Bolka Vruddhashram - 2 in Marathi Women Focused by Ankush Shingade books and stories PDF | बोलका वृद्धाश्रम - 2

Featured Books
Categories
Share

बोलका वृद्धाश्रम - 2

             
          

         आज काळ बदलला आहे व बदलत्या काळानुसार आपल्याला अमेरिका हा देश पहिल्या क्रमांकाचा वाटत आहे. तसं पाहिल्यास अमेरिकेचा जन्म मुळात अर्वाचीन काळातील. तेथील संस्कृतीही अर्वाचीन काळातील. त्यातच त्या देशाचा शोध मॅगेलॉन व कोलंबस यांनी लावला. तोही अलिकडील काळातच. तरीही आपण त्या देशाचा आदर्श घेतो. त्याची संस्कृती महान समजतो. त्यांच्या संस्कृतीनुसार वागतो. त्यातच आपले कपडे, आपलं रहनसहन बदलवीत असतो. हे जरी खरं असलं तरी आपली भारतीय संस्कृती ही काही कोणत्याही बाबतीत कमी नाही. ती इतर देशांपेक्षा महान आहे आणि बरंच काही आपल्याला शिकविणारीही आहे.
         अमेरिका हा देश जागतिक महासत्ताच. गेल्या शंभर वर्षापासून तो जागतिक महासत्ता आहे व तसा दर्जा तो टिकवून आहे. या देशाचं वैशिष्ट्य म्हणजे तो देश आपल्यापेक्षा इतर कोणत्याही देशाला पुढे जावू देत नाही. जपाननं पुढं जाण्याचा प्रयत्न केला. त्याला मागे टाकलं. रशियाचे तुकडे केले. याचाच अर्थ असा की जागतिक स्तरावर जो देश त्या देशापेक्षा पुढे जाण्याचा प्रयत्न करेल. त्याला नेस्तनाबूत करण्यासाठी तो देश आपल्याकडील कोट्यवधी पैसे खर्च करुन त्याला जागतिक स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखवेल म्हणजे दाखवेलच. ही सत्य बाब आहे. 
         आज जगात आपल्याला कोणत्याही देशाचा अभ्यास केल्यास आज जे वातावरण तिथं आहे. ते पुर्वी नव्हतं असं दिसतंय. तेथील संस्कृती ही त्या देशातील हवामान, तेथील रहनसहन, तेथील भौगोलिक परिस्थिती यावर अवलंबून असते. तसा वारसा त्या देशांना लाभलेलाही दिसत नाही. त्यातच जागतिक अभ्यास करतांना कोणत्याही देशाची संस्कृती महान व कोणत्या देशाची संस्कृती ही लहान. याचा सर्वतोपरीनं अभ्यास करणं गरजेचं आहे. परंतु आज आपण तसा अभ्यास करायचे टाळतो. कारण जागतिक बाजारपेठेत आपल्या रुपयाचं मुल्य हे अमेरिकेच्या डालरमध्ये मोजले जाते. आज अमेरिका विकसीत देश असल्यानं त्यांच्याच डालरनुसार पैसे मोजले जातात व मुल्य ठरवलं जातं. 
        आपली भारतीय संस्कृती ही फार प्राचीन आणि प्रमाणबद्ध होती. हे पुर्वी भारतात असलेल्या व अलिकडील काळात पाकिस्तानात गेलेल्या मोहेंजोदारो आणि हडप्पाच्या शहरावरुन दिसून येते. या शहरातील रचना, तेथील स्री पुरुषांचं वागणं. त्यांचा पोशाख, त्यांची वापरायची भांडी. या सर्वच गोष्टी विलक्षणीय आहेत. तो प्राचीन काळ असूनही त्या काळात अर्धनग्न वस्र वापरणारी एखादी महिला सापडत नाही. मात्र अलिकडील काळात विदेशी वातावरणात रमलेल्या व अंगावर कपडे सहन न करणाऱ्या संस्कृतीचे अवलोकन आणि अनुकरण करणाऱ्या संस्कृत्या दिसतात. या संस्कृत्या त्याच देशाला महान मानत असतात. ज्या देशात अर्धनग्न स्वरुपाचे कपडे घालतात नव्हे तर त्या देशात एका पुरुषांजवळ न टिकता अनेक विवाह करीत असलेले व्यक्ती आढळतात. तसेच आपल्या स्वलेकरांना अनाथालयात व आपल्या जन्मदात्या आईवडीलांना नाईलाजास्तव वृद्धाश्रमात जायला भाग पाडणारे लोकं आढळतात.
