Shevtchi Sanj - 8 - Last Part in Marathi Women Focused by Ankush Shingade books and stories PDF | शेवटची सांज - 8 (अंतिम भाग)

Featured Books
Categories
Share

शेवटची सांज - 8 (अंतिम भाग)


       
           ते बाभळीचं झाड होतं व ते झाड विस्तीर्ण असं वाटत होतं. त्या विस्तीर्ण झाडाच्या सावलीत बसून तो शेतीवर लक्ष ठेवत असे. तसं त्याला त्याच झाडात हायसंही वाटत असे. 
          रामदासच्या शेतात निरनिराळी औषधांची झाडं होती. त्यातच त्यानं धुऱ्याच्या कडेला औषधीयुक्त बाभळीचं झाड लावलं होतं. तसं ते झाड त्याला जास्त प्रिय वाटत होतं. कारण त्या झाडांचा उपयोग त्याला बराच वाटत होता. 
          ते बाभळीचं झाड व तो त्या बाभळीच्या झाडावर प्रेम करीत होता व ते बाभळीचं झाड त्याला आवडत होतं. त्यातच विश्रांतीसाठीही ते बाभळीचं झाड त्याला आवडत होतं. मात्र त्याला बाभळीचं झाड जरी आवडत असलं तरी त्या बाभळीच्याच झाडाप्रमाणे त्याच्या संसारात काटे होते. कधी त्या झाडाच्या बाभळीचे काटे त्याला बोचत असत. परंतु त्याच्या वेदना त्याला होत नव्हत्या. जेवढ्या वेदना त्याला संसारातील बाभळीचे काटे रुतल्यानं होत होत्या.
          रामदासची पत्नी अदिती. अदिती तशी रुपवान होती. ती शहरात राहणारी मुलगी होती व ती उच्चशिक्षीत होती. तिनं त्याचेशी विवाह केला होता, त्याला सरकारी नोकरी आहे म्हणून. ती सुखी होती व काहीच बोलत नव्हती, जेव्हापर्यंत त्याला नोकरी होती. परंतु जशी नोकरी गेली. तशी अदिती त्याला बोलायला लागली होती. जे तिचं बोलणं त्याला सहन होत नव्हतं.
          तिचं बालपण शहरातील मातीत अगदी सुखात गेलं होतं. आज अदितीला आठवत होतं तिचं बालपण. बालपणात तिला ना चिखलाचा सामना करावा लागला होता. ना तिला पाण्यानं भिजावं लागलं होतं. घरी तीनच भाऊबहिण असल्यानं व वडील सरकारी नोकरीवर असल्यानं तिच्या बालपणाचा काळ अगदी सुखद गेला होता. तसं पाहिल्यास ती सर्वात लहान असल्यानं तिचं पालनपोषण फारच लडिवाळपणे झालं होतं.
          शहरातील सुखसोयी व वातावरण आल्हाददायक होतं. ते वातावरण पाहिलं वा अनुभवलं तर अतिशय बरं वाटत होतं. त्यातच अशा आल्हाददायक वातावरणात होत असलेलं तिचं शिक्षण अन् तेही उच्च शिक्षण तिला सुखवून जात होतं.   
         अदितीला सुखकारक असंच वातावरण मिळालं. परंतु ज्या घरी चणे असतात. त्या घरी खायला दात नसतात. या वृत्तीप्रमाणे तिला बालपणात वाचता लिहिता येत नसे व हा क्रम बरेच वर्ष चालला. 
        अदिती जेव्हा लिहायला वाचायला शिकली. तेव्हा ती फारच मोठी झाली होती. ती जेव्हा समजदार झाली. तेव्हा ती लिहायला वाचायला शिकली. त्यातच ती कशीबशी शालान्त परीक्षा पास झाली व महाविद्यालयात गेली.
         ते महाविद्यालय म्हणजे तिच्यासाठी प्रेमाचा जणू सागरच होता. त्या महाविद्यालयातही तिचं मन अभ्यासात लागत नव्हतं, तर ती महाविद्यालयात केवळ मौजमजा करण्यासाठीच जात असे. तशी ती पाहायला सुंदर असल्यानं काही तरुणाईनं ग्रासलेले भुंगे तिच्या मागेपुढे घिरट्या घालत असत. त्यातच अदिती अशा भुंग्यांचा फक्त वापर करीत असे. त्यांच्यासोबत महाविद्यालयात खानावळीत जाणं. चित्रपट पाहायला जाणं. बागबगीच्यात जाणं तिला आवडायचं. मात्र शरीरस्पर्शाच्या दृष्टीनं ती कितीतरी कोसो दूर होती. तिला कोणी तसं म्हटल्यास वा तिच्या स्वभावाचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केल्यास ती अगदी त्यांना फटकारुन देत असे. 
          अदिती मनमिळावू स्वभावाची होती व तिला फॅशनेबल जगणं आवडत होतं. तिला अंगावर तोकडे कपडेही परीधान करायला आवडायचे. तिची महाविद्यालयातील केशसज्जा महाविद्यालयातील भुंग्यांना आवडायची. त्यातच तिच्या अंगातील तोकड्या कपड्यानं महाविद्यालयातील भुंगे तिच्याकडे आकर्षित व्हायची. तसं पाहिल्यास तिचं बोलणं गोड होतं. परंतु स्वभाव मात्र स्वार्थी होता.
          अदितीचं हळूहळू वय वाढू लागलं. त्यातच ती आता उपवर झाली होती. ते पाहून तिच्या वडिलांना वाटायला लागलं होतं की तिचा आता आपण विवाह करावा. त्यासाठी ते विवाहयोग्य मुलगा शोधू लागले होते. अशातच त्यांना गवसला रामदास. जो सरकारी नोकरीवर होता. 
         अदितीचा विवाह करायचा. वडिलांनी तिच्या विवाहाचा बेत ठरवला होता. त्यातच तिला मागणी घालायला बरेच आले. परंतु अदितीच्या वडिलांना ती मुलं पसंत आली नाही. त्यामुळंच की काय, त्यांनी तिला मागणी घालायला आलेली मुलं नाकारली. कदाचीत ती मुलं सरकारी नोकरीवर नसल्यानं तिच्या वडिलांनी त्यांना नकार दिला असावा.
          अदितीबाबत विवाहाचा निर्णय घेतांना तिचे वडील सोचून समजूनच निर्णय घेणार होते. कारण मोठ्या मुलीच्या वेळेस त्यांनी अगदी घाईघाईनं विवाहाचा निर्णय घेतला होता व ते फसले होते. कारण मोठे जावई हे जरी गर्भश्रीमंत असले तरी त्या घरात त्यांच्या मुलीला काही किंमत नव्हती. त्यातच अशी सुंदर मुलगी मिळाली याचंही त्यांना कौतुक नव्हतं. शिवाय ते दारु देखील पीत होते.
         अदितीला पाहायला बरीच मंडळी आली. त्यातच रामदासही आला. रामदास हा गरीब होता व तो गावचा राहणारा होता. त्याला नुकतीच सरकारी नोकरी लागली होती. ज्यात त्याची नोकरी ग्रामीण भागातच होती. शिवाय तो आपल्या नोकरीच्याच गावी राहात होता. ज्या गावी जातांना वा वावरतांना चिखलच लागायचं पायांना. अशातच रामदास जेव्हा पाहायला आला अदितीला. तेव्हा अदितीचे वडील त्याला म्हणाले,
           "आमची अदिती चिखलात अजिबात वावरलेली नाही. ती घरातून लहान असल्यानं आम्ही तिचा लाडच केला. शिवाय तिच्या सर्वच भावभावना जपल्या. आम्ही तिला अजिबात दुःख होवू दिलं नाही. शिवाय आपणाला आम्ही आमची मुलगी देतो, जर आपण शहरातच राहणार असाल तर......"
