ती हवी…
आयुष्याच्या वळणावर
साखरेच्या गोडव्यासारखी ती हवी.
थरथरता पाय माझे
सहाऱ्यासाठी ती हवी
आकाशात उडताना
झेप माझी ती हवी
उडता उडता माझ्यासंगे
माझे पंख ही ती हवी
दुष्ट लागू नये कुणाची
डोळ्यात काजळासारखी ती हवी
आयुष्यात मावळताना
रात माझी ती हवी
मरणाच्या वाटेवरती
पाणीही ती हवी
शेवटचा घोट तो
तो घोट ही ती हवी
लेखक :- ढोले आदित्य.