानंतर त्याचीच राणी असलेल्या ताराबाईनं महाराष्ट्र लढवला. परंतु महाराष्ट्रातील जनतेला औरंगजेबाचे गुलाम होवू दिले नाही. इथंपर्यंतचा इतिहास हा बरोबर आहे व तो धार्मिक भावना विचारात घेतांना हा इतिहास लक्षात घेणे गरजेचे आहे. 
           धार्मिक भावना भडकण्याचा वाद हा कबरीतून उत्पन्न झाला. विचार पुढे आला की ज्या औरंगजेबानं महाराष्ट्राला त्रास दिला. संभाजी राजाला क्रुरपणे मारलं. त्यांची कबर महाराष्ट्रात कशाला आणि त्या कबरीचा समावेश पुराणतत्व भाग म्हणून सुचीत कशाला? ती हटवावी व त्या सुचीतील समावेश हटवावा. उगाच त्या स्थळाचं उदात्तीकरण व्हायला नको. यात एका गटाचं म्हणणं हेच की कबर हटवावी तर दुसर्‍याच गटाचं म्हणणं आहे की कशाला हटवावी? यावरुन वाद. त्यात नेते आणखी आगीत तेल टाकत होते. त्यांना वाद हा मिटवायचा नव्हता. तो वाद सुलगवत ठेवायचा होता. जशी एखादी धान्याची गंजी. ती जळत नाही. परंतु कुरपते आणि संपूर्ण धानाची गंजीच नष्ट करुन टाकते तशी. विशेष सांगायचं झाल्यास नेत्यांना आपलं अस्तित्व निर्माण करायचं असतं. म्हणूनच ते जमाव करतात. धार्मिक भावना भडकवितात. ज्यात सहभागी होत असलेली सामान्य जनता हीच भरडत असते. मात्र नेते त्यातून व्यवस्थीतपणे बाहेर पडतात. त्यांचं काहीच होत नाही. होतं, ते सामान्य लोकांचंच. कारण गुन्हा हा घडलेला. त्या गुन्ह्यांचे खटले दाखल त्यांच्या नोंदी या सामान्य माणसावरच झालेल्या. ज्यातून पुढे तेच खटले न्यायालयात उभे राहणार असतात तारीख पे तारीख ते गुन्हे चालूच राहतात. हे सत्य आहे. 
         आता मुद्याकडे येवूया. मुद्द्यात एक गट म्हणत होता की की कबर हटवावी. कारण औरंगजेब हा क्रुरकर्मा होता. त्यानं महाराष्ट्राला त्रास दिला. संभाजी महाराजांची हत्या केली. देवळं पाडली. गाई गुरं कापली. हिंदू स्रियांची अब्रू लुटली. म्हणूनच अशा व्यक्तीची कबर महाराष्ट्रात नसावी. ज्या कबरीला एक विशिष्ट समुदाय आदर्श मानतो. एवढा आदर्श मानतो की त्यातून अनेक क्रुरकर्मे तयार होवू शकतील. जे क्रुरकर्मे तयार होवू नये. चांगली आदर्श विचारांची माणसं तयार व्हावीत. मात्र तो समुदाय म्हणतो की औरंगजेब आदर्श होता. त्यानं जे काही केलं ते धर्म वाढविण्यासाठी केलं आणि धर्म वाढविण्यासाठी केलेली कोणतीही कृती ही गैर नाही. हा झाला आदर्श व आदर्श ठरवत असणाऱ्या लोकांचा भाग. दुसरा महत्वाचा भाग आहे आणि तोही अतिशय मोठ्या प्रमाणात विचार करण्याचा भाग आहे. तो म्हणजे ताराबाईचं म्हणणं. तिनं आपल्या पतीच्या म्हणजेच राजारामाच्या मृत्यूनंतर आपला मुलगा शिवाजी यास गादीवर बसवले व जाहीरपणे निर्धार केला की या औरंगजेबाची समाधी याच महाराष्ट्रातील भुमीत खोदणार. तिनं आपलं स्वप्न पुर्ण केलं व तीच बाब संपूर्ण महाराष्ट्रासारखी गौरवाची ठरली. तिसरी महत्वाची गोष्ट ही की ज्या औरंगजेबाला आलमवीर नावाचा सन्मान मिळणार होता. त्या आलमवीराची समाधी उघड्यावर असणे ही बाब संबंधीत महाराष्ट्रातील लोकांनी समजावून घेण्यासारखी बाब आहे. ती बोध घेण्यासारखीच बाब आहे. त्यानंतर ताराबाई नाही तर संबंधित महाराष्ट्राला संपवू पाहणारा व आलमवीर पदाची स्वप्न पाहणारा औरंगजेब हा याच मातीत ताराबाईच्या जबर प्रहारानं निराश झाला व शेवटी हताश होवून मरण पावला. हा इतिहास आहे. हा लोकांचा विचार.  