         ते अदितीच्या वडिलांचं बोलणं. त्यावर पाहुण्यांसह अदितीला पाहून जेव्हा रामदास घरी गेला. तेव्हा तिचा पाहिलेला चेहरा त्याला आठवत होता. ते अद्वितीय सौंदर्य त्यानं आजच पाहिलं आहे, असं त्याला वाटत होतं. जणू अदिती त्याला नावाप्रमाणेच स्वर्गातील अप्सराच वाटली होती. आज रातच्याला त्याला बरोबर झोपही आली नव्हती. तशी त्याला विश्वामित्र व मेनकाची प्रेमकहाणी आठवायला लागली. ज्यावेळेस मेनका नदीवर अंघोळ करीत होती. तेव्हा तेथून विहार करीत असलेल्या विश्वामित्रची नजर तिच्यावर पडली. तसा तो तिच्यावर मोहीत झाला. कारण तिचं अप्रतिम सौंदर्य त्याच्या डोळ्यात सलत होतं. त्यानंतर अंघोळ झाल्यावर तिचं लक्ष जेव्हा विश्वामित्रावर पडली. तेव्हा ती त्यांच्या पाया लागण्यासाठी ती त्यांच्या पायावर नतमस्तक झाली. त्यानंतर जेव्हा ती उभी झाली आणि तिचं लक्ष विश्वामित्रावर पडलं. तेव्हा तिनं त्यांच्या डोळ्यातील भाव पाहिले. ते वेगळेच होते. परंतु ते भाव जरी तिच्या लक्षात आले असले तरी ती विचलीत झाली नाही आणि तिनं आपली उत्तेजीत भावनाही त्यांना दाखवली नाही. ती पाठमोरी झाली व निघून गेली. तसा विश्वामित्र तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडं पाहातच राहिला.
          विश्वामित्र हा राजा होता. परंतु आता त्यानं संन्यास घेतला होता व ब्रम्हचर्याचं पालन करीत होता. परंतु जेव्हा त्यानं मेनकेला पाहिलं. तेव्हा त्याच्या मनातील भाव बदलून गेले होते. तिला पाहिल्यानंतर तो, ती गेल्यावर जेव्हा आपल्या कुटीकडे परतला. तेव्हा त्याच्या मनात तीच आठवायला लागली होती. त्यातच रात्रीला जेव्हा तो अंथरुणावर पहुडला. तेव्हाही त्याला झोप येत नव्हती. सारखी तिचीच आठवण येत होती व वाटत होतं की जिला त्यानं दुपारी अंघोळ करतांना पाहिलं. ती केव्हा केव्हा आपल्याला मिळतेय. तसं पाहिल्यास सकाळ होताच तो तिच्या शोधार्थ निघाला व तिचा शोध घेतांना बराच काळ लागला. अन् ज्यावेळेस ती मिळाली. तेव्हा तिच्याही मनात तोच असलेला त्यानं पाहिला व त्यानं तिच्यासमोर आपली इच्छा प्रदर्शित करताच तिनं त्याच्या इच्छेला खतपाणी घातलं. ज्यातून शकुंतला नावाची मुलगी जन्माला आली व शकुंतलेनं हस्तिनापूरचा राजा दुष्यंतशी विवाह केला. ज्याच्यापासून भरत नावाचा वंशज जन्माला आला होता. 
         आज तीच मेनकाची कहाणी रामदासला आठवत होती त्या रात्री. जशी विश्वामित्रला त्या एके रात्री मेनका आठवत होती. तसंच वाटत होतं रामदासला. वाटत होतं की आपणही अदितीशी विवाह करुन शकुंतलेला जन्मास घालावं. ज्यातून भरताची निर्मिती होईल. 
         त्याचे ते विचार. सकाळ झाली होती व लागलीच त्यानं अदितीच्या वडिलांना निरोप पाठवला. मुलगी आपल्याला पसंत आहे व त्यांच्या अटीनुसार तो शहरात राहायला तयार आहे. मग काय, रामदासनं अट मान्य करताच त्यानं शहरात किरायाचा कमरा घेतला व तो शहरात राहायला आला. तेथूनच त्याचा विवाह समारंभही पार पडला.
          रामदासचा विवाह झाला होता. तसे दिवसरात्रीचे चक्र सुरु झाले होते. दिवसामागून दिवस जायला लागले होते. त्यातच ती रुपवान असल्यानं व तिला तोकडे कपडे वापरुन अल्लड वागण्याची सवय असल्यानं नेहमीच्या सवयीप्रमाणे ती फॅशनेबल पणानंच राहात होती. परंतु गावच्या मातीत रमलेल्या रामदासला ती गोष्ट व तिचं अल्लड वागणं काही पटत नव्हतं. त्यातच दोघांचीही भांडणं होत व भांडणं एवढी विकोपाला जात असत की ती नित्यनेमानं वडिलांच्या घरी जात असे व राग शांत होईपर्यंत ती आपल्या वडिलांच्याच घरी राहात असे. कधीकधी घटस्फोटापर्यंत गोष्टी यायच्या. परंतु संसार तुटू नये म्हणून त्यात बरेचवेळेस मधला मार्ग काढून रामदास जुळवून घ्यायचा. अशातच तिचे आईवडील एका कार अपघातात मरण पावले. त्यानंतरही भांडणं झालीत. परंतु आता घरी भावाचं व भावजंयचं राज्य असल्यानं अदितीला आपल्या माहेरी जावून राहता येत नव्हतं. त्यातच तिच्या अपेक्षा आणि मर्यादा खुंटावल्या गेल्या होत्या.
          अदिती काही सुधरली नव्हती मायबाप मरण पावले तरी. तिचा नट्टापट्टा सुरुच होता. त्यातच तिचा पती आलेली सगळी मिळकत तिच्याच हाती देत असल्यानं ती मालकीण बनली होती. तसा तो सकाळीच कामावर जात असे व रात्री बऱ्याच उशिरापर्यंत घरी परतत असे. तशीच मुलं देखील शाळेत जायची. या दरम्यान ती दुपारी फॅशनेबल कपडे वापरुन फिरायला जात असे व आपल्या फॅशनवरच कितीतरी पैसा उरत असे. त्यातच घरी कमविलेला रामदासचा पैसा पुरत नव्हता, एवढा गलेलठ्ठ पगार असूनही. याची परियंती साहजीकच त्याच्या लाच घेण्यात झाली. कमविलेला पैसा पुरत नाही घरखर्चाला. म्हणूनच तो लाच घेवू लागला. त्यातच कधी एखाद्यावेळेस तो पैशाचा हिशोब आपल्या पत्नीला विचारत असे. तेव्हा ती त्याचेशी वाकडं बोलणं बोलत असे. ज्यामुळं त्यानं तिला पैशाचा हिशोबच विचारणं बंद केलं होतं. अशातच ती वेळ येवून ठेपली. जेव्हा त्याचेवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील अधिकाऱ्यांनी कारवाई करीत त्याची नोकरी खाल्ली.
         रामदासची नोकरी गेली. परंतु वाद काही क्षमले नाहीत. त्या वादात अधिक भर पडली. आताही वाद होतच होते व ते विकोपाला जातच होते. त्यातच पुर्वी थोडासा शांत असणारा रामदास आता चिडचिड्या स्वभावाचा झाला होता. अन् का होणार नाही तो चिडचिड्या स्वभावाचा. कारण त्याला सुखानं उत्पन्न देणारी त्याची नोकरी गेली होती. 
