बागो में बहार है..
अळू ची भजी
अळू च्या वड्या आपण नेहेमीच करतोय
पण परवा अळू ची भजी ट्राय केली
आधी पाहुण्यांना ओळखले नाही कसली भजी आहेत ते ..
नंतर त्यानी खुप तारीफ केली ..
त्यांना इतकी आवडली की भजी नंतर आम्हाला खायला नाही शिल्लक राहीली 😜
कृती
प्रथम अळू च्या पानांचे बारीक तुकडे करून घेतले
आधीच करून ठेवलेल्या चिंचेच्या कोळ मध्ये ही पाने तास भर भिजत ठेवली
म्हणजे पानांची खाज कमी होते
नंतर त्यात जसे आपण अळू वडीला
साहित्य घालतो तसे घालून पीठ भिजवले
डाळीचे पीठ ,थोडी तांदूळ पिठी , गूळ , मीठ , हळद , तिखट , काळा मसाला , थोडी बडीशेप (चविष्ट लागते )कोथिंबीर , थोड खोबरे , इत्यादी सर्वच अंदाजे
नंतर यात कडक तेलाचे मोहन घातले
व छोटया आकारात खरपूस मंद आचेवर तळली
😊