Marathi Quote in Blog by Vrishali Gotkhindikar

Blog quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

काकडी ची तंबळी

🥬काकडीची तंबळी आणि भात

🥬तंबळी" हा एक पारंपरिक मराठी खाद्यपदार्थ आहे. विशेषतः, ती एक प्रकारची चटणी किंवा रस्सा आहे, जी नारळ, दही किंवा ताक आणि मसाल्यांपासून बनवतात. ती भातासोबत खाल्ली जाते. असे गुगल सांगते
कांदा, ओव्याची पाने, टोमॅटो असे अनेक पदार्थ वापरून करता येते
उन्हाळ्यात थंड आणि पचनास हलके असल्यामुळे तंबळी खूप खाल्ली जाते.
कर्नाटक आणि महाराष्ट्रात ती खूप लोकप्रिय आहे.
'तंबळी' भातासोबत एक उत्कृष्ट साइड डिश आहे.

🥬साहित्य
एक काकडी साले काढून फोडी करून
अर्धी वाटी ओले खोबरे
कोथिंबीर
एक मिरची
अर्धा इंच आले
मीठ चवीनुसार
लाल सुकी मिरची
कढीलिंब
जिरे हिंग
वाटीभर ताक
फोडणी साठी दोन मोठे चमचे तूप

🥬कृती
प्रथम काकडीच्या फोडी, खोवलेले खोबरे, आले, मिरची, मीठ व भरपूर कोथिंबीर घालून सरसरीत वाटण करून घेणे
वाटण एका भांड्यात काढून घेऊन
जेवढी घट्टसर तंबळी हवी असेल तितके ताक घालून मिसळून घेणे
एका कढल्यात तूप घालून
जिरे हिंग व कढीलिंब आणि लाल सुकी मिरची घालून फोडणी करून घेणे
ही फोडणी तंबळी वर ओतून परत एकदा तंबळी हलवून घेणे

🥬ही तंबळी भाता सोबत चांगली लागते
उन्हाळ्याच्या दिवसात फ्रीज मध्ये थंडगार करून खायला घेतल्यास आणखीन चविष्ट लागते😋

Marathi Blog by Vrishali Gotkhindikar : 112028374
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now