         विशेष म्हणजे आपली संस्कृती महान आहे. ही संस्कृती आधीपासूनच सर्वच बाबतीत महान आहे. मग ते शिक्षण क्षेत्र असो वा उद्योग क्षेत्र असो, मान सन्मान असो वा इतर कोणतंही क्षेत्र असो. आपली संस्कृती ही शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक, आर्थिक, राजकीय, बौद्धिक वा इतर सर्व गोष्टीत महान आहे. शिक्षणाच्या बाबतीत सांगायचं झाल्यास आपण तक्षशिला आणि नालंदा विद्यापीठाची नावे ऐकली असतीलच. या भारतात केवळ नालंदा व तक्षशिला नावाची दोनच विद्यापीठं नव्हती तर अशी बरीच विद्यापीठं भारतात अस्तित्वात होती की ज्या विद्यापीठात अभ्यास करायला विदेशी लोकं येत असत. ते तेथे प्रवेश करीत व शिक्षण घेवून भारतीय संस्कृतीचा अभ्यास करत. एवढी महान संस्कृती भारताची आहे. आर्थिक बाबींतून भारताचा विचार केल्यास त्यातही सुसंपन्नच होता भारत देश. म्हणतात की या भारताला समुद्रगुप्तच्या काळात सुवर्णयुग समजलं जायचं. शिवाय या भारतावर मोहम्मद गझणीनं सतरा स्वाऱ्या करुन लुटलूट लुटलं. पुढं मुगलांनी लुटलं. त्यानंतर भारतात आलेल्या इंग्रजांनी लुटलं. तरीही भारतातील संपत्ती संपली नाही. एवढा भारत आर्थिक क्षेत्रात आघाडीवर होता आणि आहे. धार्मिक क्षेत्राबाबत सांगायचं झाल्यास भारतात पुर्वीपासूनच अनेक धर्म अस्तित्वात आहेत. जसे, जैन, बौद्ध, वैदिक. परंतु थोडासा क्रुरतेचा इतिहास सोडला तर प्रत्येक धर्म आनंदानं नांदत होता. तसाच राजकीय स्तर पाहिला तर असं जाणवते की राजकीय क्षेत्रातही भारत आघाडीवर होता. अनेक विद्येत भारतातील राजे रजवाडे पारंगत असून त्याची कल्पना रामायण कालीन व महाभारत कालीन वापरल्या गेलेल्या अस्रशस्रावरुन येते. याचाच अर्थ असा की अस्रशस्राबाबतही भारतीय लोकांना किती ज्ञान होतं. परंतु अलिकडील काळात रामायण काळ व महाभारत काळ झालाच नाही. असे काही मंडळी मानतात. शिवाय इथे जन्मलेल्या पृथ्वीराज चव्हाणला शब्दभेदी बाण चालविण्याचं ज्ञान होतं. 
         सामाजिक भाग पाहताना काही विघातक गोष्टी जर सोडल्या तर आपली अब्रू जावू न देणाऱ्या स्रिया भारतात होत्या. त्यांनी सतिप्रथेअंतर्गत जोहार पसंत केला. परंतु अब्रू जावू दिली नाही. तसेच पुर्वी भेदभावही नसून सामाजिक समता होती व एक अस्पृश्य जातीतील व्यक्ती ब्राम्हण जातीत आपल्या कर्मावरुन जावू शकत होता. जसे विश्वामित्र क्षत्रीय असून आपल्या कर्मानं त्यानं ब्रम्ह पद प्राप्त केलं होतं. व्यासांचंही तेच झालं. व्यास मासे पकडणाऱ्या व्यक्तीचा मुलगा. परंतु त्याच्या कर्मानं त्याला ब्रम्ह पद मिळालं. बौद्धिक क्षेत्रातही भारत पिछाडीवर नव्हताच. या क्षेत्रात काल झालेले संशोधन आज दिसत आहे. या देशात पुर्वी आर्यभट्ट, वराहमिहीर, महर्षी कणाद होवून गेले की ज्यांनी बौद्धिक क्षेत्रात सुबकता आणली होती. याचाच अर्थ असा की भारतीय संस्कृती ही सर्वच बाबतीत महान अशी संस्कृती होती. 
          संस्कृती........ जगातील संस्कृतीचा अभ्यास करतांना भारतीय संस्कृती महान असल्याची दिसते. येथे कालमितीस उत्खनन झालेली हडप्पा व मोहेंजोदारोची संस्कृती ही जगातील प्राचीन संस्कृती होती व ती विकसीत संस्कृती होती असं प्रकर्षानं जाणवतं. महत्वपुर्ण बाब ही की आमची भारतीय संस्कृती एवढी महान असतांना आम्ही भारतवासी का बरं विदेशी संस्कृतींच्या मागे लागतो? तशीच आमच्याच देशात शिक्षणाची गंगा वाहात असतांना का बरं आता आम्ही विदेशातील ऑक्सफोर्ड व केब्रीज विद्यापीठात शिकायला जातो? त्यातच आमचाच देश आधीपासूनच सुजलाम सुफलाम असतांना आम्ही केवळ पैशाच्या हव्यासासाठी विदेशात जातो? तसेच पुर्वी आमच्याच देशात बुद्धीवंत जन्मास आले असतांना आम्ही का बरं आज विदेशी लोकांना हुशार समजतो? तसं पाहिल्यास सर्वच बाबतीत भारत महान असून भारतानंच विदेशी लोकांना आपल्या महान संस्कृतीची देणगी दिलेली आहे. आज आपल्याच संस्कृतीचं पालन विदेशी लोकं करीत असतांना आम्ही त्यांची संस्कृती पालन करुन त्यांचे महत्व वाढविणे बरोबर नाही. महत्वाची गोष्ट ही की आम्ही आमचीच संस्कृती पाळावी. तिलाच महान समजावे. विदेशी संस्कृतीचं पालन करु नये. भारतातच शिकावे. विदेशात शिकायला जावू नये. तसेच आपल्या देशात कमी वेतन मिळते म्हणून केवळ आपण आपला स्वार्थ पाहात विदेशात नोकरी करण्यासाठी जावू नये. भारतातच उद्योग उभारण्यास मदत करावी नव्हे तर या देशालाच सुजलाम सुफलाम बनवावे म्हणजे झालं. कारण भारत महान आहे आणि येथील संस्कृतीही तेवढीच महान आहे. यात शंका नाही. 