          रामदास व अदितीमध्ये पहिला वाद उत्पन्न झाला. तो गावाकडे जात असतांना. कारण तिला रामदासनं जेव्हा गावाकडे चाल म्हटलं. तेव्हा तिला गावाकडे जायचं नसल्यानं ती म्हणाली की तिनं त्याचेशी जेव्हा विवाह केला. तेव्हा तो गावाकडे जाण्यासाठी केलेला नाही. त्याचेशी तिनं शहरात राहण्याच्याच अटीवर विवाह केलेला होता. त्यावर तो म्हणाला की त्याला आता शहरातील खर्च झेपत नसून शहरात कामधंदे सुद्धा नाहीत. अन् जेही कामधंदे केले, त्यात त्याला बरंच नुकसान झालेलं आहे. आज तोच भाग हेरुन पाहता त्याला शहर आवडत नाही व त्याच आधारावर एकंदर परिस्थिती पाहता त्याला शहरात करमत नसून शहरात त्याचं पोटंही भरणार नाही. ते त्यांचे कौटुंबिक वाद. त्यातच आता ती माहेरीही गेली असती. परंतु माहेरी आता तिचे मायबाप जीवंत नव्हते की जे तिची बाजू उचलून धरतील. तशीच ती एकटीही वेगळी चूल मांडून राहू शकली असती. परंतु त्यातही ती असफल ठरली असती. कारण ती कमावती नव्हती आणि कमाई करणंही तिला जमत नव्हतं. शेवटी नाईलाज झाला व नाईलाजास्तव ती गावला राहायला जायला तयार झाली.
          ते त्याचं गावाला राहायला जावू म्हणणं. तिच्या मनात बाभळीच्या काट्यासारखं सलत होतं. तशी ती गावाला राहायला जायला तयार झाली. त्यातही तिनं एक अट टाकली होती. गावाला गेल्यावर ती कधीच शेतावर जाणार नाही. त्यानं त्यात होकार देताच ती गावाला जायला तयार झाली.
         ते गाव. त्या गावात ना घरी नळ लाईन होती. ना घरात नळ होता. त्या गावात राहात असतांना गावाशी जुळवून घेणं थोडंफार तिला अवघड झालं होतं. तसं पाहिल्यास जेव्हापर्यंत रामदासला नोकरी होती, तेव्हापर्यंत तिचं काम पाटलीणीसारखंच होतं. तिच्या घरी भांड्याला कपड्याला तसेच जेवनही बनवायला मोलकरणी होत्या. ज्यात तिचा अहंकारही वाढलेला होता. परंतु प्रारब्ध असंही पालटणार. असं तिला कधी वाटलं नाही. असंच प्रारब्ध पालटून गेलं. ज्यातून नलराजा व दमयंती राणीची कहाणी त्यांच्या आयुष्यात आली.
           नलराजा व दमयंती. यांचं प्रेमप्रकरण हे एका खऱ्या प्रेमाची अनुभूती आहे. दमयंती विदर्भातील राजकन्या होती व नल हा निषाद राजा होता. दोघांचंही एकमेकांवर प्रेम असल्यानं त्यांचा विवाह झाला. परंतु नल राजाला द्यूत खेळण्याचा छंद असल्यानं तो द्यूतात हारला व सर्व राज्य आणि संपत्ती त्याचा भाऊ पुष्कर याने त्याच्याकडून ताब्यात घेतली. त्यानंतर त्याच्या भावानं त्याला अंगावरील एका वस्रात राजधानीतून बाहेर काढलं. त्यानंतर नल व दमयंती भटकत भटकत वनविहार करु लागले. ज्यातून त्यांना बरेचवेळेस उपासमार सहन करावी लागली. तसा तो एकदाचा प्रसंग. उंचावरुन आकाशात एक सुवर्णपक्षाचा जोडा उडून जात असतांना पोटात भुकेचा डोंब पडल्यानं पक्षाचं मांस आपल्याला मिळावं म्हणून नलानं आपल्या अंगावरील वस्र त्या सुवर्णपक्षावर फेकलं. उद्देश होता की त्या वस्राच्या झाकोळलं जाण्यानं सुवर्ण पक्षी सापडेल व आपल्याला अन्न मिळेल. परंतु जेव्हा प्रारब्ध कमजोर असतं. तेव्हा काहीच मिळत नाही. असं घडत असल्यानं त्याचं ते वस्र सुवर्णपक्षी आपल्यासोबत उडत घेवून गेला. ज्यातून त्या वनात तो निर्वस्रच होता. शेवटी आपले शरीर आपल्याच पत्नीच्या वस्रानं झाकोळून दोघेही झोपले असतांना अचानक नल उठला व त्यानं आपल्याच पत्नीच्या वस्राचा थोडासा तुकडा कापला. तो आपल्या अंगाभोवती गुंडाळला व विचार करु लागला की आपण दमयंतीला सोडून द्यावं व येथून तिच्यापासून दूर निघून जावं. ज्यातून ती आपल्या वडिलांकडे निघून जाईल व तिचं जीवन सुखी होईल. कारण आपल्याच द्युताच्या नशेनं अख्खं दमयंतीलाही दुःख शोषावं लागत आहे.
         नलचा तो विचार. तसा विचार करताच नल, दमयंती झोपली असतांनाच तेथून निघाला व तो तिच्यापासून दूर निघून गेला. त्यानंतर सकाळ झाली.
          सकाळ जेव्हा झाली. दमयंतीनं पाहिलं की तिथं नल दिसत नाही. तिनं त्याला आजुबाजूला शोधलं. परंतु नल दिसलाच नाही. त्यातच तिला वाटलं की त्या भयाण वनात त्याला एखाद्या हिंस्र प्राण्यानं खावून टाकलं असेल. आपणही असंच कुणाचं तरी शिकार व्हावं. हाच उद्देश धरुन ती पावलं टाकू लागली. तसा तिला एक अजगर दिसला की ज्याला फारच भूक लागली होती. त्या अजगरानं तिला गिळण्याचा प्रयत्न केला. ज्यात एका व्याधानं तिला वाचवलं. परंतु दमयंती एवढी सुंदर होती की त्या व्याधाची कुनजर तिच्यावर पडली. त्यानं तिला छळण्याचा प्रयत्न केला. परंतु दमयंती ही एक पतीव्रता स्री होती. ज्यात तिला तिनं म्हटलं की जर मी पतीव्रता असेल तर याचक्षणी या व्याधाचा मृत्यू होईल आणि झालं तसंच. जेव्हा तिच्या तोंडातून तशी शापवाणी बाहेर पडली. ती शापवाणी बाहेर पडताच व्याध जागीच गतप्राण झाला.
          व्याध मरण पावला होता. त्यानंतर दमयंती तेथून निघाली. ती भटकत भटकत चेदीनरेश सुबाहूकडे पोहोचली. त्यानंच तिला तिच्या भावाकडे पोहोचवून दिले. पुढे नलचाही तिच्या भावानं शोध घेतला व त्याचं राज्य सुद्धा त्याला मिळवून देण्याचा प्रयत्न केला. ज्यात नलचं राज्य त्याला परत मिळालं व तद्नंतर नल व दमयंती सुखानं आपल्या राज्यात राज्यकारभार करु लागले.
           रामदासचंही तसंच झालं होतं. नल जसा द्युतात आपलं राज्य हारला होता. तसाच रामदासनं देखील लाचलुचपतच्या माध्यमातून आपली नोकरी गमावली होती. त्यातच ज्याप्रमाणे नलनं द्युतात राज्य हारल्यानंतर आपल्या हलाखीच्या परिस्थितीचा सामना केला. ज्यात त्याची पत्नी दमयंतीनं त्याची साथ सोडली नाही. तसेच हालहाल रामदासचेही झाले होते. त्यालाही तशाच परिस्थितीचा सामना करावा लागला होता. परंतु नलला त्याच्या पत्नीनं साथ दिली. ती त्याचेसोबत आनंदानं वनात गेली. कोणतीच, कशाचीही कुरकूर केली नाही. मात्र अदिती रामदासच्या मागे कुरकूर करीत होती. ते पाहून त्याला अतीव राग येत होता.