          लोकांचं आणखी एक मत. ते म्हणजे महाराणी ताराबाई या संबंधित महाराष्ट्रासाठी आदर्श आहेत. हे कोणी मानो अगर न मानो. त्यांनी दिलेली औरंगजेबाला शिकस्त ही वाखाणण्याजोगीच आहे. एक महिला असूनही व आपला मुलगा फक्त चारच वर्षाचा असूनही या महिलेनं हार मानली नाही व औरंगजेबाला धडा शिकवला. ती लढली व औरंगजेबाला सळो की पळो करुन सोडले. ज्यातून औरंगजेबाचा पायही मोडला होता. विशेषतः त्यातच औरंगजेबाची महाराष्ट्रात समाधी असणे हा तिचाच निर्धार आहे. ते तमाम हिंदुसाठी गौरवाची बाब आहे की आमच्या हिंदू राणीनं म्हटल्याप्रमाणे वा निर्धार केल्याप्रमाणे आपल्या महाराष्ट्राच्या भुमीवर औरंगजेबाची कबर खोदली. ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. ही घटना आजन्म लक्षात ठेवण्यासारखी राहील आणि कितीतरी पिढ्याही जातील. त्या पिढ्यात आमची राणी ताराबाई व औरंगजेब लक्षात राहील. तसाच तमाम पिढींना इतिहास लक्षात राहील की आमच्या राणीनं कोणाची कबर खोदली तर ती औरंगजेब नावाच्या व्यक्तीची. जसा इतिहास रावण आणि माता सीतेचा आणि प्रभू रामाचा अस्तित्वात आहे. जर ही कबर हटवली तर महाराणी ताराबाई व औरंगजेब हा इतिहासच तमाम हिंदूच्या मनपटलावरुन पुसला जाणार. तसं पाहिल्यास इतिहास हा पुसण्यासाठी नसतो तर तो इतिहास बोध वा प्रेरणा घेण्यासाठी असतो. त्यात काही लोकं आणखी भर घालत आहेत. ती म्हणजे औरंगजेबाची कबर. तो त्या काळातील एवढा मोठा बादशाहा होता की त्या बादशाहाची कबर हिंदुस्थानात कुठेही बनवता आली असती. कारण त्यावेळेस संपूर्ण हिंदुस्थानच त्याच्या ताब्यात होता. तशीच ती महाराष्ट्र भुमीत नसती तर आपल्या महाराष्ट्रातील तमाम लोकांना औरंगजेब समजला नसता आणि बोधही घेता आला नसता. 
           विविध माणसं व विविध त्यांचे बोलणे. औरंगजेबाची कबर व त्यावरचा वाद. आता कबर ही हटविल्यानं इतिहास मिटला जाणार नाही. औरंगजेबाला आदर्श मानणारे त्याला आदर्श मानतीलच यात वाद नाही. मात्र आज त्याच कबरीवरुन जे क्रुरकर्मा तयार होवू नयेत, असं लोकांचं म्हणणं. ते महत्वाचं आहे. लोकांमध्ये आदर्श विचार निर्माण व्हावेत. घरांमध्ये आदर्शपणा निर्माण व्हावा. त्यासाठी घरातूनच आदर्श संस्कार पेरावे लागतील. शाळेतूनही आदर्श संस्कार पेरावे लागतील. तरंच भविष्यात क्रुरकर्मा तयार होणार नाही. अन् वाद केल्यानं प्रश्न सुटणार नाहीच. चर्चेनंतर प्रश्न सुटेल. परंतु ती चर्चा ऐकून घ्यायची तयारी हवी ना. ती तयारी असावी. उगाचंच वाद करुन धार्मिक वाद तयार करु नयेत की ज्या धार्मिक वादातून पुढं धार्मिक दंगल तयार होईल. 