           आज आपण पाहतो की काही लोकं हे बरोबर वागत नाहीत. त्यामुळंच आपली आणि पाश्चिमात्य या दोन्ही संस्कृत्या बदनाम होत आहेत. काही लोकं पाश्चिमात्य संस्कृतीला दोष देत आहेत तर काही आपल्या संस्कृतीला दोष देत आहेत. त्यावर उपाय म्हणजे आपल्याच लोकांनी आपलं वागणं सुधारावं. जेणेकरुन आपल्या संस्कृतीचं महत्वपण टिकेल व पाश्चिमात्य संस्कृतीही बदनाम होणार नाही.
         भारतीय संस्कृती ही प्राचीन आहे व ती आपल्याला आवडायलाच हवी. परंतु आपण पाहात आलेलो आहोत की ही भारतीय संस्कृती बऱ्याचजणांना आवडत नाही. त्याचं कारण आहे, त्यांचा विचार. तसं पाहिल्यास प्रत्येकाची विचार करण्याची शैली वेगवेगळ्याच स्वरुपाची आहे.
          विचारसरणीबद्दल सांगायचं झाल्यास आपण पुर्वकालात जावू. पुर्वकालातही विचार करण्याची प्रक्रिया ही स्वार्थीच होती. मीपणाला जास्त वाव होता. याच मी पणातून जास्त भांडणं होत असत. मीपण टिकावं. माझं अस्तित्व टिकावं. माझं राज्य टिकावं. म्हणूनच पुर्वीचे राजे रजवाडे हे स्वार्थी भावनेतून एकमेकांवर आक्रमण करीत. त्यातच एकमेकांचे राज्य हस्तगत करत. त्यानंतर कर विनीमयाची पद्धत बदलवीत. परंतु प्रत्येक राजे रजवाड्यात राज्यकारभार करण्यासंबंधी एक साम्य होतं. त्यांनी शिक्षणाच्या पद्धती बदलवल्या नाहीत. त्या पद्धती तशाच ठेवल्या व त्याच सुरु ठेवल्या होत्या. जी पुर्वी शिक्षणाची पद्धत होती. तशीच दुसरी महत्वाची गोष्ट बदलवली नाही. ती म्हणजे येथील संस्कृती. येथे असलेल्या संस्कृतीला साधा धक्का सुद्धा लावला नाही. म्हणूनच अनादीकालापासून सतीप्रथा, केशवेपण, देवदासीप्रथा, बालविवाह प्रथा सुरु राहिल्या. त्याचं कारण होतं, येथील पुरुषी मानसिकतेतील विकृत पौरुषत्वाला बंदी घालणं. त्या विकृत मानसिकता होत्या, येथील स्रिजातीला छळणं. स्रिजातीला कोणी छळू नये म्हणून तथाकथीत लोकांनी त्यांच्या सुरक्षिततेसाठी काही प्रथा आणल्या होत्या. ज्यात सतीप्रथा, देवदासीप्रथा, बालविवाह, व केशवेपण यांचा समावेश असेल. कदाचीत युद्धात पती मरण पावल्यानंतर त्याच्या पत्नीला कोणीही छळू नये म्हणून सुरुवातीला तिला जर वाटत असेल की तिनं आपल्या पतीच्या चितेवर सती जावं व तिला भविष्यात होणाऱ्या त्रासापासून मुक्तता मिळावी. अर्थात तिच्यावर तिच्या विधवेपणाच्या असहाय्यतेचा गैरफायदा कोणीही घेवू नये व संस्कृती बदनाम होवू नये. म्हणून सतीप्रथा नावाची प्रथा अस्तित्वात आली. सुरुवातीला ती प्रथा स्वखुशीनं पती चितेवर सती जाण्याची होती. परंतु कालांतरानं त्यात बदलाव झाला व त्यात जबरदस्ती शिरली. तशीच एखादी स्री मोठी होतांना कुण्या भामट्याचं तिच्या रुपाकडे लक्ष जावू नये वा तिचंही लक्ष एखाद्या भामट्याकडे जावून तिची सवय बिघडू नये वा तिच्या वागण्यानं सामाजिक संस्कृतीला उच्छेद पडू नये वा ती बदनाम होवू नये म्हणून बालविवाह प्रथा आली. त्यातच जर एखाद्यावेळेस एखाद्या स्रिची सती जाण्याची इच्छा नसेल आणि तिला जीवंत राहायचंच असेल, तर तिचं संरक्षण व्हावं. तिच्या विधवेपणाच्या असहायतेचा गैरफायदा कोणीही घेवू नये म्हणून तिचं केशवपण करुन तिला विद्रूप करण्याची पद्धती रुढ झाली. जेणेकरुन कोणत्याही