Danga - 12 in Marathi Classic Stories by Ankush Shingade books and stories PDF | दंगा - भाग 12

Featured Books
Categories
Share

दंगा - भाग 12

१२

         केशर शाहीनसोबत राहू लागला होता. त्याला आज करमत होतं तिच्यासोबत राहतांना. परंतु आज त्याला गतकाळ आठवत होता. गतकाळातील ती शाळेतील मित्रमंडळी आठवत होती. ती मित्रमंडळी, ज्यावेळेस त्याचं वेतन बंद होतं, त्यावेळेस त्यांनी त्याला हिंमत दिली होती. तो त्यानंतर त्यांना जीवनात कधीच विसरला नाही. 
           केशरला आठवत होते, ते त्याच्या नोकरीदरम्यानचे दिवस. त्या दिवसात काही महिला शिक्षिका होत्या की त्यांनी केशरला त्रासच दिला होता. तरीही केशर त्यांच्यावर राग दाखवत नव्हता. उलट त्याला आपलेच प्रारब्ध समजून शोषत होता ते चटके. जे चटके सुर्याच्या उष्णतेपेक्षाही कडकच होते. 
           आज शाहीन सोबत होती केशरच्या. परंतु ती जेव्हा त्याचेपासून निघून गेली फारकत घेवून. तेव्हा मात्र त्याला बराच मनस्ताप झाला होता. असा मनस्ताप की ज्यातून तो दंग्यामध्ये सहभागी झाला होता. त्यातच त्याचं जीवनही अगदी उध्वस्त होवून गेलं होतं. 
         आज तो म्हातारा झाला होता व केशरही म्हातारा झाला होता. केशर मुस्लिम होता तर शाहीन हिंदू. सुरुवातीचा काळ असा की हिंदू मुस्लीम वादानं त्यांचं पटेनासं झालं होतं. परंतु आता म्हातारपणात त्यांचं चांगलं पटत होतं. तशीच त्यांची संततीही चांगलीच होती. आज त्याला आठवत होते ते गतकाळातील दिवस. ज्या गतकाळात त्यानं एका महिलेला मदत केली होती. जी महिला त्या दंग्यात अडकली होती.
          तो दंग्याचा काळ होता. एक महिला आपल्या पतीला दवाखान्यात घेऊन जात होती. रस्त्यावर खूप गर्दी होती. दंगेखोर रस्ता अडवून बसले होते. गर्दी लक्षात घेवून. तिला माहीत झालं की आता या गर्दीतून रस्ता काढणं कठीण आहे. तशीच त्या गर्दीच्या बाहेर लोकांची जोरात आरडाओरड सुरु होती. 
         ती महिला...... त्या महिलेला चिंता होती ती आपल्या पतीची. त्यांना वाचवायला हवं. काही का असेना. तशी ती विचार करु लागली. काय करावे? आपल्या पतीला वाचवावे लागेल. पण अशी गर्दी. त्या गर्दीतून बाहेर पडण्याचा कोणताही पर्याय नाही. ती इकडे आणि तिकडे पहात होती. मग तिनं बाहेर पाहिलं.
           तिनं पाहिलं की चार - पाच तलवारधारी तिच्या गाडीच्या बाहेर उभे असून त्यांच्या हातात नग्न तलवारी आहेत. काही तलवारधारी तिच्या कारच्या समोर उभे आहेत. ते त्या चालकाला आव्हान देत आहेत. त्यांच्या हातातील नग्न तलवारी चमकत आहेत.
        त्या महिलेने तलवारधारकांना पाहिले. तो एक दंगा आहे हे निष्पन्न झाले. तो हिंदू मुस्लिम दंगा आहे आणि मुस्लिम समुदाय आपली शक्ती दर्शविण्याच्या मार्गावर तीव्र चळवळीचे आयोजन करीत आहे. हे तिच्या लक्षात आले. 
         ती महिला चिंताग्रस्त झाली होती. तिला वाटले की मी माझ्या पतीचा जीव वाचवू शकणार नाही. उलटपक्षी, आपल्याला आपल्या स्वतःचा जीव गमावावा लागेल. काय केले पाहिजे. ती विचार करु लागली.
           ती विचार करु लागली प्राण्याविषयी. एखाद्या हिंस्र प्राण्यालाही आपण शरण गेलो तर तो प्राणी देखील आपल्याला त्रास देत नाही. उलट मदत करतो. ही तर माणसं आहेत. तिला वाटलं. आपण गाडीच्या बाहेर पडावं. 
