Shevtchi Sanj - 4 in Marathi Women Focused by Ankush Shingade books and stories PDF | शेवटची सांज - 4

Featured Books
Categories
Share

शेवटची सांज - 4



            रामदास उच्च शिकला होता व तो नोकरीच्या शोधात होता. अशातच त्याला एक दिवस सरकारी नोकरी चालून आली. तो नोकरीवर लागला. 
          ती सरकारी नोकरी. नोकरी तशी इमानदारीची होती. परंतु त्या नोकरीत बक्कळ पैसा होता. त्या पैशात तो जास्तीत जास्त रक्कम कमवू शकत होता. तिही अनैतिक मार्गानं. खरं तर त्यानं तसं करायला नको होतं.
         ती सरकारी नोकरी. तशी त्याची नोकरी सरकारी होती आणि त्यातच त्या नोकरीत भ्रष्टाचाराच्या मार्गानं कितीतरी पैसा कमविता येत असल्यानं त्यानं तसा पैसा कमविण्याचा प्रयत्न केला. ज्यात त्याला पाहिजे त्या प्रमाणात पैसा मिळाला. तसे त्याचे गावातच शत्रू निर्माण झाले.
          रामदास तलाठी बनला होता व त्याची गावापासून दूर अशा ठिकाणी पोस्टिंग झाली होती. ज्या पोस्टिंग अंतर्गत त्यानं बराच पैसा कमविला होता. असा बक्कळ पैसा कमवून त्यानं गावातच एक मोठं घर बांधलं होतं. तसंच येत असलेल्या बक्कळ पैशातून त्यानं काही शेतीही विकत घेतली होती.
          रामदासला आठवत होती ती बेरोजगारी. ज्या बेरोजगारीनं त्याचे हालहाल करुन टाकले होते. त्याला आठवत होता तो लहानपणीचा काळ. ते लहानपण, ज्या लहानपणात त्याला बरंच सुख होतं आणि समाधानही. त्याला आठवत होती ती माकडाची टोळी. ज्या माकडाच्या टोळीत फक्त दहा ते पंधरा नर माकडच यायचे. अन् दिवसभर त्या नर माकडांना हुसकावून लावण्यात त्याचा दिवस जात असे. त्या माकडांची त्याला अतिशय भीती वाटत असे. जेव्हा ते दात विचकत. अशी माकडं त्याच्या शेतात येवून अख्खं भुईमूंग भुईसपाट करीत असत. त्यातील दाणे कमी खात आणि नाशधुसच जास्त होत असे. तसंच त्याला आठवायचं ते माकडानं उड्या मारुन फोडलेले कौलं. त्या कौलाच्या फुटण्यानं घर पावसाळभर गळायचं. ज्यातून घरातील अंथरूण, पांघरुन ओलंच असायचं आणि त्याच ओल्या जागेत त्यांना रात्र रात्र काढाव्या लागायच्या. त्यानं पाहिली होती ती त्याच्या घरची दारिद्र्यामुळं झालेली हालत. पैसा कमी असल्यानं झालेली आबाळ. 
          रामदासला आठवत होते ते काळवीट. जे काळवीट शेतात येवून सोयाबीनची पानं खात असत. असं करतांना अख्खे सोयाबीनचे रोपटे त्याच्या तोंडात येत. तशाच रानगाईही आठवत होत्या. ज्या रानगाई रात्रीला शेतात यायच्या व पिकांचं नुकसान करायच्या. त्यातच ते रानडुकरं तर भयंकर बदमाशच होते की जे शेतात आल्यावर अख्खी जमीन उकरुन काढायचे. तेव्हा त्याचे वडील सदाशिवरावांना प्रश्न पडायचा की या जनावरांचा बंदोबस्त कसा करता येईल? तोच विचार करीत असतांना कधी ते शेतकरी शेताच्या भोवताल करंट लावून ठेवायचे. ज्यात एके दिवशी एक रानडुक्कर करंग लागून मरण पावलं होतं व ते वनविभागाला माहित होताच त्याच्या वडिलांना इंग्रजांनी पकडून भर लोकांसमोर करंट लावला होता. या इंग्रजांच्या वागण्यातून असं वाटत होतं की इंग्रज लोकं हे पशूप्रेमीच असावे. ते अनुभवताच सदाशिवनं जनावरांपासून शेतातील पिकांचं नुकसान होवू दिलं. परंतु शेतात कुंपन करुन करंट लावला नाही.