भामट्याचं लक्ष तिच्या देहाकडे जावू नये व तिच्यावर त्याला अत्याचार करता येवू नये. हाही प्रकार म्हणजे संस्कृतीला बदनाम होण्यापासून थांबविणारा प्रकार होता. त्यातच समजा एखाद्या पुरुषात अचानक वासनेची भावना उत्पन्न झालीच आणि ती त्याला नियंत्रित करता येत नसेल तर देवदासी प्रथा होती. देवदासी म्हणजे त्या काळातील गावकऱ्यांची वेश्याच होती. परंतु त्या पेशाला शुद्ध स्वरुपात नाव दिल्या गेलं होतं देवदासी. अर्थात त्या नावावरुन ती देवदासी जरी परपुरुषांसोबत त्याच्या वासनेच्या भावनेची परीपुर्ती करतांना झोपत असेल तरी ती व तो पुरुष बदनाम होवू नये. ज्यातून असे वारंवार घडले तरी संस्कृतीला धक्का लागू नये म्हणून देवाचे नाव लावून त्या स्रिला सती बनविण्याची पद्धती आली. ज्यातून आम्रपाली सारख्या कित्येक सुंदर मुलींना त्या वयात येण्यापुर्वी नगरवधू बनविलं जावून छळण्यात आलं. तशाच अशा कित्येक देवदासींच्या मनात इच्छा नसतांना त्यांच्या इच्छेचा संस्कृती बदनाम होवू नये म्हणून बळी देण्यात आला. 
         तो काळ आणि त्या काळात ठरविले गेलेले नियम. हे कदाचीत त्या काळासाठी योग्य असले व ते संस्कृती बदनाम होवू नये म्हणून त्या संस्कृतीला धरुन असले, तरी ते नियम स्रियांच्या विचारशक्तीला धरुन नव्हते. कारण एका स्रिचा पती मरण पावल्यानंतर तिला जेव्हा परीवार सती जायला सांगत वा ती स्वखुशीनं सती जाण्याचा निर्णय घेत असे. तेव्हा तिचा पती मरण पावल्यानंतर तिच्यात निर्णय घेण्याची क्षमता तरी असेल काय? ही बाब खरंच विचार करायला लावणारी बाब होती. शिवाय ती बाब स्रियांच्या मनाच्या बाजूने नसायची. तशीच एखादी विधवा स्री असेल, तर तिच्या विधवेपणानं असहाय्य पणाचा फायदा घेवून तिच्यासोबत अनैसर्गिक कृत्य करणं अर्थात व्याभिचार करणं. ही बाब जरी न्यायसंगत असली तरी त्यातून त्या विधवा झालेल्या स्रिचे जेव्हा केसं काढले जात. तेव्हा तिची केसं काढू द्यायचे की नाही. हा विचार करणारी मानसिकता नसायची. त्यांचे संस्कृती बदनामीकरणच्या नावावर केसं काढले जात. कारण त्या काळात युद्ध होत असल्यानं बऱ्याच स्रिया या विधवा होत व त्या विधवा झालेल्या स्रियांवर जिंकलेल्या राज्यातील मंत्रीगण वारंवार अत्याचार करीत असत नव्हे तर बलात्कार करीत असत. हीच पौरुषी मानसिकता लक्षात घेवून नराधम पिसाळू नयेत म्हणून बालविवाह सुरु केले गेले. तशाच देवदासी प्रथा आणल्या गेल्यात. परंतु सुरुवातीपासूनच या प्रथा चांगल्या नव्हत्या, जरी बालविवाह झाल्यानंतर काही दिवसपर्यंत मुली मायबापाच्या घरी राहात असल्या तरी. कारण त्या जेव्हा सासरला नांदायला जात, अर्थात गौणा होत असे. तेव्हाही त्यांचं वय हे कमीच असायचं. ते त्यांना समजदारी आल्यासारखं नसायचंच. पुढे त्यात आणखी बदलाव झाला व क्रुरता शिरली. त्या क्रुरतेनुसार बालविवाहात मुली अगदी अल्प वयाच्या असायच्या आणि नवरे अगदी वयोवृद्ध असायचे. ते विजोड विवाह असायचे. ज्यात पती मरण पावत असत. अन् ते पतीचं मरणही पत्नी असणाऱ्या मुलींना कळायचं नाही. कारण त्या मुली समजदारीच्या पलिकडे अर्थात नाबालिक असायच्या. त्यातच अशा कौमार्य वयातील मुलींवर सासू असेल तर सासूचा अत्याचार व्हायचा.
