Marathi Quote in Blog by Vrishali Gotkhindikar

Blog quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

🍃रव्याचे मेदू वडे

🍃साहित्य
एक वाटी जाड रवा
(इडली रवा सुध्दा वापरू शकता)

मीठ जिरे
मिरचीचे बारीक तुकडे

🍃कृती
प्रथम रवा भाजून घ्यावा
तीन वाट्या पाणी उकळत ठेवावे
पाण्यात चवीप्रमाणे मीठ
जीरे व बारीक मिरच्यांचे तुकडे घालावे
पाणी उकळताच त्यात रवा घालावा
व चांगला हलवुन घ्यावा
गुठळी होऊ देऊ नये

🍃नंतर त्यावर झाकण ठेवावे
पाच मिनिटे शिजून झाल्यावर
त्यातली वाफ मुरू द्यावी.

🍃पाच मिनिटानंतर झाकण काढून
गरम असतानाच हे मिश्रण चांगले मळून घ्यावे
व हातावर थापून त्याला मेदु वड्याचा आकार द्यावा

🍃कढईत तेल घालून
कडकडीत तापल्यावर गॅस मध्यम करावा
हे वडे दोन्हीं बाजूने कुरकुरीत तळुन घ्यावे
🍃
सोबत हिरवी चटणी

ओला नारळ ,हिरवी मिरची, कोथिंबीर, साखर जीरे ,मीठ घालून सरसरीत चटणी वाटावी

हे वडे छान कुरकुरीत होतात
आतून चांगले पदर सुटतात
अगदी चवीला उडीद वड्या प्रमाणे लागत नसले तरी एक वेगळा प्रकार म्हणून
कधीतरी करून पाहायला हरकत नाहीं 🍃

Marathi Blog by Vrishali Gotkhindikar : 112028282
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now