गम्मत सुख दुःखाची
माणसाच मन खुप चंचल असत, दुःखात सुख, सुखात दुःख शोधण्याची त्याची क्षमता प्रचंड असते, दुःखात पण तो भेदभाव स्वार्थ राजकारण करतो, सम दुखी लोकांचाच स्नेह होतो, सम सुखी ( राजकारणी, श्रीमंत, प्रसिद्ध ) अशांचा स्नेह होतो. यात गम्मत अशी की हे त्यांच सम दुःख, सम सुख कमी झाल, नाहीस झाल की त्यांचा स्नेह कमी होतो, किंवा त्यांच सुख वाढल किंवा दुसर्याच सुख वाढल तरी ते त्यांच्या सम दुखी किंवा सम सुखी लोकापासून दूर जातात. आणि कधी कधी हा सम दुखी सम, सम सुख प्रकार एवढा वाढतो की ते आधीचा आपल्या भूतकाळात कोण आपल्या सुख दुःखात बरोबर होत, हेही विसरतात आणि त्या लोकां पासून दूर जाऊ लागतात. माणसाने वर्तमान काळात वास्तवात जगावे अस नेहमी म्हटल जात त्याला हे धरूनच आहे पण, जस माणसाच मन स्थिर राहू शकत नाही ,तसच सुख दुःख हे पण स्थिर नसत ते सतत बदलत असत हे माणसाच्या लक्षात आल तर किती बर होईल. सर्वसाधारणपणे सर्वच सामान्य संसारी माणसे कमी अधिक प्रमाणात सम दुखी, सम सुखी असतातच. माणसाच्या ह्या स्वभाव वैशिष्ट्यचि गम्मत वाटली म्हणून लिहून टाकल.