         बालविवाह प्रथेत मुली या नाबालिक असत व त्यांना समजदारी आलेली नसायची. ज्यातून त्यांचे पती असलेल्या एका नराधमाचा रोजच अत्याचारस्वरुप बलात्कार होत असे. त्यातच अशा मुलींवर वारंवार अत्याचारस्वरुप बलात्कार होत असला तरी त्यावर आवाज उठविणारं वा बोलणारं कोणी नव्हतं. तसंच वेगवेगळ्या आजारावरील औषधांचं संशोधन न झाल्यानं त्या काळात निसर्गातूनच उद्भवणाऱ्या आजाराच्या प्रमाणावर मायबापांना नियंत्रण करता येत नसल्यानं बरीचशी मुलं दगावत असत. ज्यातून आईवडील जास्तीत जास्त मुलं जन्माला घालत. त्याच प्रकारातून पुढे त्यांच्या स्वमुलीचा विवाह करतांना प्रत्यक्ष आईवडील आपल्या मुलीचा कोणाशीही विवाह करुन देत. मग ते वयोवृद्ध का असेना वा त्यांच्यावर कोण्याही व्यक्तींकडून अत्याचार का होत असेना वा अत्याचारस्वरुप बलात्कार का होत असेना. त्यावर कोणीच बोलायला तयार नसत. प्रत्यक्ष आईवडील देखील. बिचारी मुलगी, तिचा गुन्हा असायचा, तिचं स्री म्हणून जन्मास येणं. ती आपल्यावर होणाऱ्या अत्याचारावर दादही मागू शकायची नाही. कारण तिचं ऐकून घेणारं कोणीच नसायचं. प्रत्यक्ष आईवडील देखील नसायचे. कारण त्यांना जास्त लेकरं असायची. त्यामुळंच त्या मुलीला कुठेच न्याय मिळायचा नाही व आपल्यावर होत असणारे अत्याचार ती निमुटपणानं सहन करायची.
          देवदासी प्रथेतही तसंच होतं. काही स्रियांना लेकरं होत नसत. अशावेळेस कावळा फांदीवर बसल्यागत एखादी स्री नवश बोलायची व म्हणायची की मला पहिला पुत्र झाल्यावर मी ते मुल देवाला वाहील. ज्यात पहिलं अपत्य मुलगी झाल्यास तिची आई तिला देवाला वाहात असे. अर्थात देवदासी बनवीत असे. त्यानंतर जी मुलगी देवदासी बनत असे. त्याच मुलींवर ती वयात येण्यापुर्वी देवाला न घाबरता गावातील वयोवृद्ध माणसंही अत्याचारस्वरुप बलात्कार करीत असत आणि तिचंही कोणी ऐकत नसे वा तिच्यावर होणाऱ्या अत्याचारावर कोणीही तो अत्याचार ऐकून न घेता तिला दाद मागून देत नसत. 
         बालविवाह, सतीप्रथा, केशवेपण व देवदासी या कुप्रथा होत्या व त्यावर कोणीही काही बोलून विरोध करीत नसे. सुरुवातीला त्या प्रथा कुप्रथा म्हणून उदयास आल्या नाहीत व आणल्या गेल्या नाहीत. कारण त्याचं महत्व महान आहे असं प्रकर्षानं लोकांच्या मनात बिंबवलं गेलं व कोणीही त्या प्रथांच्या विरोधात बोलत नव्हताच. कारण त्या प्रथेच्या विरोधात बोलणं म्हणजे संस्कृतीला बदनाम करणारी गोष्ट आहे, असं सर्वांचं म्हणणं आणि मानणं होतं. परंतु तसा काळ बदलला व पाश्चिमात्यीकरण झालं. तशा त्या प्रथा कुप्रथा वाटायला लागल्या. ज्यातून त्या प्रथा बंद झाल्या व संस्कृती बदलली. ती एवढी बदलली की आज आपली महत्वपण जपणारी संस्कृती बदनाम होत आहे. काही लोकं आजच्या पाश्चिमात्य संस्कृतीच्या वागण्यावरुन आपल्या मुळातील महत्वाच्या असणाऱ्या संस्कृतीला विसरुन जात आहेत आणि पाश्चिमात्य संस्कृतीचं अनुकरण करीत आहेत. ते विचारही करीत नाहीत की आपली संस्कृती किती महान आहे. विशेष सांगायचं झाल्यास आपली संस्कृती ही महान आहे व या संस्कृतीनं ज्याही प्रथा पुर्वी आणल्या होत्या. त्या जरी कुप्रथा होत्या, तरी समाजातील नराधम पिसाळू नये म्हणून आणल्या होत्या. ज्यातून त्यांचा उद्देश संस्कृती बदनाम