Quotes by Rajendra Mahajan in Bitesapp read free

Rajendra Mahajan

Rajendra Mahajan

@rajendramahajan115434

एकादशी किंवा कुठल्याही उपवासाला साबुदाणा खिचडी, बटाट्याचा किस खाल्ला म्हणजे पुण्य मिळते असे समजणे म्हणजे....त्यापेक्षा त्यादिवशी मनावर व इंद्रियांवर संयम विशेषता वाणीवर बाळगणे महत्वाचे आहे. त्याचप्रमाणे स्वपीडन व पर पीडनही टाळले पाहिजे. हे जर झाले तरच खऱ्या अर्थाने उपवास झाला असे समजणे ह्यात जास्त ईश्वर प्रति समर्पित भाव नाही का?

Read More

प्रेम आणि मृत्यु हे असे पाहुणे आहेत. की जे कधी येतील हे सांगता येतं नाही.
पण दोघांचे काम मात्र सारखेच आहे.‌ एक हृदय चोरतो आणि दुसरा त्या हृदयाचे ठोके.

Read More

गम्मत सुख दुःखाची

माणसाच मन खुप चंचल असत, दुःखात सुख, सुखात दुःख शोधण्याची त्याची क्षमता प्रचंड असते, दुःखात पण तो भेदभाव स्वार्थ राजकारण करतो, सम दुखी लोकांचाच स्नेह होतो, सम सुखी ( राजकारणी, श्रीमंत, प्रसिद्ध ) अशांचा स्नेह होतो. यात गम्मत अशी की हे त्यांच सम दुःख, सम सुख कमी झाल, नाहीस झाल की त्यांचा स्नेह कमी होतो, किंवा त्यांच सुख वाढल किंवा दुसर्‍याच सुख वाढल तरी ते त्यांच्या सम दुखी किंवा सम सुखी लोकापासून दूर जातात. आणि कधी कधी हा सम दुखी सम, सम सुख प्रकार एवढा वाढतो की ते आधीचा आपल्या भूतकाळात कोण आपल्या सुख दुःखात बरोबर होत, हेही विसरतात आणि त्या लोकां पासून दूर जाऊ लागतात. माणसाने वर्तमान काळात वास्तवात जगावे अस नेहमी म्हटल जात त्याला हे धरूनच आहे पण, जस माणसाच मन स्थिर राहू शकत नाही ,तसच सुख दुःख हे पण स्थिर नसत ते सतत बदलत असत हे माणसाच्या लक्षात आल तर किती बर होईल. सर्वसाधारणपणे सर्वच सामान्य संसारी माणसे कमी अधिक प्रमाणात सम दुखी, सम सुखी असतातच. माणसाच्या ह्या स्वभाव वैशिष्ट्यचि गम्मत वाटली म्हणून लिहून टाकल.

Read More

काही नाती ही कारल्या प्रमाणे असतात, तुम्ही कितीही तुमच्याकडून सुधारण्याचा प्रयत्न करा, कडू कार्ल कितीही तुपात तळल , पाकात घोळल तरी कडू ते कडूच राहत, तसे.

Read More

द्वेष आणि ईर्षा ही अशी गोष्ट आहे,जी एखाद्याच्या मनात तुमच्या विषयी निर्माण झाली तर जेवढे तुम्ही त्यांच्याशी चांगले वागाल तेवढी ती त्यांच्या मनात वाढत जाईल, कालौघात जेव्हा कधी सद्बुद्धी व विवेकाच प्राबल्य त्यांच्यात वाढेल तेव्हाच ह्या गोष्टी त्यांच्या मनातून जातील.

Read More

तुम्ही कुणाची स्तुती कितीही करा पण अपमान मात्र विचारपूर्वक जपून करा कारण अपमान हे असे कर्ज आहे, जे प्रत्येक जण व्याजासह परत करण्याची संधी शोधत असतो.

Read More

जो जे वांछील ते तो लाहो , प्राणी जात हो
हीच या दिवाळीस इच्छा फक्त ( राग, लोभ, द्वेष, ईर्षा सोडून)

वो ईन्सान आपका मोल कभी नहीं
समझ पायेगा जिसके लिये
आप हमेशा हाजीर रहते हो

जीवन सहज आणि सुखाने जगण्याच्या
दोन पद्धती आहेत.
जे आवडते
ते मिळवायचा प्रयत्न करा.
आणि जे मिळाले आहे
त्याचा आनंदाने स्वीकार करा.

Read More