           माणसानं असा वाद तयार करण्याऐवजी सुधारणा व सुशोभीकरण करावे. करायचंच असेल तर आपल्या दुर्लक्षीत झालेल्या व ज्या महाराणी ताराबाईनं व छत्रपती राजारामानं औरंगजेबाला शिकस्त दिली, त्या ताराबाई व राजारामाच्या समाधीस्थळाचं सुशोभीकरण करावे. जेणेकरुन महाराष्ट्रालाही गर्व असेल की आमच्या याच जोडीनं आज महाराष्ट्र जपला. नाहीतर महाराष्ट्राला शौर्याचा इतिहास लाभलाच नसता. अन् जतन करायचंच असेल तर त्या मुस्लिम व्यक्तीच्या शौर्याचं जतन करावं की जे शिवाजी महाराजांच्या सैन्यात अग्रस्थानी होते. एखादं शिवा काशिदचंही मोठं स्मारक असावं. आरमाराचा प्रमुख दर्यासारंगचेही स्मारक असावे. ज्यांनी महाराष्ट्राला हिंदवी स्वराज्य बनविण्यात मोलाचा वाटा उचलला. आज आपल्याकडे काय आहे. राजारामाची समाधी कोंढाणा किल्ल्यावर धुळखात पडलेली आहे. फक्त नावापुरती कशीतरी एका लहानशा मंदीरासारखी उभी आहे. ताराबाईचीही समाधी तशीच आहे. येशुबाईची समाधी आजपर्यंत माहीत नव्हती. नागपूरचा इतिहास पाहिला तर ज्यानं नागपूर वसवलं. त्या बख्त बुलंदशहाची समाधी कुठे आहे? हे नागपूरकरांना माहीत नाही. त्या समाध्यांचं संवर्धन करावं. त्यातच ज्या रघुजीराजांना आपण मानतो. त्याच्या नावाने वा त्या वंशातील झालेल्या राजांचा इतिहास नागपूरकरांना माहीत व्हावा म्हणून ते माहीत करण्यासाठी एखादं ऐतिहासिक स्थळ नागपूरात निर्माण व्हावं. परंतु आपण ते लक्षात घेत नाही. अन् आम्ही लढत बसलो आपल्याच वादात. औरंगजेबाची कबर हटविण्यात. ज्यातून धार्मिक भावना भडकल्या की त्याचा सामान्य लोकांना विनाकारण त्रास होणार. ज्यात काही संधीसाधू लोकं संधी साधू शकतात. तेव्हा विशेष सांगायचं म्हणजे लोकांनी यावर संयम ठेवावा. कोणीही धार्मिक भावना भडकू देवू नये.
         मुस्लिमांचे हिंदू बांधव काही शत्रू नाहीत. अन् हिंदूंचे मुस्लिम बांधव काही शत्रू नाहीत. त्यांनीही त्या काळात आपल्याला आदर्श असलेल्या शिवाजी महाराजांना मदत केली होती. म्हणूनच महाराष्ट्र घडला व महाराष्ट्राची जपवणूक करता आली. तसेच काही हिंदूही औरंगजेबांकडे सरदारपदी होते. 
         वर्तमानपत्रात येत होतं की वाद कबरीचा नाहीच. वाद आहे व्यक्तीमत्वाचा. काही लोकं म्हणतात औरंगजेब क्रुरकर्मा, म्हणून त्यांची समाधी महाराष्ट्रात नको. ठीक आहे. त्यांना ही गोष्ट कोण समजावून सांगेल की बाबारे, तो आपल्या सामान्य लोकांचा विषय नाही. तो राजकारणाचा विषय आहे. त्यातूनच वाद उत्पन्न होतात. देशाचं एकत्रीकरण तुटतं. ते तुटू नये म्हणून लोकांनी आपल्या धार्मिक भावना भडकू देवू नयेत. त्यावर संयम ठेवावा. जेणेकरुन त्यातून आपलं नुकसान होणार नाही. त्याचबरोबर देशाचेही नुकसान होणार नाही. हे तेवढंच खरं. त्यातच हाही विचार करावा की हिंदू हेही मुस्लीमांचेच भाऊ आहेत व मुस्लिम हेही हिंदूचेच भाऊ आहेत. एकाच आईची लेकरं आहोत आपण. सर्व रुपांतरीत झालेले. त्यामुळंच आपण एक दुसऱ्यांवर वार करणं म्हणजे आपल्याच भावांवर वार करणं आहे. हे लक्षात घेण्याची गरज आहे. लोकांनी काय काय घडलं ते सोडावं. उद्या काय घडवायचं आहे याचा विचार करावा व रास्त पावलं उचलावीत. ज्यातून देशाचा विकास होईल. तसंच लोकांनी धार्मिक भावनेसाठी संयम राखावं म्हणजे झालं. व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती असतातच. लोकांच्या तोंडावर झाकण नसतंच. त्यामुळंच त्यांना बोलू द्यावं. आपण त्यांच्याकडे लक्ष देवू नये. तसंच एकमेकांच्या धर्माचा आदर करावा. जेणेकरुन शांतता व सुव्यवस्था निर्माण होईल यात शंका नाही.