           ते गाव व त्या गावात अदिती जाताच तिनं घरातल्या घरातच संसार दाटला होता. तिला विहिरीवर पाणी भरुन आणायलाही लाज वाटत होती. त्यातच ते विहिरीवरील पाणीही न लाजता रामदासच आणत होता. ती फक्त स्वयंपाक करीत होती. तेही घरात नाक मुरडून. त्यातच शेतातून थकून भागून रामदास जेव्हा घरी यायचा. तेव्हा त्याचं उत्तम प्रकारे स्वागत व्हायचं नाही. तेच ते टोमणे त्याला तिच्याकडून मिळायचे. तसं गावंही त्याला टोमणे देतच होतं. मात्र तिचे त्यावर टोमणे व बोलणं ऐकलं की रामदासच्या तळपायाची आग मस्तकात जायची. तसा तो जेव्हा शेतात जात असे. तेव्हा शेतातून त्याला घरीच जावंसं वाटत नव्हतं. कधीकधी राग अनावर व्हायचा व वाटायचं की मरुन जावं व आपलं जीवन संपववावं. परंतु त्याचक्षणी त्याच्या डोळ्यासमोर यायची त्याची लेकरं. जी लेकरं कुणाकडं पाहतील. असा त्याला विचार येत असे. त्यातच त्या लेकरांकडं पाहून रामदास आत्महत्येसारखं पाऊल उचलत नव्हता. तसाच दुसरा विचार त्याला यायचा की आपणही दारु प्यावी व नशेत आपलं दुःख विसरावं. तसं त्यानं अनेकवेळेस करुनही पाहिलं. परंतु तसं घडलं नाही. त्याला नशा केल्यानंतरही दुःख विसरता आलं नाही. शेवटी त्यानं दारुचा छंदही सोडून दिला होता.
         रामदासला वाटायला लागलं होतं. दारुचा छंद. तो काही बरा छंद नाही. छंद जोपासावा, परंतु आपल्या परीवाराकडेही लक्ष द्यावे. लक्ष द्यावेच घरी. कारण आपल्या परीवाराचं नुकसान होणार नाही. त्यातच आपला परीवारही सुखी आणि सुरक्षीत राहिल. त्याला कोणत्याच गोष्टीची काळजी वाटणार नाही.
        छंद जोपासावा. परंतु त्या छंदात कोणी वाहून घेवू नये वा वाहून जावू नये. असं म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. कारण आजचा समाज असाच आहे की तो छंद तर जोपासतो. परंतु त्या छंदात स्वतः वाहून जातो. तो छंद जोपासत असतांना त्यांचं घराकडे लक्ष राहात नाही. याबाबतीतील एक प्रसंग. एका लेखकाने एका ग्रुपवर आपला परीचय पोस्ट केला. जो एक शिक्षक होता. ज्यात त्याचं भरपूर कार्य होतं. ते वाचून एक उच्चविद्याविभूषित शिक्षक म्हणाले की सर, विद्यार्थी पण यांचेच वाचन व अभ्यास करतात का? अध्यापनाला वेळ मिळतो का सर. याचाच अर्थ असा होता की त्या लेखकाचं एवढं लिखाण होतं की ते पाहून कोणाच्याही मनात तसाच विचार येवू शकेल. कारण एवढं लिहिणं त्या शिक्षकांसाठी वा कुणासाठी साधी गोष्ट नव्हती. त्यातच त्या शिक्षकाची कल्पना की सदर लेखक महोदय शिक्षकांचं एवढं लिखाण आहे की तो शिक्षक शाळेतही लिहित असेल. 
          ते शिक्षक लेखक महोदय, लेखन करीत होते त्यांना मिळालेल्या फावल्या वेळात. कारण ते ज्या शाळेत काम करीत होते की ज्या शाळेत त्यांच्या लेखनीला वाव नव्हता. शिवाय त्यांच्या चांगल्या कर्तृत्वालाही वाव नव्हता. त्यातूनच ते लेखक महोदय घडले व त्यांना लेखन करता आलं. जे काही शाळेतील अनुभव येत. ते अनुभव ते लेखक महोदय घरी टिपून ठेवत. ज्यातून लेखन वाढत गेलं. शिवाय त्या लेखकाला तो छंदच जडला. परंतु त्या छंदात ते लेखक महोदय वाहावत गेले नाही. कारण त्यांच्या शाळेत त्यावर बंधन होतं व कोणत्याही क्षणी त्या लेखकाला त्या शाळेतील प्रशासन पकडून धारेवर धरु शकत होते. 
          शाळा ही संस्काराचं बीजारोपण करतं. ती शाळा जशी विद्यार्थ्यावर संस्कार टाकते. तशीच संस्कार करते शिक्षकांवरही. शाळेनं जर विचार केला तर एक शिक्षक नशापाणी करणाराही तयार होवू शकतो वा तेथील विद्यार्थी नशापाणी करणारे वा बदमाश बनू शकतात. अन् दुसऱ्याच अंगानं विचार केल्यास तेथील शिक्षक हे संस्कारी स्वरुपाचेही बनू शकतात. अशातच ती त्या लेखक महोदयाची शाळा होती. ज्या शाळेत शिक्षकांच्या वात्रट वागण्याला वाव नव्हता. ज्या शिक्षकाला दारुचं, खऱ्याचं व्यसन असेल तर ताबडतोब त्याला इशारे दिले जात. ज्यातून शिक्षक घडले व त्यापाठोपाठ विद्यार्थीही घडले. पुढे शिक्षक संस्कारी स्वरुपाचे तयार झाले. 
          सदर शिक्षक लेखक महोदयाच्या लेखनावर सदर शिक्षकांचा जो प्रश्न होता. त्यावर उत्तर देत लेखक महोदय म्हणाले, की सर, हे कार्य मी घरी फावल्या वेळात करतो. कामाच्या वेळेत नाही. कारण त्या लेखकाला घरी बराच वेळ मिळायचा. ज्यातून त्याला लेखन करता येत असे. 
         लेखक महोदय पुन्हा म्हणाले की माणसाला छंद नक्कीच असावा. परंतु त्या छंदात वाहून जावू नये. असं माझं मत. दारु पिण्यापेक्षा वा नशा करण्यासाठी चौकात उभं राहण्यापेक्षा हा माझा छंद बरा आहे. मी कर्तव्याला प्रथम स्थान देतो व इतर गोष्टी करण्यासाठी आमच्या शाळेत वाव नाही. त्याबाबतीत तरी आमची शाळा चांगली आहे सर.
         छंदाच्या बाबतीत सांगायचं झाल्यास काही लोकं छंदामुळेच पुढे गेले. ज्यांनी छंदात स्वतःला वाहून घेतलेलं होतं. ज्यात थॉमस अल्वा एडीसन या जग प्रसिद्ध शास्रज्ञाचं उदाहरण देता येईल. त्यांना विजेचा शोध लावायचा होता व त्या छंदासाठी त्यांनी आपल्याच घरची धानाची गंजी जाळली. ज्यातून त्यांच्या वडिलांनी त्यांना घराबाहेर हाकलून लावले. तरीही त्यांनी छंदाला सोडलं नाही. त्यानंतरही असा छंद सुरुच ठेवला. असाच छंद जोपासत असतांना त्यातच आपलं पोट जोपासत असतांना त्यांनी रेल्वेच्या डब्यातच आश्रय घेतला. त्या रेल्वेच्या डब्यातही ते प्रयोग करीत व पोटासाठी वेगवेगळ्या वस्तू रेल्वेतील प्रवाशांना विकत. ज्यातून त्यांचं पोट चालत असे. परंतु पुढे असे पोट चालणे बंद झाले. जेव्हा पिवळा फॉस्फरस प्रयोग करतांना खाली सांडला. ज्यातून रेल्वेच्या डब्याला आग लागली. ज्यातून शहानिशा झाल्यानंतर थॉमस अल्वा एडीसनला रेल्वे डब्यातून हाकलून दिले. तरीही त्यांनी छंद सोडला नाही. ज्या छंदातून पुढं जावून त्यांनी विजेचा शोध लावला. असं त्यांचं अलौकिक कार्य. आज अशी बरीचशी मंडळी आहेत की जे अशा छंदात गढून जातात. ज्यातून काहीतरी विपरीत घडतं. परंतु ते छंद त्यांना पुढे जाण्यास प्रेरक ठरतात. 
