🩸नाचणी पुडींग
🩸एक वाटी नाचणी पीठ
एक वाटी साईसकट दुध
एक वाटी मिल्क पावडर
वेलदोडे पूड
एक वाटी गुळ
🩸प्रथम एक वाटी दुध पावडर एक वाटी पाण्यात चांगली मिसळून घ्यावी
गाठी असतील तर फोडून घ्याव्यान नाचणी पीठ, ,दुध, मिल्क पावडर चे मिश्रण आणि गुळ सर्व एकत्र करून
(साखर आवडत असेल तर साखर घ्यावी)
चांगले मिसळून घ्यावे
वेलदोडे पावडर काजु काप घालावे
🩸एका पॅन मध्ये शिजत ठेवावे
पळीने सतत घोटत रहावे
गुठळी होउ देऊ नये
हळूहळू मिश्रण घट्ट होत पॅन पासुन अलग होऊ लागते व रंग बदलू लागते
🩸गोळा तयार झाला की
एका थाळीला तूप लावून
हे मिश्रण त्यात ओतावे
थाळी चारी बाजूने हलवुन ठोकून मिश्रण एकसारखे पसरेल असे बघावे
थोडे गार झाले की
फ्रिज ला सेट करावे
तासाभराने बाहेर काढून वड्या कापाव्या
🩸सजावट अख्खे बदाम ..
🩸हे पुडिंग थंडगार छान लागते