#KAVYOTSAV -2#

=====सांग बा डाक्टरा =====

झाली किती तरी वर्षे 
येतो डाक्टरा तुझ्या दारी 
ऊन असो थंडी असो वा पाऊस
चुकवत नाही कधी तुझी वारी |
येई ज्या ज्या दिवशी 
नित्य नवा आजार सांगशी 
आणि सांगशी पथ्यापथ्य भारी
भराभरा औषधी लिहून देशी |
सर्दी डोकेदुखी नि अंगदुखी
ही तर नित्याचीच दुखणी
कधी देशी आयुर्वेद औषधी
तर कधी आलोपॅथी महागडी 
करीत गेलो तू सांगशील ते
तेल ही सोडले तूप ही सोडले 
तिखट आंबट हद्दपार केले 
जेवणात मग तथ्य काय उरले 
रक्तदाब आला वस्तीला 
घेऊन मिञ रोग सोबतीला 
नयनी म्हणे मोत्यागत बिंदू आला
दोन्ही नयना कृत्रिमतेचा उजाळा 
चाळिशी गाठता गाठता बघा 
कशी साथ दाढांनी सोडली
साखर नाही खायची 
डाळ ही वर्ज्य झाली 
पित्त कसे नेहमी खवळलेले
चहा सुटला सोडली कॉफी 
आवडे जे जे ते सारे सोडले 
फ्रिजचे पाणी केंव्हाच पळवले
केली तारुण्यात खावखाव
कामासाठी नित्याचीच धावाधाव 
साथीला आली जीवघेणी आव
उगवले आपोआप कोलेस्ट्रॉल 
हंगामी फळांची आवड भारी मज
सांगितले बघ तू कसे 
पेरू नाही खायचा, खाऊ नको बोर
आवडती फळे बघ गेली दूर 
केळीकडे पाहू नका ढुंकून
कालच आला एक नवा पाहुणा
नाव त्याचे गोंडस म्हणे मुतखडा
पालक टमाटे जाऊन ताटी कडू कारली 
रोग औषधे पथ्य यांची 
झाली यादी हातभर लांब 
औषधी डब्बे गोळ्यांची पाकिटं
यांनी भरली माझी कपाटं
पथ्यापथ्याने जीवन झाले बकाल 
प्रकटले डोकी अकाली  टक्कल
लढवू कोणती सांग आता शक्कल 
जीवनी येण्या समाधान 
रोग औषधे पथ्य यासवे 
घेरले विविध डॉक्टरांनी 
प्रत्येक वेळी धाडी बा तज्ज्ञांकडे
तुझ्यासंगे भरले खिसे अनेकांचे 
बा डाक्टरा विनवणी तुज एक 
सांग आता निर्वाणीचं एक 
खाऊ तरी काय रोज रोज 
अपथ्याची यादी दे एकच एक
आता थकलो पुरता नागवलो
अशा कशा चक्रव्यूहात अडकलो
करू नकोस माझा अभिमन्यू 
बा डाक्टरा हीच विनवणी तुजशी ||


******* *********************

 (नागेश सू शेवाळकर) 
फ्लॅट क्रमांक ११०, 
वर्धमान वाटिका फेज ०१ 
क्रांतिवीर नगर लेन ०२,  संचेती शाळेजवळ थेरगाव, पुणे ४११०३३ 
9423139071. 

Marathi Poem by Nagesh S Shewalkar : 111156648
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now