         रामदासनं बालपणापासून शेताची होत असलेली नासाडी पाहिली होती. त्याला शेती अतिशय आवडत होती. त्याला वाटत होतं की शेताची नासाडी होवू नये. शेतकऱ्यांनाही न्याय मिळावा. म्हणूनच त्यानं तलाठी पदाची परीक्षा दिली व तो तलाठी बनला. शेतकरी वर्गाच्या असलेल्या समस्या दूर करता याव्यात म्हणून. परंतु तलाठी बनताच त्याचे हावभाव बदलले व आता तो शेतकरी वर्गाला न्याय देण्याऐवजी आपलीच बालपणातील परिस्थिती पाहून अल्पावधीतच श्रीमंत होण्याची स्वप्न पाहू लागला होता. तशातच तो शेतकरी वर्गाला लुटू लागला होता.
        अल्पावधीतच रामदास हा गर्भश्रीमंत बनला. कारण शेतकरी वर्गाला लुटता लुटता त्याचेकडे भरपूर पैसा आला होता.
         आज कार्यालयाला सुट्टी होती. तसा एकदा रामदास कार्यालयाला सुट्टी असतांना आपल्या गावाला आला होता. घराच्या पायरीवर बसला होता तो. त्यातच त्याला आठवलं, 'आपली शेती काल पिकत नव्हती. माझ्या वडिलांना सतत उपासमारीचा सामना करावा लागत असे. माझं घर गळत असे. त्या माकडांच्या उड्या मारण्यानं. ती माकडं गावात येत. घराच्या शेजारीच असलेल्या झाडावर बसत. त्या झाडावरुन घरावर उड्या मारत. त्यामुळंच कौलं फुटत व दरवर्षी माझ्या वडिलांना कौलं टाकावी लागत छतावर. कधीकधी कौलं टाकतांनाही पैसा नसायचा. ज्यातून अख्खा पावसाळा ओल्या जागेतच काढावा लागायचा. आज ठीक आहे की पावसाळा माझा चांगला जात असतो. कारण हा डोंगराळ भाग असला तरी मी स्लॅबचं छत टाकलंय. आज माझी दशा पालटलीय.'
           रामदास विचारच करीत होता. तोच त्याला घराचा विचार आला. 'मी घर बांधलंय. चांगलं स्लॅबचं घर बांधलंय. लय स्वप्न पाहिली होती मी. या माकडांच्या त्रासापासून घराला कसं वाचवता येईल त्याची. वाटत होतं की आपलंही घर स्लॅबचं असावं. परंतु पैसा नव्हता. काय करावं सूचत नव्हतं. घरावर बोराच्या काटक्या टाकून पाहिल्या. कधी टिना टाकून पाहिल्या. परंतु माकडांचं घरावर उड्या मारणं बंद झालं नाही. एकदा तर एक माकडच छत फोडून घरात पडलं होतं. दैव बलवत्तर की ते वाचलं. तसं पाहिल्यास माकडं दूर अंतरावरुन अगदी लांब लांब उड्या मारतात. तसं लय मोठ्ठ वरदानच आहे त्यांना.
           तो माकडांचा त्रास. त्यातच त्याला आठवायचा तो शेतीचा त्रास. दोन्ही ठिकाणी त्याच्या वडिलांना त्रासच असायचा. तसं पाहिल्यास पावसाळा कहर करुन जायचा. कारण सतत पाणी असायचं. पाऊस सारखा यायचा. तो थांबायचं नावंच घ्यायचा नाही. हं, एक गोष्ट होती की वरुन जरी पाऊस येत असला तरी उतार जागा असल्यानं थोडासाही गोळा होत नसे. सरकन निघून जात असे.'