          नवीन शैक्षणिक धोरणात अशाच छंदाला वाव आहे. मुलं घडवायची असतील तर त्याच्यातील त्याची आवडनिवड शिक्षकांनी लक्षात घ्यायची असते. ज्याला सुप्त गुण म्हणतात. ते ओळखून त्याला वाढवायचे असतात. ज्यातून ते विद्यार्थी पुढे जावून एखादा नवीन शोध लावू शकतील. ज्यातून साहजीकच देशाचा विकासही संभव असेल.
           छंद...... छंदाला व्यासंग देखील म्हणता येईल. तसाच छंदाचा इतिहास पाहिल्यास त्या थोर व्यक्तीमत्वाचा यात समावेश होईल की ज्यांनी स्वातंत्र्याचा इतिहास घडवला. ज्यांनी स्वातंत्र्य मिळविण्यासाठी प्राणांचं बलिदान दिलं. काय गरज होती त्यांना देशासाठी बलिदान देण्याची. परंतु तो त्यांना छंद होता. स्वातंत्र्याच्या भावनेनं त्यांना झपाटून टाकलं होतं. ज्यातून स्वातंत्र्य मिळालं.
          छंद बाबासाहेबांनाही होता. ज्यांनी आपल्या स्वास्थाचा विचारच केला नाही. तसाच छंद तुकाराम महाराजांनाही होता की ज्यांनी आपलं घरदार पाहिलं नाही.
         छंद हा प्रत्येकाला असतोच. कुणाला दारु पिण्याचा असतो तर कुणाला नशा करण्याचा. छंदानं घरादाराकडे लक्ष नसतंच. त्याचा परिणाम हा त्यांचं घरदार उध्वस्त करुन टाकतो. परंतु अलिकडील काळात असे छंद दिसत नाहीत की ज्यानं लोकं आपल्या घरादारावर पाणी सोडतील पुर्वीच्या समाजसेवकांसारखं. जसे पुर्वीचे समाजसेवक आपल्या घरादारावर पाणी सोडून देत होते. तसेच छंद असे असावेत की ज्यातून चांगलं मुल्य वृद्धींगत व्हावं. ज्यातून नवनवीन शोध लावता यावेत. जसं थॉमस अल्वा एडीसनचं झालं. परंतु आपल्याला छंद असतो दारु पिण्याचा, जुगार खेळण्याचा. ज्यातून नवनिर्मीती होत नाही. उलट आपलं नुकसान होतं. आज अशीही काही मंडळी आहेत की जी प्रथम आपलं घरदार पाहते. नंतर छंद जोपासते. लेखक महोदयाचाही छंद असाच होता. त्यानं आपलं आधी घरदार पाहिलं. मगच त्यानं आपली कला जोपासली.
          विशेष सांगायचं झाल्यास छंदातून नवनिर्मीती व्हावी. हे बरोबर आहे. हे जरी बरोबर असलं तरी छंदात आपलं घर वाहून जावू नये. आपलं, आपल्या परीवाराचं व आपल्या घराचं नुकसान होवू नये, असेच छंद जोपासावेत. जेणेकरुन त्यातून आपणही सुरक्षीत राहू शकू व आपला परीवारदेखील सुरक्षीत राहिल. हे ते तेवढंच खरं.
         रामदाची शेती चाअंगली पिकत होती. त्याला त्या शेतीतील उत्पन्नही चांगलं येत होतं. ज्यातून त्याच्या हातात पैसाही खेळत होता. तो कामधंद्याच्या बाबतीत खुश होता. परंतु घरातून निराश होता. अशातच त्यानंशघरातील नैराश्य बाहेर काढण्यासाठी केलेलं दारुचं व्यसन. परंतु रामदास हा विचारी होता. त्याला दारुचंही व्यसन जडलं असतं. परंतु त्यानं विचार केला. विचार केला की आज आपण दारु पिवून आपलं दुःख नष्ट करु. परंतु उद्या आपल्याच या व्यसनानं आपला परीवार अख्खा उपासात राहिल. जेव्हा आपली नोकरी गेली होती, त्यावेळेस घडलं तसं. रामदासला त्याच्या चांगल्या विचारीफणामुळं दारुचं व्यसन लागलं नाही. त्यातच त्याला शिकविणाऱ्या भुमीगत शिक्षकांनी त्याला चांगल्याच गोष्टी शिकवल्या होत्या. ज्यातून त्याला दारुचं व्यसन लागलं नाही.
          रामदास आज शेती करुन सुसंपन्न बनला होता. त्यानं शेतात लावलेली झाडं मोठी झाली होती व ती झाडं वर्षभर त्याला उत्पादन देत होती. त्यातच आता उन्हाळा असो की पावसाळा असो वा हिवाळा असो, तिनही हंगामात रामदासच्या शेतातील उत्पादन बाजारात विकल्या जात होतं. शिवाय त्याच्या उत्पादनावर ना कोणते रोग आलेले दिसत होते ना कोणतेच प्राणी त्याच्या शेतातील पिकांना खावून ध्वस्त करीत होते. उन्हाळ्यात रखरखीत ऊन राहात असल्यानं थोडंसं उत्पादन कमी यायचं. मात्र त्याची क्षती रामदासला जास्त पोहोचत नव्हती. तसं पाहिल्यास रामदास हा नोकरीपेक्षा शेतातील पिकवत असलेल्या पिकांवर खुश होता व तो शेतीवर खुश होता.
         रामदास शेतीत जास्त मेहनत घेत असे. त्याला शेती करणं आता फारच आवडत असे. मात्र तो घरी आला की परेशान होत असे. अशातच तो एक दिवस उजळला. ज्या दिवशी त्याचं मरण जवळ आलं होतं.
         आजचा तो दिवस. काल सायंकाळी रामदास घरी येताच त्याचं अदितीशी कडाक्याचं भांडण झालं होतं. भांडण कामावरुन झालं होतं. कारण रामदास जेव्हा घरी आला होता. तेव्हा भांडीकुंडी तशीच पडली होती. स्वयंपाकाला ठाव ठिकाणा नव्हता. त्यातच रामदासनं त्याचं कारण विचारलं. तसा त्याचा मूड दिवसभर शेतात राबल्यानं खराबच होता.
            रामदासनं आपल्या पत्नीला विचारलं. परंतु त्याची पत्नी त्यावर गप्प राहिली नाही. तिनं तिक्ष्ण शब्दानं प्रहार केला. त्यानंतर त्याला विचार आला की रोजरोज असं भांडण करण्याऐवजी एकदा मरुन गेलेलं बरं. मरणानंतरच माणसाची किंमत कळेल.
          ते रात्रीचं भांडण. ते कडाक्याचं झालेलं भांडण. ते भांडण रात्रीच संपलं होतं. परंतु त्या भांडणाचा रामदासच्या मनावर इतका परिणाम झाला की आज सकाळपासूनच त्याचं मन उद्विग्न झालं होतं. त्याचं मन काल रात्रीपासूनच मानत नव्हतं. 