         आपल्याला बाहेर पडावे लागेल. परिस्थितीचा सामना करावा लागेल. मग तिनं बाहेर पाहिले. काही तलवारधारींनी तलवारीने तिला कारचा दरवाजा उघडण्याचा इशारा दिला होता. काही क्षण निघून गेले. काही काळानंतर, तिनं कारचा दरवाजा उघडला. ती गाडीच्या बाहेर पडली. तिला वाटलं आता जीवंत राहणार नाही. मग तिनं गाडीचा दरवाजा उघडताच त्या समुदायासमोर हात जोडला आणि आपली दु:खी कथा सांगण्यास सुरवात केली. 
         गाडीचा दरवाजा उघडला आणि तिच्या हृदयाची स्थिती त्या उघड्या तलवारबाजांसमोर सादर झाली. ती रडू लागली. तिनं त्यांना विनवणी करण्यास सुरवात केली. तिनं दया मागण्यास सुरवात केली. मग तिच्या समोर उभा असलेला तो तरुण म्हणजेच केशर. तसा तो मोरक्याच त्या दंग्याचा. त्याला दया आली. त्यानं दयाळूपणा दाखवत त्या महिलेला गाडीत बसवले. त्यानं एक साखळी बनवली आणि त्या महिलेच्या गाडीला दवाखान्याच्या दाराजवळ नेवून दिले व तिच्या पतीचा जीव वाचवला. 
          आज त्याला ती महिला आठवत होती. त्याला माहीत नव्हतं की त्या महिलेचा पती वाचला की नाही ते. परंतु तो दंगा सुरु असतांना त्यानं एका महिलेला, तिचा पती आजारी असतांना, त्याला वाचविण्यासाठी केलेली मदत आठवत होती.
           केशरचं लहानपणापासूनचं जीवन म्हणजे एक प्रकारचा संघर्षच होता. तो संघर्ष, ज्याच्या वेदना तीव्र असायच्या व मनस्ताप चांगला व्हायचा. लहानपणी त्याला शिक्षणासाठी आईवडीलांपासून वेगळं राहावं लागलं. पुढं शाळेत नियुक्त असतांना शाळेतील संस्थाचालकामार्फत त्याला त्रासच झाला होता. पुढं संसारातही त्याला त्रासच शोषावा लागला. जेव्हा त्याची पत्नी त्याला सोडून गेली होती. त्यानंतर त्याला आणखी जीवनात संघर्ष आला. जेव्हा तो दंग्यात सहभागी झाला. परंतु जीवनभर संघर्ष करीत त्रास भोगणारा केशर आज म्हातारपणी अगदी सुखी झाला होता.
            शिक्षक भरती घोटाळा. केशरला आठवत होता तो काळ. ज्या काळात शिक्षक भरती घोटाळाही झाला होता. त्यातच त्याला वाटत होतं की न्यायालयानं आतातरी संस्थाचालकावर कारवाई करावी. तशीच कारवाई शिक्षकांवरही करावी. 
          तो काय व त्या काळात झालेला शिक्षक भरती घोटाळा. ज्याला शिक्षकी पेशा आणि शिक्षण विभागाला काळीमा फासणारी गोष्ट म्हटली तरी चालेल. तसं पाहिल्यास हा घोटाळा झाला संस्थाचालकाच्या माध्यमातूनच. ज्यात अधिकारी वर्ग तेवढाच जबाबदार होता. ज्यात काही संस्थेत मुख्याध्यापकही जबाबदार घटक असू शकतात. असं केशरला वाटत होतं. कारण लेनदेन लाखो रुपयाची झाली होती. 