         रामदासला जसं बालपण आठवलं. तसंच आठवलं ते तरुणपण. त्या तरुणपणात बेरोजगारीचा केलेला सामना. लोकं त्याला टोमणे मारत. म्हणत की तो घोड्यासारखा वाढला. थोडीशीही अक्कल नावाची वस्तू नाही. अक्कल असती तर मायबापाच्या उरावर त्यानं बसून खाल्लं नसतं.
           रामदासला आठवत होतं त्याचं तरुणपण. आज तो तरुण झाला होता. त्याला प्रेम करावंसं वाटत होतं. परंतु कसं करणार. तशा मुली त्याचेवर भाळू शकत होत्या. परंतु मुली कशा भाळणार? प्रश्न होता. कारण तो बेरोजगार होता. त्याला घरी कामही करावसं वाटत नव्हतं. त्याला आठवत होतं त्याचं भ्रष्टाचाराकडे पाऊल टाकणं. त्याला भ्रष्टाचारीही बनावसं वाटत नव्हतं. परंतु तो भ्रष्टाचारी बनला. कारण त्यानं तशी परिस्थिती अनुभवली होती. अनुभवलं होतं ते विश्व. ज्या अनुभवानं त्याला भ्रष्टाचारी बनवलं होतं. 
          ते विश्वकोटीचं दारिद्र्य. आज तेच विश्वकोटीचं दारिद्र्य त्याला खुणावत होतं. तेच विश्वकोटीचं दारिद्र्य त्याला भ्रष्टाचाराकडे खेचत होतं. वाटत होतं की आपणही श्रीमंत बनावं. एवढं श्रीमंत बनावं की आपली समाजात इज्जत व्हावी. शिवाय जेव्हा तो नोकरीला लागला. तेव्हा कामात दिरंगाईच होत असे. तेव्हा पाटील, जमीनदार माणसं आपल्या कामाचा मोबदला म्हणून लाचेचा पैसा घ्यायची इच्छा नसतांनाही त्याच्या खिशात जबरदस्तीनं पैसा कोंबत असत. येथूनच त्याला भ्रष्टाचाराची सवय लागली.
        आज रामदास भ्रष्टाचारी बनला होता नव्हे तर त्याला भ्रष्टाचाराची सवय जडली होती. आज तो गरीबही शेतकरी वर्गाला लुटत होता.
         रामदास आठवत होता त्याच्या तरुणपणाचा काळ. तो आज अगदी तरुण झाला होता. अशातच त्याला विवाह करायचा होता. वय होत आलं होतं. वाढत्या वयाबरोबर त्याले विवाह करणं भाग होतं. त्याला वाटत होती शिक्षणाची गरज. शिक्षण जर नाही शिकलो तर आपला उद्धार होवू शकणार नाही. हे बाळकडू त्याला डॉ. बाबासाहेबांनीच शिकवलं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा व्याख्यान देत. तेव्हा ते व्याख्यान त्यानं ऐकलं होतं. त्यानुसार त्याला शिक्षणाचं महत्त्व माहित झालं होतं. त्यानुसारच तो उच्च शिक्षण घेत राहिला. अशातच त्याचं लक्ष त्यानुसारच तो उच्च शिक्षण घेत राहिला. अशातच त्याचं लक्ष प्रेमाकडे गेलं नाही. तसा तो प्रेमात फसला नाही. कारण त्याला प्रेम हे चक्रव्यूह वाटत होतं. वाटत होतं की मी जर एकदा प्रेमात पडलो तर माझं जीवन कायमचं संपेल. तसंच त्याला वाटत होतं, प्रेम हेच चक्रव्यूह आहे. त्यात कोणी फसू नये म्हणजे पावलं.