होवू नये असा होता. आज त्या प्रथा नाहीत. कारण त्या कुप्रथा होत्या व त्या कुप्रथा बंद करणे अत्यावश्यक होते. परंतु आज त्या प्रथा बंद झाल्याने आजचे नराधम पिसाळत चालले आहेत. ते आजच्या काळात कोणावरही केव्हाही बलात्कार करीत सुटले आहेत. आज त्यांच्या बलात्कारातून अगदी चार वर्षाच्या बालिकाही सुटत नाहीत. अन् हे सगळं घडतं पाश्चिमात्य देशाच्या संस्कृतीचा अंगीकार केल्यानं. ते तिकडे वातावरण दमट आहे म्हणून तोकडे कपडे वापरतात आणि आपल्या देशात फॅशनच्या नावाखाली आपण तोकडे कपडे वापरतो. तिकडे सेक्सच्या भावनेला सामान्य समजलं जातं आणि आपल्याकडे सेक्सच्या भावनेला सामान्य समजलं जात नाही. कारण आपली संस्कृती आपल्याला तसं शिकवीत नाही. ती कोणत्याही पुरुषाला सेक्स करायला परवानगी देत नाही. त्याचाही एक नियम बनवला आहे. तो नियम म्हणजे विवाह. ज्यातून संस्कृती बदनाम होत नाही. परंतु बालविवाह, देवदासीप्रथा बंद झाल्यानं व पाश्चिमात्य संस्कृतीच्या अनुषंगानं तोकडे कपडे आपल्या संस्कृतीतील लोकं वापरत असल्यानं आजच्या लोकांचे लक्ष ते तोकडे कपडे विचलीत करतात. मग मुली विवाह योग्य होण्यापुर्वीच वा कोणत्याही स्रीवर आजच्या पुरुषांची मादक भावना बलात्कार करण्यासाठी वळवळते. ज्यातून आजचे इतर नराधम पिसाळले असून ते कुणावरही केव्हाही बलात्कार करतात. ज्यातून संस्कृती बदनाम होत चालली आहे. हे सगळं जुन्या प्रथा बंद झाल्यानं नाही तर पाश्चिमात्य संस्कृतीचा अंगीकार केल्यानं होत आहे.
         महत्वाचं सांगायचं झाल्यास आपली संस्कृती ही महान आहे. तशी पाश्चिमात्य देशातील संस्कृती नाही. फक्त ती थोड्याशा आपल्याच देशातील कुप्रथांमुळं बदनाम झाली आहे. ज्या प्रथा आज बंद झाल्या आहेत. असे असतांना आपल्या देशातील लोकांनी पाश्चिमात्य संस्कृती का पाळावी? हं, बदल करु नये असं नाही. बदल करावाच, आपल्या वागण्यात. आपल्या रहनसहनमध्ये. चांगले नक्कीच घेतले पाहिजे आणि ते घ्यायलाही हवे. परंतु याचा अर्थ असा नाही की आपण पाश्चिमात्य संस्कृतीचा अंगीकार करुन कसेही वागावे. जेणेकरुन त्यातून आपलाही बिघाड होईल आणि आपली संस्कृतीही तेवढीच बदनाम होईल. विशेष म्हणजे आपलं वागणं असं असावं की आपली संस्कृती बदनाम होवू नये आणि पाश्चिमात्य संस्कृतीही बदनाम होवू नये हे तेवढंच खरं.
            काही मुलं निश्चीतच वात्रट स्वभावाची असतात. हा वात्रटपणा अगदी लहानपणापासूनच मुलांमध्ये भरलेला दिसतो. परंतु त्यावेळेस ते बाळ लहान असल्यानं त्याकडे दुर्लक्ष करुन आपण सोडून देतो. परंतु तो वात्रटपणा जसजसे मुल मोठे होवू लागते. तसतसा वाढत जातो. त्यातच असा वात्रटपणा वाढला की तो त्यांच्या आईवडिलांच्या जिव्हारी लागत असतो.
        मुलं लहान असतात. ती चांगली वागत नसतात. तेव्हा त्यांचं वागणं पाहून आईवडील व शेजारी यांना मनस्ताप वाटत नाही. परंतु ती जेव्हा मोठी होतात. तरुण होतात. तेव्हा मात्र खुद्द त्यांच्या आईवडील व शेजारी पाजारी यांना त्यांचा मनस्ताप वाटत असतो. कारण त्यांचं वात्रट वागणं. तसं वात्रट वागण्यानं खुद्द आईवडीलच नाही तर शेजाऱ्यांनाही त्रासच असतो. ज्यातून आईवडील सारखे तीळ तीळ तुटत असतात. ज्यातून त्यांच्या सुखाच्या आयुष्याचं रुपांतरण दुःखात होत असतो. 
