आजच ती तिच्या गावावरून परत हॉस्टेल ला आली. चोवीस दिवसाच्या सुट्टीनेही तिच मन भरलेलं नव्हत.पण स्वतःच्या स्वप्नांसाठी डोळ्यातील अश्रू घरच्यांपासून लपून हसतमुखाने ती परतीच्या वाटेला निघाली. परत आली खरी पण तिची गाडी मात्र घरीच अडकलेली आल्यावर थोड फ्रेश होऊन कॉलेजला गेली.आज तिला इंजिनीअरिंग च्या तिसऱ्या वर्षाच ॲडमिशन घ्यायचं होत.
सर्व कागदपत्र एकत्र करून, चार वेळेस येरझारा घालून तीन दिवसभर सर्व प्रोसेस केली. फक्त फी भरायच राहिल होत कारण उद्या बाबा पैसे घेऊन येणार होते. थकून रूमवर आली, आईने दिलेला डबा खाल्ला. आणि थोडा वेळ बेड वर पडली. विचार करत होती.... उद्या बाबा पैसे कशे आणणार? कोण देईल? चाळीमध्ये हक्काचा घाम गाळून पिकवलेला मालही असल्या स्वस्त भावात विकन शक्य नाही.
बाबाही काय करणार जमीनही थोडी त्यात मालाला पण भाव नाही. असल्या परिस्थितीत तिला आणि तिच्या भावाला दोघांना ही उच्च शिक्षण देणं शक्य नव्हते,तरी वाटेल ते करून ते दोघांनाही कसली कमी पडू देत नव्हते. एका आशेवर की हे दोघे शिकून काहीतरी परिस्थितीत बदल करतील. सर्वांनी सांगूनही की "मुलगी कुठं तुला पैसे देणार ये? त्यापेक्षा मुलालाच काय ते शिकव."त्यांनी दोघांनाही शिकवण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यासाठी ते दोघेही समान होते.
विचार करता करता तिचा डोळा लागला. आणि सुरू झाला तिच्या स्वप्नांचा प्रवास.... बाबांना मस्त एक गाडी घेऊन दिलेली,जेवढे दागिने आईने कुटुंबासाठी मोडले होते ते सर्व परत बनवलेले , लहान भावाच ही मस्त शिक्षण चालू. आणि तीन तिच्या आई वडिलांच्या सर्व इच्छा पूर्ण केलेल्या.... अचानक खिडकीचा आवाज झाला,आणि तिच्या स्वप्नांच्या दुनियेततून ती बाहेर आली. गोड हसली... आणि परत आईबाबांच्याइच्छा पूर्ण करण्यासाठी इच्छाने आपल्या अभ्यासाला सुरूवात केली.....