           प्रेमाच्या चक्रव्यूहात कोणी फसू नये. सावधानतेनं पाऊल ठेवावे. असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. कारण दिसतं तसं नसतं या वृत्तीप्रमाणे जी मंडळी वास्तविक जगतात अगदी श्रीमंत भासतात. ती मंडळी श्रीमंत असतातच असे नाही. तशीच जी मुलगी सृष्टी सौंदर्यानं नटून दिसते. ती मुलगी दिसायला सुंदर असेलच असं नाही. यालाच प्रेमाचा चक्रव्यूह म्हणतात. या चक्रव्यूहात प्रत्येक प्रेम करणारा व्यक्ती फसतो व आपल्या जीवनाची राखरांगोळी करुन टाकतो. ज्यात मुलंच नाही तर मुलींचाही समावेश होतो. म्हणून प्रेम करतांना सावधानता बाळगून प्रेमात फसू नये म्हणजे झालं.
          समाजात असेही काही घटक असतात की जे पैशावर किंवा ऐश्वर्यावर प्रेम करीत असतात. त्यांना पैसा फारच प्रिय असतो. पैशाशिवाय ते जगत नाहीत. 
         आज शहरातील बागबगीच्याचा विचार केल्यास सर्व बागबगीचे अशाच प्रकारच्या लोकांनी भरलेले असतात. जिथे प्रेमवीर सापडतात. त्यातच त्या प्रेमविरांची परिस्थिती वरवरुन पाहिल्यास ते अगदी श्रीमंत वाटतात वा ते श्रीमंत असल्याचा भाष होतो. कारण प्रत्येकांचे कपडे भरजरी असतात. ते गाडीवर आपल्या प्रेयसीला फिरवत असतात. त्यातच जवळ पैसा जरी नसला तरी दुसऱ्यांकडून उधार पैसे घेवून ते मोठमोठ्या हॉटेलात हॉटेलिंगही करीत असतात. 
         रामदास तरुण असतांना त्याला आयुष्यात कधी प्रेम करणं जमलंच नाही व कोणत्याही तरुणीला भाळवणं वा तिला नाश्ता पाणी चारणं त्याला कधीच जमलं नाही. परंतु तो जेव्हा महाविद्यालयात शिक्षण शिकत होता. तेव्हा त्यानं काहींना नक्कीच मदत केलीय. ज्यात त्याला जे जमत नव्हतं. ते जमत नसल्यानं ज्याला जमते, त्याला आपण मदत करावी. म्हणूनच त्याचा तसा प्रयत्न असायचा. तसा एकदाचा प्रसंग. तेव्हाही तो तरुण होताच. एक व्यक्ती त्याच्याकडे आला. म्हणाला, 'मला उधार पैसे दे. मी लवकरच परत करील.' त्यावर त्यानं विचारलं की त्याला ते पैसे कशासाठी हवेत. त्यावर त्यानं म्हटलं, 'मला प्रेयसीला भेटायला जायचं आहे.' अर्थातच तिला फिरवणं, हॉटेलात नाश्ता चारणं आलंच. तसे त्यानं त्याला पैसे दिले. तेही परत करण्याच्या आशेवर. परंतु त्याचे अजूनपर्यंत पैसे परत आले नव्हते. याबाबत एक आणखी प्रसंग त्याचेबाबतीत घडला होता. 
          रामदासला नोकरी लागली होती. तेव्हाचा प्रसंग होता. एक मुलगी त्याचेवर प्रेम करायला लागली होती. ती म्हणत होती. 'मी तुझ्यावर प्रेम करते' तिचं ते म्हणणं. तसा तो अगदी श्रीमंत होता. त्यातच त्याला तिच्या स्वभावाची जाणीव होती. वाटलं की ही माझ्यावर नाही तर माझ्या पैशावर प्रेम करीत असेल. त्यानुसार त्यानं तिची परीक्षा घ्यायचं ठरवलं. ज्यात त्यानं एक मुलगा सोबत आणला. ज्याच्या अंगावर फाटके कपडे होते. त्यानंतर तो म्हणाला,
         "हे बघ, मी यानंतर तुझ्यावर प्रेम करणार नाही. हा माझा मित्र. जसं तुझं माझ्यावर प्रेम आहे ना. मग या माझ्या मित्रावरही प्रेम कर."