         आपलं वागणं असं असावं की कुणाचं आयुष्य वाढेल. विशेष म्हणजे आपल्या आईवडिलांचंच आयुष्य वाढेल. परंतु काही मुलं ही आईवडिलांना मनस्ताप देण्यासाठीच जन्माला येतात की काय? असंच सारखं वाटायला लागतं. कधीकधी आईवडिलांना असं वाटतं की आपण अशा लेकरांना विनाकारणच जन्माला घातलं. त्यांना लहानपणीच मारुन टाकलं असतं तर बरं झालं असतं. परंतु ती मुलं मोठी झाल्यानं ते शक्य होत नाही. कधीकधी मुलांच्या त्रासानं आईवडिलांनाच आत्महत्या कराविशी वाटते. विशेष म्हणजे आज संस्कार नाही. संस्कार तुटत चाललेले आहेत. त्याचं कारण आईवडिलांपासून दूर राहणारी मुलं. मुलं ही उच्चशिक्षण शिकतात व उच्चशिक्षीत बनतात. ती डॉक्टर, इंजिनिअर बनतात. तशीच ती मोठमोठी पॅकेज घेवून दूर अंतरावर नोकरीला लागतात. ज्याठिकाणी मायबाप ताबडतोब पोहोचू शकत नाहीत. त्या मुलांना भेटायचंच असेल तर खुद्द मायबापांनाही फोन करुन जावं लागतं. एवढी मुलं मोकळी सुटलेली असतात. अशी नोकरी करणारी मुलं दूर अशा ठिकाणी स्वतःमध्ये संस्कार ठेवून वा बाळगून वागत नाहीत. ही मुलं एकटी असतात व हीच मुलं आपला एकटेपणा घालविण्यासाठी मित्र पकडतात. ज्या मित्रत्वात ती मुलगी असेल तर ती मुलाला मित्र बनवते व तो मुलगा असेल तर मुलीला मित्र बनवतो. त्यानंतर त्यांचं मोबाईलवर बोलणं सुरु होतं. व्हाट्सअपवर चॅटिंग सुरु होते. त्यातच वात्रट व अश्लील बोलणंही सुरु होतं आणि एवढंच नाही तर एकमेकांना बागेत भेटणं. एकमेकांचे अश्लील फोटो घेणं. बागेत बसतांना एकमेकांच्या गळ्यात गळे टाकून बसणं. रस्त्यारस्त्यावर चुंबन घेत वावरणं. ज्यांना समाजही काही म्हणू शकत नाही. अन् समाजानं काही म्हटल्यास अशी मुलं त्यांचाच भर रस्त्यावर अपमान करुन टाकतात. मग कोण म्हणायला जाणार अशा मुलांना. ही शोकांतिकाच आहे. 
         आजचे बगीचे अशाच मुलामुलींच्या टोळक्यांनी भरलेले आहेत. बागेत नंगे नाच सुरु आहेत. पुण्यातील गोष्ट जर घेतली तर तिथे फिरायला जाणं पर्यटकांना कठीण होवून बसलंय. चांगले सुसंस्कृत लोकं आपल्या इवल्याशा मुलांना, खास करुन मुलींना घेवून अशा ठिकाणी फिरायला जावू शकत नाहीत. खास करुन किल्ल्याच्या ठिकाणी. कारण किल्लेही अशा मुलांनी अश्लील वर्तनांनी सडवलेले असून चांगल्या सुसंस्कृत पालकांना भीती वाटतेय की त्यांची मुलं कधीकाळी एखादा प्रश्न आपल्या आईवडिलांना विचारणार तर नाही ना की बाबा, ही मुलं त्या झुडपात काय करीत आहेत? असा प्रश्न आईवडिलांना विचारल्यास विचार असा येवू शकतो की त्या मुलींच्या प्रश्नांवर काय उत्तर द्यावं. ही अश्लीलता सुट्टीच्या दिवशी जास्तच असते.
           तरुण तरुणींची ही अश्लीलता. या अश्लिलतेनं केवळ बागबगीचेच भरलेले नाहीत, तर काही महाभागांनी खास करुन हेरीटेज बांधलेले आहेत. अर्थात किल्ल्याच्या जवळपास होटल बांधलेले आहेत. याच नंग्या नाचातून हवा तसा व हवा तेवढा पैसा कमविण्यासाठी. सुट्टीच्या दिवशी हे हेरीटेज भरलेलेच असतात. एकदोन तासासाठी या. अमूक अमूक एवढं शुल्क द्या. काम करा व निघून जा. बदल्यात त्यांना जेवनखावणही मिळत असतं. ज्याचे शुल्क होटल मालकांना द्यावे लागतात. यात होटल मालकांचा पुष्कळ फायदा होत असतो. कारण काही काही होटल मालक आपल्या होटलात येणाऱ्या मुलामुलींचा गुप्त कॅमेरे लावून व्हिडिओ बनवीत असतात व ते विकून पैसा कमवीत असतात. हे मिडीयाच्या माध्यमातून कधीकधी दिसतच. आज मुलांनी विचार करावा की आपण आपल्या आईवडिलांपासून वेगळे असतो. आपल्या आत्मनिर्भरतेचा विचार करुन आपल्या आईवडिलांनी आपल्याला दूर अशा ठिकाणी पाठविलेलं असंत. त्यांनाही विचार असतो की आपलं मुल आत्मनिर्भर बनावं. त्यालाही आपल्याशिवाय जीवन जगता यावं. आलेल्या संकटावर त्यालाही मात करता यावी. कारण तेवढ्या दूर संकट आल्यास आईवडील काही क्षणातच धावून जाणार नाहीत. 
