Marathi Quote in Poem by satish vishe

Poem quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

वाढदिवस कविता 🎂

काळाच्या पानावर उमटलेल्या आठवणी,
कधी बालपणाची गोड निरागस खुणा,
कधी तारुण्याची स्वप्नांनी भरलेली वाट,
नवीन वर्ष नवी येणारी सुंदर पहाट,

जुन्या आठवणींच्या पाऊलखुणा अजून जपलेल्या,
हसरे क्षण, खेळते दिवस मनात जिवंत ठेवलेले,
प्रत्येक अश्रूने शिकवलेला नवा स्वाध्याय,
प्रत्येक क्षणांचा नवा अध्याय.

जीवन हा प्रवास नेहमीच नवा असतो,
कालच्या कथा आजच्या धड्यांना घडवतो,
आजचा अनुभव उद्याची शिदोरी ठरतो,
आणि मनाच्या आकाशात नवे तारे उजळतो.

वाढदिवस म्हणजे थांबून बघण्याची वेळ,
जुन्या आठवणींना हृदयाशी गुंफलेली नवी माळ,
नव्या स्वप्नांना गवसणी संधी घालण्याची ,
जीवनाला नवा अर्थ देण्याची,

नवीन दिवशीचा नवा संकल्प,
हास्य, प्रेम, उमेद यांचा सोबत प्रवास,
आठवणींची शिदोरी, अनुभवांची ताकद,
आणि उज्ज्वल भविष्याकडे नेणारा विश्वास.

Marathi Poem by satish vishe : 111997615
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now