🍭 शेवयांची खीर आमरस
🍭हे पण एक चविष्ट कॉम्बो 😋😋
शेवया तुपावर भाजून नेहमीसारख्या दूधात शिजवून.. खीर केली
खिरीत चारोळ्या मुक्त हस्ते वापरल्या
वेलदोडे पावडर घातली
(सोबत आमरस असल्याने केशराला फाटा दिला)
🍭बस.. खीर आणि सोबत आमरस
एक चमचा खीर....
एक चमचा आमरस.. असे खा
किंवा संपुर्ण खीरीत आमरस एकत्र मिसळून खा..
🍭परत याची शान वाढवायला सोबत आंब्याच्या फोडी आहेतच..😋