         सकाळ झाली होती. तसा सकाळीच तो कोणाला न सांगता घराच्या बाहेर पडला. त्यातच रात्रीला भांडण झालं असल्यानं त्याची पत्नीही त्याचेशी बोलली नाही. मुलं तसं पाहिल्यास झोपलीच होती. त्याचं मुलाचं तोंड पाहिलं व तो थेट शेताकडे निघाला. तशी दुपार झाली होती. परंतु आज भांडण झाल्यानं तो घराकडेही परतला नाही.
          आज सकाळपासूनच त्याचं डोकं खराब होतं. तसा तो शेतात गेला होता आणि काम करीत होता. परंतु त्याच्या मनात तेच विचारचक्र सुरु होते. कामात आज अजिबात मन लागत नव्हतं. दुपार झाली होती. त्याला भूक लागली होती. परंतु त्याच्या पत्नीशी त्याचं भांडण झाल्यानं त्याला घरी जावंसं वाटत नव्हतं. जशी दुपार कलंडली. तशी भूक फार वाटायला लागली होती. अशातच पाच सहा वाजले. 
         सायंकाळचे सहा वाजले होते. सायंकाळी त्याच्या मनात विचार आला. विचार आला की आपण आत्महत्या करावीच. अन् तिही शेतातच करावी. ज्यानं आपल्या पत्नीला तर अक्कल येईल. शिवाय आपली आत्महत्या शेतकरी आत्महत्या म्हणून जाहिर होईल. आपल्या पत्नीला सरकारकडून पैसा मिळेल. जो पैसा माझ्या लेकरांना कामात येईल. आपण असं दाखवू की ही माझ्यासारख्या शेतकऱ्यानं शेतीच्या नापिकीला कंटाळून आत्महत्या केलेली आहे. ज्याला दिवस दिवस उपाशी राहावं लागलं.
           विचारांचा अवकाश. तो त्याच बाभळीच्या झाडावर चढला. ज्या बाभळीची सावली खळ्यात पडत होती. ज्या बाभळीची एक फांदी खळ्यात येत होती. 
         रामदास दोर घेवून झाडावर चढला. त्यानं दोराचं एक टोक बाभळीच्या झाडाच्या फांदीवर बांधलं व दुसरं टोक आपल्या गळ्यात. तसं त्याचं आज जीवन जणू संपलंच होतं. त्यानं एक टोक झाडाला बांधताच व दुसरं टोक गळ्यात बांधताच त्यानं त्या झाडावरुन उडी मारली. मग काय, तो दोर बाभळीच्या फांदीवरून त्याच्या गळ्याचा वेध घेत त्याच्या गळ्यात आवळल्यानं त्याची जीभ बाहेर निघाली. तसा श्वास गोठला गेला. त्याचबरोबर तो तडफडू लागला व थोड्याच वेळात गतप्राण झाला.
          सायंकाळ झाली होती. रात्रीचे आठ वाजले होते. सकाळपासून रामदास घरातून निघून गेला होता. तो आज दुपारीही घरी आला नव्हता आणि आज रात्रीचे आठ वाजले होते. अंधार पडला होता. तरीही तो घरी आला नव्हता. सकाळीही त्यानं कुठं जातो. हे सांगीतलं नव्हतं. 
          रात्रीचे आठ वाजले होते व अदिती चिंतेत होती. तसं रात्री भांडण झालं होतं. भांडण झालेलं असल्यानं अदिती सकाळीही त्याचेशी बोलली नाही. तशी तिला चिंता पडली. काय झालं असावं. आपला पती कुठं गेला असावा. तसा तो दररोज शेतावरच जातो. शेतावर जाऊन पाहावं की काय?
          अदितीच्या मनातील तो विचार. त्यातच ती भयाण रात्र. तशी ती शेजारच्या घरी गेली. तिनं रातच्याला त्याच्यासोबत भांडण झाल्याचं सांगीतलं नाही. मात्र आपला धनी घरी अद्यापही परतला नाही. असं तिनंच शेजारच्याला सांगीतलं. आपला धनी शेतातच जातो असं सकाळी म्हणत होता. असंही सांगीतलं. 
         अदितीनं शेजारच्यांना तसं सांगताच त्यानं अख्खं गाव गोळा केलं व तो अदिती सोबत त्याच्या शेताकडे जायला निघाला. थोड्याच वेळात शेत आलं होतं. 
         ते शेत. त्या शेतात सर्वांनी न्याहाळून पाहिलं. सर्वांनीच शेतातील कोपरे न्याहाळून पाहिले. विजेरीचा शोध लागल्यानं विजेरीचा प्रकाश होताच. त्यातच ते खळं दिसलं आणि एकानं शंका आल्यानं विजेरी वर लावून पाहिली तर पाहतो काय, रामदासचं प्रेत बाभळीच्या झाडाच्या फांदीला लटकलेलं दिसलं. तसा तो जोरात ओरडला. रामदासऽऽ,
         'रामदासऽऽ' जोरानं ओरडल्याचा तो शब्द. तोच बाकीचे म्हणाले,
          "कुठाय रामदास?"
           रामदास नावाचा शब्द ज्यानं उच्चारला होता. तो धपकन खाली पडला. जणू त्याला एक झटका लागल्याचा भाष झाला. तसं सर्वांनी त्याला उठविण्याचा प्रयत्न केला. त्यातच त्यानं डोळे उघडले. तोच त्याला पुन्हा तोच प्रश्न.  
          "काय झालं? कुठाय रामदास?"
           त्याचं नाव गणबा होतं. गणबानं न बोलता हातानं इशारा केला. तोच सर्वांनी वर पाहिलं. रामदास एका बाभळीच्या फांदीला दोर बांधून लटकला होता. त्यानं आत्महत्या केली होती. तसं कोणीतरी म्हणालं,
          "ही शेतकरीच आत्महत्या होये भाऊ. बिचाऱ्यानं शेतीच्या नापिकीला वैतागून आत्महत्या केलीय." एकजण बोलून गेला. तसा दुसरा म्हणाला,
          "मला नाही वाटत का तो शेतीच्या नापिकीला कंटाळला असावा. अरे तो तर प्रयोगशील शेतकरी. तो शेती करुन खुश होता व त्याले भरपूर पैसा शेतात भाटत होता. त्यानं उन्हाळ्यातही शेतीत नंदनवन फुलवलं होतं. मग ही शेतकरी आत्महत्या कसलीय?" त्यावर उत्तर देत आणखी एकजण म्हणाला,
         "तुले काय करायचंय. अरे ही जरी शेतकरी आत्महत्या नसल तरी याले शेतकरी आत्महत्या म्हणूनच आपण घोषीत करुन. अरे दोन चार पैसे मिळतीन त्याच्याच घरवालीले. बिचाऱ्याच्या लेकराले भेटतीन दोन चार आणे. तेबी खुश होतीन. तसंबी त्याईले आतं बापाविनाच आख्खी जिंदगी काढा लागन."
         सगळ्या गावातील लोकांची मते मतांतरे. अशातच एकजण म्हणाला,
         "आतं निसत्या गोष्टीच करान का त्या रामदासची डेथबॉडी काळान झाडावरुन." ते त्याचं बोलणं. तोच दुसरा एक म्हणाला,
          "नाई, नाई. आपण रामदासची डेथबॉडी काढाची नाई. नाईतं आपल्यालेच पोलीस म्हणतीन, का त्याले फासावर आपूनच लटकवला. नाई, नाई. आपून त्याची तक्रार पोलीस ठाण्याले द्याची."