         ते त्याचं बोलणं. त्याचं काय चुकलं होतं, ते त्यालाही कळलं नाही. कारण तिला त्यात चक्कं नकार दिला. तशी ती त्याला सोडून गेली होती. 
          ती त्याला सोडून गेली. त्याचं कारण त्याला समजलं नाही. परंतु त्याची दोन कारणं असू शकतात. पहिलं कारण म्हणजे तिला वाटलं असेल की तो तिची खिल्ली उडवीत आहे. तिचं ते खरं प्रेम असावं आणि दुसरं कारण म्हणजे फक्त तिला श्रीमंतच तरुण मंडळी आवडत असावीत की ज्यात त्यानं यानंतर मी तुझ्यावर प्रेम करणार नाही म्हटल्यावर ती त्याला सोडून गेली असावी.
         प्रेम हा काही भातुकलीचा खेळ नाही की जे प्रेम वारंवार बदलवता येईल. काही मंडळी ही श्रीमंती गरीबी पाहात नाहीत. ते कोणावरही प्रेम करतात. अगदी गरीब असला तरी त्याचेवरही. त्याचेचसोबत आयुष्यभर राहण्याचा विडा उचलतात. असं जर झालं नसतं तर आज गरीबांना विवाहासाठी मुलीच मिळाल्या नसत्या. ते कुवारेच राहिले असते. फक्त श्रीमंतांचेच विवाह झाले असते. परंतु आजची परिस्थिती पाहता प्रत्येक मुलींना प्रेम करण्यासाठी श्रीमंतच मुलं हवी की जो भेटायला येतांना सजूनधजून येतो. जो बाईकवर येतो. ज्याची बाईकही अति सुंदर स्वरुपाची अर्थात बुलेट असते. जो बारीक जरी असला आणि त्या गाडीवर बसण्यालायक शोभत जरी नसला तरी चालते. फक्त बुलेट पाहिजे. जो एखाद्या फाईव्ह स्टार हॉटेलात नाश्ता करवतो. त्या मुली त्याचं घर कसं आहे? तो स्वभावानं कसा आहे? त्याच्या घरची माणसं स्वभावानं कशी आहेत? तो प्रेम करण्यायोग्य आहे किंवा नाही? या गोष्टीचं त्यांना काही लेनदेण नसतं. फक्त पैसा व शानशौकत त्या मुलींना महत्वपुर्ण वाटतात. याऊलट एखादा मुलगा जर फाटक्या वस्रात असेल आणि त्याला एखादी मुलगी आवडत असेल आणि त्यानं जर तिला प्रपोज केलं तर मुली त्याचेवर प्रेम करीत नाहीत. तसंच मायबापाचंही आहे. प्रत्येक आईवडील आपल्या मुलीचा विवाह करतांना त्या मुलाचा स्वभाव लक्षात घेत नाहीत. फक्त त्याची श्रीमंती लक्षात घेतात. मग फसतात. कारण प्रत्येक श्रीमंत मुलं ही काही चांगल्या स्वभावाची नसतात. ते कधी व्यसनाधीनही निघतात. यात शंका नाही. एक आणखी प्रसंग. ज्यात एका व्यक्तीनं विवाहासाठी एक रिश्ता आणला. मुलगा हा इंजीनियर झालेला व स्वभावानं चांगला. परंतु झोपडपट्टीत राहणारा. अशा मुलाला त्या मुलीच्या आईनं चक्कं नकार दिला. कारण होतं झोपडपट्टीत असलेला त्याचा निवास. याचाच अर्थ असाच की बऱ्याच लोकांना झोपडपट्टीत निवास करणारी, गरीब असणारी, जवळ शानबाज गाडी नसणारी व फाईव्ह स्टार हॉटेलात नाश्ता न करवणारी मुलं विवाह करण्यासाठी वा प्रेम करण्यासाठी आवडत नाहीत तर याऊलट लोकं आवडतात.
