ते स्वप्न जराशी स्पष्ट दिसते मग त्यांना ते थोडे का होईना समजू लागते की जे स्वप्नात काळी रात्र व चंद्र माझे अमावस्याच आहे कारण त्याच दिवशी सुरेश ने त्याच्या घरी बोलावले आहे म्हणजे जो काही उलगडा होईल तो त्याच दिवशी होईल असे त्या दोघांनाही वाटते रोज सारखेच त्याचे काम चालू होते जॉब ला जा व जॉब वरून घरी या तर निशा वर्क फ्रॉम होम चालू होते ती घरीच होती निलेश च्या बॉसने निलेश चे प्रमोशन करण्याचे ठरवले होते ते निलेशचा बॉस दोन ते तीन दिवसात करणार असतो त्यामुळे निलेश प्रमोशन मुळे का होईना आनंदी होता निशा व निलेश ला म्हणजे दोघांनाही पर्सनली वाटले की एकमेकांना भेटावा असे ते ज्या वेळेस ठरवतात त्यावेळेस ते अचानक का होईना पण भेटतात त्यामध्ये तर त्यांच्याकडे एकमेकांचे फोन नंबर पण नाही कॉल करण्यासाठी मग असेच दोन ते तीन दिवस गेले निशाणा तिच्या बेस्ट फ्रेंड शरयूची आठवण येते ती शरयू ला कॉल करते व त्या दोघी बोलत असतात मग निशा म्हणते की मी खूप दिवसांपासून घरीच आहे बसलेले त्यामुळे आपण कुठेतरी फिरायला जाऊ आणि आपण असाही खूप दिवसांपासून भेटलो ही नाही .
शरयू : - हो ना चालेल
निशा : - कोठे फिरायला जायचे मग?
शरयू : - आपण ना पहिल्यांदा हॉटेलमध्ये जाऊ मग मॉलमध्ये शॉपिंगला जाऊ.
निशा : - हो चालेल
शरयू : - उद्या जायचे का?
निशा : हो चालेल .
मग निशा व शरयू दोघेही शॉपिंगचा प्लॅन करतात जाण्यासाठी तयारी करतात .
तर निलेश ला ही ऑफिसचे काही काम असते व निलेश चा बॉस निलेश चे प्रमोशन करणार होता त्याच धावपळीत निलेश असतो प्रमोशनचा छोटासा प्रोग्राम एका हॉटेलमध्ये ठेवलेला असतो व तो प्रोग्राम ही उद्याच असतो मग तो त्याच्या तयारी मध्ये असतो त्यालाही उद्या हॉटेलमध्ये जायचे असते दुसऱ्या दिवशी निशा तिच्या बेस्ट सोबत शॉपिंगला हॉटेलवर जेवणासाठी निघते दोघीही सोबत असतात सोबत त्या गप्पा मारत जातात पण त्या निशाच्या गाडीमध्ये जातात जाताना त्या ठरवतात की आपण आधी शॉपिंग करायची व मग हॉटेलमध्ये जायचे तर तिकडे निलेश हा खूपच धावपळीत होता कारण त्याच्या मागे आज खूपच कामे होती तो घरून आधी ऑफिसला गेला व ऑफिसमधले कामावरून तो हॉटेल वरती प्रोग्रॅम साठी सर्वांबरोबर जायचे हे त्याने ठरवले होते त्याचे आज प्रमोशन होणार म्हणून कलिक त्याला विश करत होते काहींना त्या गोष्टींचा आनंद होत होता . तर काही असे होते कि त्याच्याकडे पाहून तोंड पाडून बसले होते त्याच्यावर जलाश फील होत होते निशा व शरयू एका मोठ्या मॉलमध्ये शॉपिंगला जातात जवळपास दोन ते तीन तास त्या मॉलमध्ये फिरतच असतात जे आवडेल ते घेताही असतात निलेश अजून ऑफिसमध्ये असतो त्याचे काम चालू असते एखाद्या तासात ते ऑफिस मधून निघणार होते जवळपास काम आवरले होते.