           ते त्यांचे शब्द. तोच त्या व्यक्तीनं सुचवल्यानुसार रामदासच्या डेथबॉडीची सुचना पोलीस स्टेशनला दिली व लवकरच पोलीस घटनास्थळी पंचनाम्यासाठी दाखल झाले होते.
          पोलीस आले. त्यांनी रामदासची डेथबॉडी बाभळीच्या झाडावरुन उतरवली. ती उत्तरीय तपासणीसाठी तपासणीला पाठवली. त्यानंतर शवाचं विच्छेदन झालं व कळलं की संबंधीत व्यक्ती हा उपाशी होता. त्यावरुन त्याच्या घरी अन्न नसेल. ज्यातून त्याला खायला मिळालं नसेल. याचाच अर्थ असा की त्याचं शेत पिकत नसल्यानं त्याचेवर उपाशी राहून मरणाची पाळी आली असेल. 
         ती रामदासची आत्महत्या. ती त्याच्या घरच्या घरगुती भांडणानं झाली होती. तसं पाहिल्यास आताही त्याचं शेत पिकत होतं. इतरांसारखं त्याचं नव्हतं. तो प्रयोगशील शेतकरी होता.
         रामदासच्या शवाच्या उत्तरीय तपासणीनंतर शवाची आत्महत्या ही शेतकरी आत्महत्या आहे. असं सिद्ध झालं. त्यानंतर त्याला सरकारकडून आर्थिक मदत म्हणून काही पैसे मिळविण्याचे प्रयत्न झाले. काही नेत्यांनी आम्ही शेतकरी वर्गाला सहानुभूती दाखवतो म्हणून त्याच्या शवासोबत फोटोही काढले. त्यातच काही नेते त्याच्या अंत्ययात्रेतही सहभागी झाले. 
          रामदासची अंत्ययात्रा पार पडली होती. कुटूंबाला आर्थिक मदतही मिळाली होती. जी आयुष्यात कधीच पुरणार नव्हती. तसं पाहिल्यास भांडण अजिबात मिटलं होतं. तसा अदितीला त्याच्या मृत्यूनं बोध मिळाला होता. ती सुधरली होती. 
         आज अदिती म्हातारी झाली होती. तिची दोन्ही मुलं आज शिकून सवरुन मोठी झाली होती. त्यांचं शिक्षण पाणी तिनं बरोबर केलं होतं. तो नसल्यानं तिच्यासमोर बरेच प्रश्न उपस्थित राहात होते. परंतु घाबरुन न जाता तिनं कशीतरी आपली दोन्ही मुलं वाढवली होती. ती आयुष्याची सांज तिला आज पदोपदी आठवत होती. कारण त्याच सांजेनं तिला जीवन कसं जगावं हे शिकवलं होतं.
         रामदासच्या मरणानंतर अदितीवर दुःखाचा डोंगरच जणू कोसळला होता. आपला पती कधीकाळी अशीही आत्महत्या करेल. हे काही तिला कधीच वाटलं नव्हतं. ते तिला ठामपणे वाटत होतं. वाटत होतं की तो पती, ज्या पतीनं नोकरी गेल्यानंतरही हार मानली नाही. तो खरंच आत्महत्या करणार नाही. तेच कारण तिच्या भांडण करण्याला अनुरूप ठरलं. परंतु जेव्हा तिच्या पतीनं आत्महत्या केली. तेव्हा मात्र तिचे डोळे खाड्कन उघडले. आरोपी तीच होती. परंतु सध्याच्या परिस्थितीनं तिला आरोपी बनवलं नाही. वरुन तिला लाभ दिला.
         रामदास तर या जगातून निरोप घेवून निघून गेला होता. तशी अदिती त्याच्या आत्महत्येस जबाबदार होती. अन् ती जबाबदार असली तरी ती त्या आत्महत्येच्या गुन्ह्यातून सुटलीही. परंतु त्यानंतर तिनं जे भोग भोगले. ते भोग शब्दात मांडणं कठीण आहे. 
         पती निधनानंतर कामाची सवय नसलेल्या अदितीला कामाला जावे लागले होते. शेतीची कामं करण्याची सवय नसल्यानं तिला शेतातील कामं जमत नव्हती. त्यातच तिची मुलं लहानच असल्यानं मुलांचं पालनपोषण करणं तिला अवघड जात होतं. तिला एक भाऊ व बहिण होती. जे तिच्यावरुन मोठे होते व शहरात राहात होते. ज्यांना तिच्या पतीनं, तो जीवंत असतांना बरीच मदत केली होती. परतु पती निधनानंतर ती जेव्हा त्यांना मदत मागायला गेली. तेव्हा त्यांनी तिला सर॓सरळ घरातून हाकलून दिलं होतं. त्यातच जवळचे होते नव्हते तेही नातेवाईक तिला जवळ करीत नव्हते. अन् राहिला गाव. गावच्याही व्यक्तींना ती काम करु शकत नसल्याचं माहित असल्यानं ते तिला आपल्या शेतावर कामाला नेत नव्हते. शेवटी तिला रडण्याशिवाय पर्याय नव्हता. आता तिला आपल्या पतीची आठवण यायची व वाटायचं की आपला पती जीवंत असतांना त्यानं आपल्याला कोणाच्या घरी कामाला पाठवलं नाही. जेव्हा नोकरी गेली. त्याही काळात तोच कामाला गेला होता. तिला त्याही काळात कामाला नेलं नव्हतं. त्यातच ते जेव्हा गावाला आले होते. त्याही काळात तोच स्वतः तिला विहिरीवरुन पाणी भरुन द्यायचा. कधी घरी स्वयंपाकही. 
          अदितीला जेव्हा कधी जास्तीचे कष्ट पडत असत. तेव्हा निश्चीतच तिला आपल्या पतीची आठवण येत असे. तशी आठवण आली की ती रडत बसत असे. तेव्हा हळूच तिच्या लेकराचा प्रवेश घरात व्हायचा. तेव्हा ती आपले पानावलेले डोळे पुसायची व आपल्या लेकराला जवळ घ्यायची. परंतु तिचे पानावलेले डोळे तिच्या लेकराच्या डोळ्यातून सुटायचे नाहीत. ते तिचे डोळे पुसायचे. तेव्हा उर भरुन यायचा व ती अगदी हुंदके देत देत लेकरांना कवटाळून ओक्साबोक्सी रडून घेत असे.
          अदिती आज बहिणीकडं गेली होती. तिनं बहिणीला पुरेसे पैसे मागीतले होते. परंतु तिनं तिला देण्यास नकार दिला होता. एवढंच नाही तर तिचा अपमानही केला होता. तशी पती गेल्यापासून ती कधीच कामावर गेली नव्हती. सरकारी मदत जी झाली होती. त्यातील काही पैसा तिनं काढू काढू खर्चून टाकला होता. थोडासाही पैसा बँकेत शिल्लक नव्हता. दोनचार हजार रुपये तेवढे शिल्लक होते. वाटत होतं की जर हा पुर्णच पैसा हळूहळू काढून खर्चून टाकला तर एक वेळ अशी येईल की आपल्याला उपासात दिवस काढावे लागतील. त्यामुळंच आज पहिल्यांदाच ती गावात एका घर बांधकामाच्या कामाला गेली होती. तसा तिच्या कामाला जाण्याचा पहिलाच दिवस होता. 
          तो पहिलाच दिवस. लेकरांसाठी कामाला जाणं भाग होतं. शिवाय पोटाचाही प्रश्न होता. तोही सोडविणं भाग होता. परंतु जेव्हा ती बांधकामाच्या कामाला गेली. तेव्हा काम करतांना तिला ब्रम्हांड आठवत होतं. ते काम सोपं होतं. परंतु कधीच तसं काम न केल्यानं तिला फार कठीण वाटत होतं. तशी दुपार झाली व तिला चक्कर यायला लागली होती. ते पाहून बांधकाम मिस्र्यानं तिला विश्रांती करायची विनंती केली व तिनं अर्धा दिवस काम करुनही तिला पैसे दिले नाही.