         प्रेम.......अलिकडील काळात मुलांना प्रेम करण्यासाठी म्हणतात की वेळ, काळ लागत नाही. रुप लागत नाही. फक्त लागतो तो पैसा. जो मुलगा शान बादशाहाची व दुकान फुटाण्यागत असल्यासारखे वागतो वा पैसा झळकवतो. अर्थातच मुली त्याचेवरच भाळतात. परंतु त्या विचार करीत नाहीत की हा वरवर श्रीमंत वाटणारा मुलगा एक ना एक दिवस आपल्याला नक्कीच फसवेल. जो म्हणेल की मला तू आवडत नाहीस. मी तुला आज सोडून जाणार. तसाच एखादा गरीब मुलगा उभे करुन म्हणतील की तू यानंतर या मुलांवर प्रेम कर. 
         प्रेम...... प्रेम ही काय कुणाच्या बापाची वा बापजादाची जहांगीर आहे काय की कुणावरही प्रेम करता येईल वा एखाद्यानं म्हटलं की अमूक अमूक व्यक्तीवर प्रेम कर तर प्रेम करता येईल वा होईल. निदान प्रेमात तरी तसं होत नाही. प्रेम हे कोणी कितीही म्हटलं तरी कुणावरही होत नाही. जे खरं प्रेम असेल. खोटं व फसवं प्रेम हे अगदी याउलट आहे. ते प्रेम फक्त श्रीमंत व्यक्ती पाहून होतं. तसेच जे श्रीमंत नसतात. ज्यांच्या घरात खायलाही व्यवस्थित मिळत नाही. जे उधारीच्या पैशावर आपल्या प्रेयसीला फिरवतात. ज्यांचा स्वभाव माहित नसतोच. अशांवर प्रेम करणं म्हणजे फसवं प्रेम असतं. मात्र मुली अशांवरच प्रेम करतात व फसतात.
          प्रेमाचं हे चक्रव्यूह. या चक्रव्यूहात फक्त मुलीच फसतात असं नाही. काही मुलंही फसतात. कारण मुली जेव्हा मुलांना भेटायला येतात. तेव्हा त्या अगदी नटूनथटून येतात. ज्यात तिनं केलेल्या मेकअपच्या आड तिचं सौंदर्य लपलेलं असतं. ती मेकअपनं गोरीपान व चांगली दिसते. परंतु मेकअप उतरताच तिचं खरं सौंदर्य उघडकीस येतं. परंतु ते खऱ्या स्वरुपाचं सौंदर्य कोणत्याही मुलाला दिसत नाही. 
         मुलींचं सौंदर्य. मुली असं जोरदार मेकअप करतात की त्या मेकअपवरुन वाटतं की त्या मुली बहुतांश अगदी श्रीमंत घरच्याच असाव्यात. परंतु त्यांचीही वास्तविक परिस्थिती पाहिली तर असं जाणवतं की काही काही मुलींना धडाचे चांगले कपडेही घालायला मिळत नाहीत. त्या मुली टिन पत्र्याच्याच घरात राहातात आणि श्रीमंत मुलांना लुटण्यासाठी आपल्या मेकअपवर पैसा खर्च करतात. ज्यातून त्यांना अशा श्रीमंत तरुणांनी पसंत केल्यास नाश्तापाणी, पैसे आडके व कधी कपडेही मिळतात. शिवाय चांगल्या बाईकवर फिरायलाही मिळते. त्यातच वेगवेगळे प्रेक्षणीय स्थळही पाहायला मिळतात. 
