तुझ्या नजरेपासून कधी दूर नको करूस मला
डोळ्यांतील नितळ ओलाव्यात सामावून घे मला,
जरी कधी ओघळले अश्रू डोळ्यांतून तुझ्या
तरी डोळ्यांत तुझ्या माझे अस्तित्व गवसेल तूला...
तुझ्या प्रत्येक हास्यांत सामावून घे मला,
जेव्हा जेव्हा आठवण येईल माझी तूला
तेव्हा तेव्हा तुझ्या गालावरच्या गोड खळीत
माझ्या हास्याचे प्रतिबिंब गवसेल तूला....
तुझ्या गोड आवाजात सामावून घे मला,
मी जरी अंतराने दूर असेन तुझ्यापासून
तरी रितू असा एक आवाज दे मला
तूझ्या आवाजाच्या दिशेने साद ऐकू येईल माझी तूला....

-Ritu Patil

Marathi Romance by Ritu Patil : 111769449
Ritu Patil 2 years ago

Thank you 💞💞🍫💐

शब्द बिंधास्त..Mk 2 years ago

किती ते शब्द मनाला स्पर्श करून जातात न तुझे... खरंच खूप खूप छान लिहिलंय तू...🙈🙈 आवडलं...👍🏼👍🏼🤟

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now