जागतिक पोहे दिना निमित्त...
🌿 दडपे पोहे...
🌿 सकाळच्या नाश्त्यासाठी सर्वाधिक आवडीचा खाद्यपदार्थ म्हणजे पोहे.
पोहे आवडत नाही अशी व्यक्ती सापडणे फार कठीण आहे. प्रत्येक खाद्यसंस्कृतीनुसार, पोहे बनवण्याची पद्धत बदलते.
🌿 काही ठिकाणी पोह्यावर ओलं खोबरं टाकून दिले जाते तर कुठे तेलाची तिखट तर्री, शेव टाकून पोहे
खाल्ले जातात
🌿 सगळ्यांच्या अगदी दिल के पास असलेला पदार्थ..😋
दडपे पोहे अनेक प्रकारे करता येतात.
काहीजण पोह्यात कच्चे तेल वापरतात, काहीजण लिंबाऐवजी ताक वापरतात. आपल्या आवडीनुसार बदल करता येतात.
🌿 मी आज पातळ पोह्यात कोथिंबीर, ओले खोबरे, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो फोडी घालून
मोहरी हिंग कढीलिंब थोडी हळद घालून फोडणी केली
🌿 ती फोडणी गार झाल्यावर पोह्यांवर ओतली
थोडा लिंबू रस, साखर, चवीपुरते मीठ व माझ्याकडे असलेले मिरचीचे लोणचे घालून हलक्या हाताने पोहे कालवून
थोडेसे हाताने दडपून ठेवले
(म्हणूनच दडपे पोहे म्हणतात 🙂🙂)
कोरडे वाटल्यास थोडा पाण्याचा हबका मारणे
बहुधा लागत नाही..
🌿 पाच दहा मिनिटात खायला घेतले
याचा गट्टीतला साथीदार म्हणजे दही 😀
बस माहोल जुळून येतो ❤️
🌿 असंख्य प्रकारे हे पोहे करतात
प्रत्येकाच्या कलात्मकते नुसार हे तयार होतात
काहींना या पोह्यांवर परत भरपुर ओले खोबरे आवडते
काहींना त्यावर रस्सा अथवा कट आवडतो
🌿 याची एक आठवण आहे...
आमचे एक साहेब जे पुण्याचे होते आणि कोल्हापूरला एकटेच रहात होते
ते एकदा रविवारी माझ्या घरी आले असता
मी दडपे पोहे केले होते
त्यांना एवढे आवडले की ते दर पंधरा दिवसाला येणाऱ्या हाफ डे शनिवारी त्याची फर्माईश करीत
मग बँकेच्या आठ दहा स्टाफ साठी मी भल्या मोठ्या पातेल्यात पोहे घेउन जात असे
या साठी मला एक तास उशिरा यायची मुभा होती 😀
हे पोहे असलेले पातेले , खायला डिश हे साहित्य घेउन जायला दोन शिपाई मोटर सायकल घेउन येत असत 😀
मी पोह्यांवर फोडणी घालुन साखर मीठ घालून आणायचे
बँकेतील कोणी एक स्टाफ खोबरे आणायचा
कोणी चिरलेला कांदा
कोणी कोथिंबीर
कोणी लिंबू
कोणी त्यावर घालायला शेव...
अशी कामे इतर स्टाफ वाटून घेत असे
त्यामुळें हे काम सोप होत असे
मग जेवणाच्या सुट्टीत मी ते सर्व साहित्य एकत्र करून पोहे कालवत असे
दुपारी सर्वजण त्या पोह्याचा आस्वाद घेत असू
मोठे पातेले भर पोह्यांचा दहा मिनिटात फडशा पडत असे..
हा कार्यक्रम दोन वर्षात पाच सहा वेळ तरी झाला🙂🙂
या पोह्याचे अनेक प्रकार...
🌿 कधी फक्त बारीक मिरची कोथिंबीर साखर लिंबू ओले खोबरे..कांदा नाही बस... फोडणीत हळद पण नाही
🌿 कधी थोडे तिखट टोमॅटो हळद.. मिरची नाही
,🌿 कधी नारळ पाण्याचा हबका मारून
तर कधी पातळ ताक हबका मारून
🌿 कधी साध्या मिरची ऐवजी खारातली मिरची घालून
तर कधी भरून वाळवलेली मिरची तळुन घालून
🌿 कधी काकडी कोचून
तर कधी फळांच्या बारीक फोडी घालून ..
🌿 हे पोहे दडपून ठेवल्यावर मात्र अर्ध्या तासाच्या आत खाऊन घ्यायचे नाहीतर त्याची खुसखुशीत चव लागणार नाही
आणि ते कोरडे होतील
🌿 असे हे दडपे पोहे...🙂