          प्रेम...... प्रेमातून बराच लाभ होत असतो. आत्मिक समाधान लाभत असते. परंतु हे जरी खरं असलं तरी अलिकडील प्रेमात काही मुली श्रीमंतांना फसवतांना दिसतात. त्या मुली आपले प्रियकरासोबतचे अश्लील व्हिडिओ काढून घेतात. त्यानंतर मुलांना ब्लॅकमेल करुन पैसा उकळत असतात. तशीच काही मुलंही आहेत. ती मुलंदेखील मुलींचे अश्लील व्हिडिओ काढून घेतात. त्यानंतर तिला बॅल्कमेल करीत असतात. महत्वपुर्ण बाब ही की आजचे प्रेम हे असेच फसवे असून त्यालाच प्रेमाचा चक्रव्यूह म्हणतात. अशा चक्रव्यूहात जाणं तर सोपं आहे. परंतु त्यातून निघणं कठीण. ते एखाद्याच निष्णांत असलेल्या व प्रेम करणाऱ्या अर्जुनाला जमतं. सर्वांनाच जमत नाही. कारण सर्वांची गत ही अभिमन्यूसारखी होते. जसं अभिमन्यूला गर्भातच चक्रव्यूह भेदण्याचं शिक्षण मिळालेलं होतं. त्यामुळं तो चक्रव्यूहात शिरलाही. परंतु कौरवांनी आखलेल्या चक्रव्यूहातून तो बाहेर पडू शकला नाही. ज्यात त्याचा अंत झाला. तीच गत प्रेमविरांची होते. प्रेमवीरही असेच अभिमन्यूसारखे चक्रव्यूहात अडकतात. ज्यातून कौरवरुपी गैरफायदा घेणारे डोमकावळे अशाच प्रेमवीर समजणाऱ्या खऱ्या प्रेमविरांचे लचके तोडायलाही मागेपुढे पाहात नाहीत. म्हणूनच आजच्या काळात प्रेम करतांना जरा सावधानतेनं प्रेम करावं. तसंच त्यानंच प्रेम करावं, ज्याला खरंच अर्जुनासारखं चक्रव्यूह भेदण्याचं वा त्यातून बाहेर पडण्याचं ज्ञान आहे. अर्धवट प्रेमाचं चक्रव्यूह भेदण्याचं व त्यातून बाहेर पडण्याचं ज्ञान नसणाऱ्यांनी अशा प्रेमाच्या चक्रव्यूहात पडूच नये. कारण त्यातून आपलीच अधोगती होते. माणूसपण हरवत जातं नव्हे तर त्यातूनच आपलीच बदनामी होवून आपल्याला प्रसंगी बदनामीच्या धाकानं आत्महत्याही करावी लागते. कारण उपाय निघत नाही. असं होवू नये म्हणून प्रेमाच्या चक्रव्यूहात कोणी फसू नये म्हणजे झालं. सावधान राहावं. हे तेवढंच खरं.
             रामदासला तसं वाटणं साहजीकच होतं. कारण आज काळ बदलला होता व बदलत्या काळानुसार विचारही बदलले होते. त्या विचारानुसार जो कोणी प्रेमात पडत होता. त्याचं अख्खं जीवनच खराब होत होतं. तो शिकू शकत नव्हता वा उच्च शिक्षण घेवू शकत नव्हता.
           रामदासचे अशाच प्रकारचे महान विचार होते. हे त्याचे महान विचार बनले होते, त्याला शिकविणाऱ्या शिक्षकामुळे. त्या शिक्षकानं त्याच्या विचारांना महान बनवलं होतं. परंतु एक कमतरता त्याच्यात निर्माण झाली होती. ती म्हणजे तो करीत असलेला भ्रष्टाचार. त्याची लाच घ्यायची इच्छा नसतांनाही तो नाईलाजास्तव लाच घेत होता. आपला उद्धार करण्यासाठी. आपला उद्धार करण्यासाठी तो भ्रष्टाचाराच्या आहारी गेला होता. भ्रष्टाचार करीत होता. 
         आज स्वातंत्र्य होतं व स्वातंत्र्यात पैसे कमविण्याचा अधिकार होता. लोकं पैसे हे कोणत्याही मार्गानं कमवू पाहात होते. ज्यात रामदास पैसे कमवू लागला होता. ज्यातून तो आपल्या उभ्या आयुष्याची धुळधानी करीत होता.