          केशरला त्यावेळेस वाटत होतं. एक उमेदवार..... तो आजच्या घडीला खाजगी संस्थेत नोकरी मिळविण्यासाठी जवळपास पन्नास लाख रुपये रक्कम देतो. ही रक्कम तो मुख्याध्यापकाला देत नाही. तर तो ती रक्कम संस्थासचीवाला देतो. ज्याचा वापर आपला घरखर्च चालविण्यासाठी संस्थेतील पदाधिकारी करीत असतात. यातील दहा टक्के रक्कम ते अधिकारी वर्गाला देतात. यामुळं या प्रकरणात सर्वात जास्त प्रमाणात दोषी आहे. तो म्हणजे संस्थाचालक. त्यानंतर दुसरा त्यात दोषी घटक आहे अधिकारी. अन् तिसरा घटक आहे स्वतः शिक्षक. कारण या प्रक्रियेत घेणारा जसा दोषी, तसाच देणाराही तेवढाच दोषी आहे. तसेच अधिकारी वर्गच आपली दहा टक्के रक्कम मागत असल्यानं व ती रक्कम लाखोच्या घरात असल्यानं संस्थाचालकही लाखोच्या घरात उमेदवाराला रक्कम मागत असतात. मग घोटाळा होतो व तो उघडकीस येतो. ज्याला न्यायालय पायबंद लावू शकते. परंतु न्यायालय या ठिकाणी संदिग्ध भुमिका घेत असते. ते संबंधित प्रकरणात सर्व चौकशी आणि निर्णय घेण्याचे अधिकार अधिकारी वर्गालाच सोपवते आणि अहवाल मागते. मग अधिकारी वर्ग हा आधीच अशा संस्थाचालकाच्या पैशाची टक्केवारी देण्याने दबेल असतो. तो न्यायालय महोदयाच्या आदेशाचा पुरेपूर फायदा घेतो व स्वतःच निर्णय घेवून परस्पर वाद मिटवून टाकतो व चोराला अभय देवून शावाची हत्या करतो. याचाच अर्थ असा की न्यायालय हे निर्णय घेण्याचा अधिकार चोरालाच देतं व चोरही मग निर्णय घेवून आपल्याच हिताची गोष्ट घडवून आणतो.
         केशरला याबाबतीत गतकाळातील एक उदाहरण आठवत होतं. त्या उदाहरणानुसार एका मुख्याध्यापकाची संस्थाचालकासोबत न्यायालयात केस सुरु होती. त्या संस्थाचालकानं शाळा चालविण्यासाठी मुख्याध्यापकाला पुरेसा रेकॉर्ड दिला नव्हता. यावर न्यायालयानं निर्णय घेण्याचा अधिकार अधिकारी वर्गाला सोपवला व अहवाल मागीतला. परंतु अधिकारी वर्गानं न्यायालयानं ज्या गोष्टीवर निर्णय घ्यावा. असं सुचीत केलं. ती गोष्ट न पाहता सरळ सरळ मुख्याध्यापक पदावरुनच संबंधीत मुख्याध्यापकाला हटवलं व दुसऱ्याला मुख्याध्यापक पद दिलं. हा अन्याय झाला. होता संबंधीत मुख्याध्यापकावर. परंतु आणखी जास्तीचा वाद नको म्हणून संबंधीत मुख्याध्यापक अधिकारी वर्गाच्या वागण्यातून चूप बसला होता. दुसरं एक उदाहरण होतं. तेही मुख्याध्यापक पदाचंच होतं. संस्थाचालकानं त्याचं पद नाकारलं होतं. त्यानं अधिकारी वर्गालाच जुळवून घेवून दुसऱ्याच शिक्षकांचं पद आणलं होतं. त्यावर आक्षेप घेवून संबंधीत व्यक्ती न्यायालयात गेला होता. सदर प्रकरणात संस्थाचालकाची मनमानी होती व त्याला आपल्या नातेवाईकाला पद द्यायचे होते. त्यानं संबंधीत अधिकारी वर्गाला पैसे दिले व सदर व्यक्तीचं पद डावलून अधिकारी वर्गामार्फतच आपल्या नातेवाईकाचं पद आणलं. अशावेळेस संबंधीत व्यक्ती हा न्यायालयात गेला. परंतु त्यावर न्यायालयानं त्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार हा अधिकारी वर्गाला दिला व अहवाल मागितला. ज्यात