         मुलांना ते कळतं. त्यासाठीच ते मित्र पकडत असतात. समजा संकट आलंच तर अशा मित्रांनी मदत करावी हा त्यामागील उद्देश असतो. परंतु जेव्हा अशा मित्रत्वात शरीरसुखाची मागणी होते. तेव्हा हा उद्देश विफल होतो. कारण कोणतेच मायबाप काही मुलांना अशा अश्लीलतेच्या हरकती करण्यासाठी दूर अशा ठिकाणी पाठवीत नाहीत. ते मुलांना लहानपणापासूनच संस्कार शिकवितात. संस्कारानं वागणं शिकवतात आणि मुलांनीही संस्कारांनीच वागणं शिकावं. आपण दूर जरी राहात असलो तरी. ते मित्रासमवेत बागेत फिरणं ठीक आहे. परंतु त्या बागेत मित्रासमवेत फिरत असतांना एकमेकांच्या गळ्यात गळे घालून आपण बसत असल्यास ती वाईट गोष्ट आहे. तसं करायला आपल्या आईवडीलांनी पाठविलेलं नसतंच. शिवाय आपण जर रस्त्यावर एकमेकांचे चूंबन घेत असू वा होटलमध्ये एकदोन तासासाठी जात असू, तर ती वाईट गोष्ट असते. ज्यात आईबाप साक्षीदार नसले तरी तिथंच अस्तित्वात असलेला विधाता पाहात असतो. जो आपण केलेल्या पापाची शिक्षा आपल्याला देतो. म्हणूनच अशा प्रेमप्रसंगातून झालेले विवाह फारकाळ टिकत नाहीत. ते तुटतात. कारण आपल्या आईवडिलांना असे विवाहापुर्वीचे बागेत फिरणे माहित नसते. त्यातच बागेत अश्लील अवस्थेत बसणेही माहित नसते. आपले विवाहापुर्वी लपून चोरुन होटलमध्ये एक दोन तासासाठी जाणे माहित नसते. तसेच आपले विवाहापुर्वी रस्त्यावर चुंबन घेणे, ह्या क्रिया प्रक्रिया माहित नसतात. ज्या आपल्या क्रिया प्रक्रियातून आपण आपल्या आईवडिलांना फसवत असतो. 
         विशेष सांगायचं झाल्यास असंच सांगता येईल की आपलं तरुणपणात आईवडिलांची संमती न घेता प्रेम करणं, त्यातच अश्लील हरकती करणं हे आपलं वात्रट वागणंच आहे. आपल्या आईवडिलांनी आपल्यावर विश्वास ठेवून दूर अशा ठिकाणी आपल्याला आत्मनिर्भर बनता यावं म्हणून ठेवलेलं असतं. अशावेळेस आपण जर आपल्या आईवडिलांचा विश्वासघात करुन दूर अशा ठिकाणी एकमेकांच्या प्रेमात फसून अश्लील हरकती करीत असतो. त्यावेळेस आपल्याला माहित असतं की आपल्याला कोणीच पाहात नाहीत. परंतु विधाता आपल्यावर बारीक लक्ष ठेवून असतो. तोच आपल्या आईवडिलांच्या आडून केलेल्या आपल्या कृत्याची पुढेमागे शिक्षा देतच असतो. ज्यातून आपण पुढे विवाहबद्ध झालो तरी आपल्या संसारात विघ्न येतं. कारण आपला विवाह कुठंतरी आपले संस्कार मोडून झालेला असतो. आपण आपल्यातील वात्रटपणानं आपल्यातील असलेल्या संस्काराला तोडलेलं असतं. म्हणूनच बागेत फिरण्याची वा होटलात जाण्याची बाब का असेना, तरुणपणात तशा गोष्टीचं आकर्षण वाटणारंच. आपण त्याचा तेवढा मोह न बाळगता आपल्यावर केलेले बालपणीचे संस्कार टिकवावेत. त्याच संस्कारानं वागावं. आपल्या आईवडिलांचा विश्वास तोडू नये. त्यांचाही विश्वासघात करु नये. जेणेकरुन त्यातून आपलं पुढील आयुष्य हे चांगलं ऐश्वर्यसंपन्न अवस्थेत कापता येईल. त्यात विघ्न येणार नाही. संकटं तर कोसो दूर पळवायला मार्ग सापडेल हे तेवढंच खरं. जर आपल्यात असलेला पुर्वाश्रमीचा संस्कार आपण टिकवू शकलो तर.......