मग निशाची शॉपिंग करून होती व त्या दोघी हॉटेल कडे जाण्यासाठी निघतात व निलेश व त्याचे कलिक हे पण त्यांचे काम झाले असल्याने प्रोग्राम साठी हॉटेल कडे जायला निघतात निशा व शरीर हॉटेलमध्ये पोहोचतात मग त्या हॉटेलमध्ये जाऊन ऑर्डर करतात व थोड्या वेळात वेटर येणार असतो तोपर्यंत त्या गप्पा मारत बसतात जेवण येते जेवणाला सुरुवात करतात मग तोपर्यंत निलेश आणि बाकीचे अर्ध्या रस्त्यापर्यंत पोहोचलेली असतात तोपर्यंत निशा व शरयूचे जेवण अर्धे झालेले असते पुढे योगायोग असं जुळतो की ज्या हॉटेलमध्ये निशा व शरयू जेवण करत असतात त्याच हॉटेलमध्ये निलेश व त्याचे कलीग प्रोग्रॅम साठी येतात ते हॉटेलमध्ये जातात मग त्यांचा ज्या ठिकाणी प्रोग्राम होणार आहे त्या ठिकाणी निलेश व ते जातात मग त्यांचा प्रोग्राम तिकडे चालू होतो निशा व शरयू ला वाटते की कोणाचा बर्थडे किंवा कसला कोणाचा प्रोग्राम असेल छोटा मोठा त्याकडे निशा दुर्लक्ष करते ती फक्त तिच्या जेवणाकडे लक्ष देते व जेवण आटोपते निशा तिचे जेवण झाल्यावर कसला प्रोग्राम चालू आहे हे बघण्यासाठी जातात तिथे ती बघते तर काय की स्टेज असते स्टेजवर दोन-चार खुर्च्या मांडलेल्या असतात त्यापुढे टेबल असतो त्याला डेकोरेट केलेले असते त्याच्यामुळे एक मोठा छापलेला कागद असतो त्यावर प्रमोशन प्रोग्राम असे इंग्लिश मध्ये लिहिलेले असते स्टेजच्या खाली काही खुर्च्या मांडलेल्या असतात तिच्यावर काही माणसं बसलेली असतात पण ह्या दोघी त्या माणसांमध्ये कोणालाही ओळखत नाही व मग त्यांना वाटते की आधीच घरी जाण्यासाठी वेळ झाली आहे त्याच्यात अजून थांबले तर खूपच वेळ होईल व तिथे अनोळखी प्रोग्राम साठी का थांबायचे व म्हणून त्यातून जाण्यासाठी निघतात तर फक्त मागे फिरतात तर निशाला निलेश त्या हॉटेलमध्ये दिसतो ते बघून निशा शॉक होते व बोलते की ओ माय गॉड तर शराबी तिला शॉक होण्याचे कारण विचारते शरयूला निशा व निलेश मध्ये झालेले घटना माहिती नसते शरयू म्हणते की तुझे कोणी ओळखीचे दिसले का इथे तर ती हो म्हणते शरयू म्हणते कोण आहे ?
निशा : निलेश कडे बोट करते व शरयूला सांगते की तो निलेश आहे त्याला बघून मी शॉक झाले.
शरायु : का ग❓ शॉक का झाली? तुम्ही का खूप दिवसापासून दिसले आहात का एकमेकांना ?
निशा : हो ना .
शरायु : मला तू डिटेल मध्ये सांग की नेमका हा निलेश आहे कोण ?
निशा : ती खूप मोठी स्टोरी आहे एवढे ऐकायला वेळ नसेल तुझ्याकडे .
शरायु : हो आहे हे ऐकण्यासाठी मी वेळ काढेल फक्त तु मला आज त्याच्याविषयीच सांग. मग स्टोरी सांगायला पूर्ण दिवस गेला तरी चालेल .
निशा : बरं पण तुला हॉटेलमध्येच इथे बसून ऐकावे लागेल कारण मला त्याला भेटायचे आहे चालेल ना तुला ?
शरायु : हो चालेल .
निशा मग शरयू ला पहिल्यापासून शेवटपर्यंत निशा व निलेश मधील झालेली घटना सांगायला सुरुवात करते निशाने निलेशला बघितले पण निलेश लक्ष अजून पर्यंत निशाकडे गेले नाही कारण निलेश त्याच्या कामांमध्ये व्यस्त होता . निशा सर्व स्टोरी सांगता सांगता स्टोरी संपते .
शरायु : खूपच मोठी गोष्ट आहे ग ही तुम्हाला आधी का नाही सांगितली?
निशा : अगं एवढे सांगायला तुला माझ्याकडे वेळच नव्हता हे तुला माहित आहेच की माझ्या मागे किती कामे असतात ते यांचे बोलणे संपते व निलेश चा प्रोग्राम ही संपतो निलेश घरी जायला निघतो जाता जाता त्याचे लक्ष तिच्याकडे जाते हे शरयूला समजते की हे दोघेजण आता बोलतील म्हणून शरयू घरी निघून जाते . व मग निशा व नीलेश जवळ येतात . बोलायला सुरुवात करतात .
निलेश - Hi
निशा - hello
निलेश - तू इथे कशी ?
निशा - मी इथे माझी फ्रेंड शरयू सोबत आले होते तू कंटाळा येतो म्हणून फिरायला म्हणून आलो होतो मला हे सांग की तू इथे कसा ?
निलेश : ok . आज ना माझा छोटासा इथे प्रमोशन प्रोग्राम होता म्हणून माझे इथे येणे झाले .
निशा : ok. Congratulations. Nilesh.
निलेश : thanks.
निशा : मला तुझ्याशी बोलायचे आहे .
निलेश - हो बोल ना
निशा : त्याला सुरेश विषयी सांगायला सुरुवात करते निलेश ते ऐकत असतो व तो शॉक होतो तिचे बोलणे ऐकून. निशाचे बोलणे संपते . व निशा म्हणते की माझे बोलणे ऐकून तू एवढा शॉक का आहे ?
मग निलेश सुरेशची त्याची घटना सांगतो मग निशा ऐकत असते हे ऐकून निशाला शॉक बसतो . त्यांचे बोलणे झाल्यावर दोघेही एकदम शांत बसतात विचारांमध्ये पडल्यासारखी मग ते दोघे ठरवतात की अमावस्येच्या दिवशी आपण दोघे सोबतच जायचे किती वाजता जायचे सर्व काही ठरवून घेतात मग ते एकमेकांचे नंबर घेतात .