चोरालाच निर्णय घेण्याचा अधिकार मिळाला. ज्यानं ते पद संस्थाचालकाला विकत दिलं होतं, गैरकायदेशीरच मार्गानं. याबाबतीत दुसरं एक प्रकरण केशरला असं आठवत होतं की या प्रकरणात संस्थाचालकानं एका शिक्षिकेची पदभरती बंद असलेल्याच काळात विनाअनुदानित तुकडीवर नेमणूक केली होती. त्यानंतर एकाच महिन्यात तिचीच नेमणूक अनुदानीत तुकडीवर झाली होती. पुढे प्रकरण उघडकीस आल्यानंतर ती नेमणूक रद्द झाली होती. त्यानंतर ती महिला शिक्षिका न्यायालयात गेली व न्यायालयानं ते प्रकरण संबंधीत अधिकारी वर्गाकडे स्थानांतरीत केलं व अहवाल मागीतला. त्यातच सदर प्रकरणावर निर्णय घेण्याचा अधिकार अधिकारी वर्गाला दिला. त्यानंतर अधिकारी वर्गानं काय केलं? त्यांनी परस्पर निर्णय घेतला व सदर प्रक्रियेत सन गत काही दिवसांपासून पदभरती बंद असतांनाही तिची नियुक्ती मान्य केली. असे का झाले? असे झाले अधिकारी वर्गामुळे. केशर विचारच करीत होता. अधिकारी हे टक्केवारीनुसार पैसा घेतात व कोणत्याही उमेदवाराला केव्हाही नियुक्त करतात. मग ते शासनाची पदभरती बंद आहे की नाही आहे. याचा विचारच करीत नाहीत. माझ्याही बाबतीत असंच घडलं. मी दोषी नसतांना मला कारणे दाखवा नोटीस देवून संस्थाचालकानं पदावरुन सारलं आणि अधिकारी वर्गानंही माझ्यातील सत्य गोष्टीची दखल घेतली नाही व मलाच दोषी ठरवलं. खरा दोषी संस्थाचालकच होता. परंतु तो पडद्याआड लपून राहिला आणि मी बदनाम झालो. कदाचीत मी जर पदावरुन दूर झालो नसतो तर आज चित्र काहीसे वेगळे असते. मी तुरुंगातही गेलो नसतो, ना मी दंग्यात सहभागी झालो असतो. 
         शिक्षक भरती घोटाळा होतो. कारण संस्थाचालकाजवळ भरपूर पैसा असतो व काल शिक्षकांनी जरी लाखो रुपये संस्थाचालकाला दिला असेल, तरी आज तो पैसा विसरुन संस्थाचालकानं आणखी शिक्षकांकडून दरमहा दहा ते वीस हजार रुपये वसूल करण्याचे तंत्र अवलंबिले आहे. या घोटाळ्यातही संस्थाचालकानं असाच पैसा अधिकारी वर्गाला देवून पदभरती बंद असतांनाही पदं आणलीत. ही सर्व प्रक्रिया मुख्याध्यापकामार्फत केली गेली. ज्यात मुख्याध्यापकाला दोषी धरलं गेलं. परंतु सदर प्रकरणात मुख्याध्यापक दोषी नव्हता. कारण त्यानं जर ती गोष्ट केली नसती तर त्याला संस्थाचालकाचं ऐकलं नाही म्हणून निलंबित व्हावं लागलं असतं. कारण निलंबित करण्याचे अधिकार हे संस्थेला होते व संस्था कोणतीही कारणं पुढे करुन निलंबित करु शकत होती. ज्यात भरुन द्यावा लागणारा पैसा असे शिक्षक भरती घोटाळ्यातील सहभागी शिक्षक करतात. 
          आज उघडकीस आलेल्या प्रकरणावरुन वाटते की शिक्षक भरती घोटाळा झाला म्हणजे झालाच. ती बाब सत्यच आहे. आता त्यात वकील मंडळी किंवा भावनाहीन पक्ष म्हणत आहेत की शिक्षक भरती घोटाळा उघडकीस आला असला तरी दोषींवर कारवाई होवू नये. कारण दोषी शिक्षकांनी आपली जमीन विकून वा कर्ज काढून पन्नास लाख रुपये नियुक्तीसाठी दिले. त्यानंतर ते नियुक्त झाले व आता त्यांचेवर सात आठ लोकं अवलंबून आहेत. ज्याला न्यायालयातही अभय मिळू शकते. 
