एकादशी किंवा कुठल्याही उपवासाला साबुदाणा खिचडी, बटाट्याचा किस खाल्ला म्हणजे पुण्य मिळते असे समजणे म्हणजे....त्यापेक्षा त्यादिवशी मनावर व इंद्रियांवर संयम विशेषता वाणीवर बाळगणे महत्वाचे आहे. त्याचप्रमाणे स्वपीडन व पर पीडनही टाळले पाहिजे. हे जर झाले तरच खऱ्या अर्थाने उपवास झाला असे समजणे ह्यात जास्त ईश्वर प्रति समर्पित भाव नाही का?