🍁 रंगीबेरंगी हलवा
🍁कोहळा आणि लाल भोपळा यांचं हलवा..
ऐन नवरात्रात एक मोठा भोपळा आणि मोठा कोहळा मित्राच्या शेतातून
एकदम घरी आले😊😊
❤️प्रेमाने पाठवलेला हा वानवळा वापरून बरेच पदार्थ करून झाले
भाजी
सांबार
थालीपीठ
वडे अशा
अनेक पदार्थात त्या दोघांनी गोडीने एकत्र भाग घेतला
आणि हा दोघांचा एकत्र शेवट गोड झाला
🍁साधारण दोन वाटया कोहळा कीस
दोन वाटया भोपळा कीस
प्रथम पाच दहा मिनिटे परतून त्यातला पाण्याचा अंश कमी करून घेतला
🍁त्यात दोन वाटया साईसकट दुध घालून आटवत ठेवला
मिश्रण आळत आल्यावर त्यात पाऊण वाटी साखर घातली
🍁आता पातळ झालेले मिश्रण परत थोडे घट्ट होताच एक वाटी मिल्क पावडर पाणी मिसळून सरबरीत केली व त्यात मिसळली
हलवा तयार आहे
🍁शेवटी तूप गरम करुन त्यात
काजु काप
बदाम काप
बेदाणे
मनुके
तळुन घेतले व ते तूप या तयार होणाऱ्या हलव्यात चांगले मिसळून घेतले
(अशी ड्राय फ्रूट तळलेली तुपाची फोडणी घालून हलवा अतीशय चविष्ट होतो😋)
🍁वाढताना त्यावर चेरी ऑन द टॉप 🙂