          ते शेतीचं काम असो की आणखी कोणतं काम असो, तिला दुसऱ्याच्या घरी राबणं आवडत नसलं तरी पोटासाठी व पैशासाठी तिला काम करणं भाग होतं. परंतु ती कामं जमत नसल्यानं शेवटी तिनं ठरवलं. आपणही आपलीच शेती करायची. जशी जमेल तशी. शेवटी जी कधीही शेतात गेली नव्हती. त्या शेतात ती पहिल्यांदा गेली. तिनं शेतीत पाय ठेवला. त्यानंतर तिनं शेतीला नमन केलं. त्याचबरोबर तिनं त्या बाभळीच्या झाडाला नमन केलं. ज्या बाभळीच्या झाडाच्या फांदीवर तिचा पती रामदास फासावर लटकला होता. त्यानंतर तिनं मनोमन रामदासच्या आत्म्याला प्रार्थना केली. म्हटलं की तिच्या हातून महाभयंकर चूक झालेली आहे. असं घडायला नको होतं. परंतु घडलं. ती त्याच्या आत्महत्येची दोषी आहे. तिला त्यानं माफ करावं. कदाचीत लेकरासाठी तरी माफ करावं. तिनं त्याच्या मृत्यूनंतर बरेच भोगमान भोगलेले आहेत. 
          तिची ती प्रार्थना. ती डोळे मिटून त्या बाभळीच्या झाडाला म्हणत होती. थोड्याच वेळाचा अवकाश. तिनं डोळे उघडले. त्यानंतर ती आपल्याच शेतात कामाला लागली. 
         तोच दिवस आज तिला आठवत होता. त्याच दिवशी तिच्यात अलौकिक असं बळ आल्याचं तिला आठवत होतं. अन् आठवत होतं, तिनं त्या दिवशी केलेलं काम. त्या दिवशी तिनं बरंच काम केलेलं होतं.
         अदिती जेव्हा शेतात गेली. तिनं पहिलं पाऊल जेव्हा शेतात ठेवलं. तसं तिला आत्मीक बळ आलं होतं. ज्या बळाच्या आधारावर तिनं आपल्या सुखद जीवनाला प्रारंभ केला होता. आज ती काट्याकुट्यात शेतावर जात होती. कधी तिच्या पायाला व हाताला ते बाभळीचे काटे बोचत असत. परंतु तिनं त्याची तमा बाळगली नाही. कधी तिला शेतात जातांना साप, विंचू ही दिसत असत. परंतु ती कधीच घाबरली नाही. कधी तिला शेतातच वाघ, तरस, लांडग्यांसारखे प्राणी दिसले. परंतु त्यांचीही तिनं भीती बाळगली नाही. पती निधनानंतर तिनं कंबर कसली व शेती नित्यनेमानं करीत राहिली. ज्यातून तिचं पोट तर भरलंच. परंतु तिच्या मुलांनाही शिकता आलं.
          आज तिचे मुलंही उच्च शिक्षण शिकले होते. त्यांना शहरात नोकरी लागली होती. तिचे जीवन पालटले होते. तसंच तिनं आपल्या लेकरांना इमानदारी शिकवली होती. कारण तिला माहित होतं की तिच्या घरात परेशानी बेईमानीनंच आली होती. जर तिच्या पतीनं लाच घेवून बेईमानी केली नसती. तर कदाचीत तिही पतीला टोमणे मारत बोलली नसती. ना तिच्या पतीसोबत तिनं भांडण केलं असतं. ना तिच्या पतीच्या आयुष्यातील शेवटची सांज उजळली असती. आज तिचा पती जरी या जगातून निघून गेला असला तरी तिला ती आयुष्यातील शेवटची सांज आजही आठवत होती. अन् आठवत होती ती दुनियादारी. जी दुनिया स्वार्थानं भरलेली होती.
         ती सांजच होती त्याच्या आयुष्याची शेवटली की ज्या सांजेनं तिच्या सुखरुप आयुष्यात दुःख आणलं होतं. त्या वेदना झेलत झेलत ती आयुष्य जगत होती व मुलांनाही जगवत होती. तिच्याही आयुष्यात त्या शेवटच्या सांजेनंतर बाभळीचेच काटे पावलोपावली पसरले होते. ज्यावर मात करुन तिनं आपलं नव्हे तर आपल्या लेकराचं आयुष्य फुलवलं होतं. त्यांच्याही आयुष्यात नवचैतन्य भरुन त्यांच्याही आयुष्याला सुखद केलं होतं. 
          अदितीनं पती निधनानंतर बरंच भोगलं होतं. त्यातच तिनं पती मरुनही हार मानली नाही. तशी ती जास्त रडत बसली नाही. आलेल्या परिस्थितीवर तिनं मात केली. सुरुवातीला ती अल्लड होती. अन् विवाहानंतरही ती अल्लडच वागली. परंतु पती निधनानंतर तिनं अल्लडपणा सोडला. कारण तिला पती निधनानंतर दुनियादारी काय होते ते चांगलं कळलं होतं. कधी ती विधवा असल्यानं व तशीच ती तरुणच असल्यानं काही असामाजिक घटक तिच्या शरीराचा भोग घेण्याची कल्पना करुन तिला छळल्यासारखंही करीत. परंतु तिनं त्याला प्रतिसाद दिला नाही. काहीजण तिला दुसरा विवाह करुन टाक. असाही सल्ला देत. परंतु तिनं त्यालाही दाद दिली नाही. वाटत होतं, की मी दुसरा विवाह केल्यास माझा येणारा पती माझ्या लेकरांचा सांभाळ, पालनपोषण करणार नाही. तसं तिनं जगात घडतांना बरेचदा पाहिलंही होतं. तिनं आपल्याच मैत्रीणीचा स्वभाव पाहिला होता. तिच्या मैत्रीणीनं एका लेकरासमवेत ती विधवा झाल्यानंतर विवाह केला होता. परंतु तो पती तिच्याच मुलीला छळून अनैसर्गिक कृत्यही करीत होता व त्याची तक्रारही तिची मैत्रीण पोलीस स्टेशनला करु शकत नव्हती. कारण तो तिच्या मैत्रीणीला व तिच्या मुलीलाही मारत असे आणि म्हणत असे की जर तिनं त्याच्याविरोधात कुठंही कोणती वाच्यता केली तर तो तिला व तिच्या मुलीलाही जीवंत सोडणार नाही. 
         तिची मैत्रीण दुसरपणात विवाह करताच आपलेच दात व आपलेच ओठ असल्यागत सगळं सहन करीत होती. तसे हाल आपले होवू नये. म्हणून तिचा असलेला दुसऱ्या विवाहाला विरोध तिचं अर्थपुर्ण जीवन घडविणारा ठरला. आज ती सुखी होती. परंतु आजही तिला ती आयुष्याची सांज आठवत असे. तेव्हा ती विचलीत होत असे. ती व्यथीत व कासावीस होत असे. मग तिचा जीव कासावीस झाला तर तिला त्या रात्रीला झोपही येत नसे. सारखी या कडेवरुन त्या कडेवर जातांना रामदासची आठवण येत असे. त्यातच आठवत असे ते खळं अन् त्या खळ्याच्या वर असलेल्या त्या बाभळीची फांदी. ज्या बाभळीच्या फांदीनं काट्यासारखं टोचून तिच्या जीवनात काटेच भरले होते, त्याच्या मृत्यूनंतर. ती त्याच्या आयुष्यातील शेवटची सांज, तिच्या आयुष्याला नवे वळण देणारी ठरली होती. 

*********************************************समाप्त**************