          हे ठीक आहे की आज शिक्षक भरती घोटाळा उघडकीस आल्यानंतरही अशा दोषी शिक्षकांवर कारवाई होवू नये. कारण त्या शिक्षकांनी नियुक्तीसाठी पैसे देण्यासाठी लाखो रुपयाचं कर्ज उचललं. शेतजमीन विकली. त्याचेवर सात आठ लोकं अवलंबून आहेत. परंतु असे अभय दिल्याने खरंच देशातील भ्रष्टाचार कमी होईल की त्या भ्रष्टाचाराला खतपाणी मिळेल. आज लहान लहान कामासाठी शिक्षण विभागच नाही तर सर्व सरकारी कार्यालयात पैसाच लागतो. पैसा फेकला तर कोणतीही कामं पटकन होतात. अन् नाही फेकला तर तीच कामं व्हायला वेळ लागतो. शिवाय या शिक्षक भरती घोटाळ्यात वाळलेही जाळले गेले आहे व ओलेही जाळले गेले आहे. म्हणजेच जी मंडळी संस्थेत आधी काम करीत होती. त्यांना त्याच शाळेतील संस्थाचालकानं त्यांनी दहा दहा वर्ष काम करुनही काढून फेकले आहे व त्याजागी अशा नवीन लोकांना की ज्यांनी पन्नास पन्नास लाख रुपये दिलेत. त्यांना घेतले आहे. याचं कारण असे की जे राबत होते मागील दहा वर्षापासून. त्यांच्याजवळ संस्थाचालकाला द्यायला पैसे नव्हते व ते गरीब होते. ते पैसे देवूच शकत नव्हते. म्हणूनच ते मुकाट्यानं निघाले आणि ह्या नवीन उमेदवारांनी कर्ज काढून व शेत विकून पैसे दिले. आता भ्रष्टाचार उघडकीस आल्यानंतर नोकरीवर गाज येईल या भीतीनं अश्रू येतात. परंतु आता हा विचार डोक्यात येणार नाही की आपल्या अशा वागण्यानं संस्थाचालकानं त्यांच्याच शाळेतील नियुक्त असलेल्या शिक्षकांच्या श्रमाची हत्या केली. त्यावेळेस त्यांना कसे वाटत असेल. खरं तर आजच्या शिक्षक भरती घोटाळ्यातील दोषी जर कोणी असेल तर पहिला अधिकारी जर असेल तर त्यानंतर शिक्षक आणि संस्थाचालकही तेवढाच दोषी आहे. कारण जेवढा घेणारा दोषी असतो. तेवढाच देणाराही असतो. परंतु आता देणाऱ्यांनी काल दिलेला पैसा संस्थाचालकाकडून मागावा. व्याजासह मागावा. न्यायालयानं तसा आदेशच काढावा. त्याची संपत्ती विकून पैसे द्यायला भाग पाडावे. कारण खरा दोषी संस्थाचालकच आहे. असे जर झाले तर उद्या कोणताच संस्थाचालक भ्रष्टाचार करणार नाही. त्यातच अधिकारी वर्गानं अशा संस्थाचालकामार्फत पैसे घेतल्यामुळे त्यालाही दोषी ठरवत त्यांच्याही मालमत्तेला सीलबंद करावे. कारण कोणं सांगीतलं अधिकारी वर्गाला की एवढा पैसा लाटावा लागतो म्हणून. हे कार्य न्यायालयच करु शकतं. 
        शिक्षक भरती घोटाळ्यातील शिक्षकांनी नोकरीची अपेक्षा करु नये. कारण घोटाळा करायला आपणच प्रवृत्त केलेय. मी नोकरीत नियुक्त झालो पाहिजे या स्वार्थानं. आपण जर अशा संस्थाचालकाला स्वतःच्या स्वार्थासाठी पैसाच दिला नसता, तर असा घोटाळा झालाच नसता व गरीब होतकरु तरुणांना ज्या संस्थाचालकानं संस्थेतून काढून टाकलं. त्यांनाही काढून टाकलं नसतं. हे सत्य आहे. त्यात आपण स्वतः दोषी आहात.  
           शिक्षक भरती घोटाळा झालाय व तो उघडकीसही आलाय. आता यावर न्यायालयानं तरी पडदा टाकू नये. भ्रष्ट व दोषी लोकांवर न्यायालयानं आजतरी कारवाईचे आदेश द्यायला हवेत. कारवाई व्हायलाच हवी. कारण कारवाई जर झाली नाही तर उद्या हीच भ्रष्ट मंडळी मजबूत होतील व आपल्याला काहीच झाले नाही असा विचार करुन ते भ्रष्टाचाराच्या माध्यमाद्वारे इतरांच्या माणुसकीची, मेहनतीची कत्तल करतील. त्यातच त्यांच्या अधिकारपदाचीही आणि लाभाचीही हत्या करतील. केशरला असंच वाटत होतं. 
          आज केशरला आठवत होती त्याची शाळा व त्याच्या शाळेतील ते विद्यार्थी आणि शिक्षक. ज्याला संस्थाचालक लुट लुट लुटत होता. परंतु आज त्यानं राजकारणात येवून जे काही बदलाव केले होते. त्या बदलावानं शिक्षण क्षेत्रातही बरेच बदलाव झाले होते. त्यानं शिक्षकांच्या नियुक्ती आणि निलंबनाचे अधिकार हे संस्थेकडून काढून टाकले होते व ते अधिकार सरकारकडे गोळा केले होते. आज केशरनं तसं केल्यामुळं कोणताच संस्थाचालक पैसे कमविण्यासाठी ना विद्यार्थ्यांना लुटत होता ना तो शिक्षकांनाही लुटू शकत होता. 
         आज नियुक्ती व निलंबनाचे अधिकार संस्थाचालकाजवळ नव्हते. त्यामुळंच ना कोणताच भ्रष्टाचार होत होता. ना कोणताच घोटाळाही होत होता. तसेच कोणतेच संस्थाचालक विद्यार्थी व शिक्षकांना लुटत होते. तरीही काही संस्थाचालक आजही विद्यार्थ्यांना लुटत होते व प्रगतीचे मार्ग बंद करीत होते.
        आज केशर म्हातारा झाला होता. परंतु त्याला समाधान होतं. ते समाधान त्याच्या चेहर्‍यावर स्पष्ट झळकत होतं. ते त्यानं केलेल्या सुधारणा. त्यानं रास्त सुधारणा केल्या होत्या. ज्या सुधारणा त्याला त्याच्या शिक्षक असणाऱ्या काळात अपेक्षीत होत्या. ज्या सुधारणा प्रत्येक शिक्षकांच्या जीवनात वसंत आणण्यासाठी हव्या होत्या. ज्या सुधारणांनी त्याच्या जीवनात वसंत येणार होता. ज्या सुधारणांनी शिक्षकांचं जीवन बदलणार होतं. 
         ते जीवन बदललंही होतं. जसा तो सुखी झाला होता. तशीच आज समस्त शिक्षक मंडळीही सुखी झाली होती. आज त्याची पत्नीही त्याच्या घरी आली होती. तिच्यात व त्याच्यात प्रेम निर्माण झालं होतं. जे प्रेम त्यांच्या डोळ्यात झळकत होतं. 
         काल त्याच्या मनात जरी त्याला निलंबित केल्यानंतर जीवनाबद्दल असुया निर्माण झाली होती. कारण बालपणापासूनच तो चांगला वागला होता. परंतु निलंबित झाल्यानंतर आपल्या चांगल्या वागण्याचा काहीच उपयोग झाला नाही, असा विचार करुन त्यानं दंग्यात भाग घेतला होता. परंतु आज त्याच दंग्यानं त्याला तुरुंगात जावं लागलं होतं. हे जरी खरं असलं तरी त्याला तुरुंगातच सुधारण्याची संधी मिळाली होती. ज्या संधीचं त्यानं सोनं केलं होतं. तुरुंगातून शिक्षा भोगून आल्यानंतर त्यानं स्वतःला परीपुर्ण सुधरवून जो आपल्या स्वतःत बदल घडवला होता. तो वाखाणण्याजोगाच होता. म्हणतात की कैद्यांसाठी तुरुंग शिक्षेचं केंद्र आहे. परंतु ते आज त्याचेसाठी सुधारण्यानं केंद्र ठरलं होतं. 
          केशर म्हातारा झाला होता आणि तिही म्हातारी झाली होती. दोघंही सोबत सोबतच जीवन जगत होते. अशातच काळ आला व तो चालता झाला. परंतु आज लोकांना त्यानं केलेल्या सुधारणा आठवत होत्या. आठवत होता तो बहाद्दरगड. ज्या गडाचं नाव आता धर्मवीरगड झालं होतं. ज्या धर्मवीरगडावरही आज सुधारणा झाल्या होत्या. ज्या सुधारणा त्याच्याच प्रयत्नांनी झाल्या होत्या. तो आजही महाराष्ट्रात राहात होता व त्या महाराष्ट्रात त्याचं आजही नाव चालत होतं. आजही लोकं त्याला भेटायला येत असत. ते लोकं त्याला भेटायला येत असल्यानं त्याची पत्नी आज जगात नसतांनाही त्याला एकाकी वाटत नव्हतं. आज तो सुखी होता, त्यानं केलेल्या चांगल्या गोष्टीमुळं. ज्या चांगल्या गोष्टी त्याला दंग्यामुळं करता आल्या होत्या. जर दंगा झाला नसता व तो तुरुंगात गेला नसता तर त्याला चांगल्या गोष्टी करताच आल्या नसत्या.