Good Quotes in Hindi, Gujarati, Marathi and English | Matrubharti

Good Quotes, often spoken by influential individuals or derived from literature, can spark motivation and encourage people to take action. Whether it's facing challenges or overcoming obstacles, reading or hearing a powerful Good quote can lift spirits and rekindle determination. Good Quotes distill complex ideas or experiences into short, memorable phrases. They carry timeless wisdom that often helps people navigate life situations, offering clarity and insight in just a few words.

Good bites

###Good morning !
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .
ॐॐॐ संत सावता दर्शन
संत सावता माळी महाराज

सावता माळी ((जन्म:इ.स. १२५०; समाधी इ.स.१२९५) हे एक मराठी संतकवी होते. अरण-भेंड हे सावतोबांचे गाव होय. दैवू माळी हे सावता महाराजांचे आजोबा म्हणजे वडिलांचे वडील होत. ते पंढरीचे वारकरी होते. त्यांना दोन मुले होती. पुरसोबा आणि डोंगरोबा. पुरसोबा हे धार्मिक वळणाचे होते. शेतीचा व्यवसाय सांभाळून ते भजन-पूजन करीत असत. पंढरीची वारी करीत असत. त्यांचा विवाहही त्याच पंचक्रोशीतील सदू माळी यांच्या मुलीशी झाला. या दांपत्याच्या पोटी सावतोबांचा जन्म झाला. या घराण्याचे मूळ गाव मिरज संस्थानातले औसे होय. दैवू माळी (आजोबा) अरण या गावी स्थायिक झाले. भेंड हे गाव जवळच दोन मैलांवर आहे.

आपल्या जन्मस्थळाबद्दल सावता माळी म्हणतात:-
धन्य ते अरण, रत्नांचीच खाण। जन्मला निधान सावता तो।।
सावता सागर, प्रेमाचा आगर। घेतला अवतार माळ्या घरी।।

सावता माळी यांनी भेंड गावचे ‘भानवसे रूपमाळी’ हे घराणे असलेल्या जनाई नावाच्या मुलीशी लग्न केले. तिने उत्तम संसार केला. त्यांना विठ्ठल व नागाताई अशी दोन अपत्ये झाली. सावता माळी यांनी सेना न्हावी नरहरी सोनार यांच्याप्रमाणेच त्यांनीही आपल्या व्यवसायातील वाक्प्रचार, शब्द अभंगात वापरले आहेत. तत्कालीन मराठी अभंगाच्या भाषेत नव्या शब्दांची, नव्या उपमानांची त्यामुळे भर पडली. सावता माळ्याचे अभंग काशीबा गुरव हा लिहून ठेवत असे.

संत सावता महाराज हे संत ज्ञानेश्वरांच्या प्रभावळीतले ज्येष्ठ संत होते. यांचा काळ इ.स. १२५० ते १२९५ चा आहे. (संत ज्ञानेश्वरांचा काळ इ.स. १२७५ ते १२९६ आहे.) ‘साव’ म्हणजे खरे तर शुद्ध चारित्र्य, सज्जनपणा. सावता हा भाववाचक शब्द होय.सभ्यता, सावपणा असा याचा अर्थ होतो.सावता महाराज लहानपणापासून विठ्ठलभक्तीमध्ये रममाण झाले. फुले,फळे, भाज्या आदी पिके काढण्याचा त्यांचा पारंपरिक व्यवसाय होता. ‘आमची माळियाची जात, शेत लावू बागाईत’ असे ते एका अभंगात म्हणतात.

ऐहिक जीवनात कर्तव्यकर्मे करीत असतानाच काया-वाचे-मने ईश्र्वरभक्ती करता येते, हा अधिकार सर्वांना आहे.‘न लगे सायास,न पडे संकट, नामे सोपी वाट वैकुंठाची’असा त्यांचा रोकडा अनुभव होता.त्यांनी जनसामान्यांना आत्मोन्नतीचा मार्ग दाखविला.यांना केवळ ४५ वर्षांचे आयुष्य लाभले.धार्मिक प्रबोधनाचे व भक्तिप्रसाराचे कार्य त्यांनी निष्ठेने व्रत म्हणून आचरिले. समरसता आणि अलिप्तता यातील विलक्षण समतोल त्यांच्या व्यक्तिमत्त्वात प्रकर्षाने जाणवतो. त्यांचे केवळ ३७ अभंग उपलब्ध आहेत.अरण येथे आषाढ वद्य चतुर्दशी, शके १२१७ (दि. १२ जुलै, १२९५) रोजी संत सावता महाराज अनंतात विलीन झाले. आजही पंढरपूरच्या श्री विठ्ठलाची पालखी वर्षातून एकदा खास त्यांना भेटावयास येत असते.

अरण येथे आषाढ वद्य चतुर्दशी, शके १२१७ (दि. १२ जुलै,१२९५) रोजी संत सावता महाराज अनंतात विलीन झाले असे मानले जाते.परंतु या दिनांकाविषयी भेद् आहेत असे कळते. कालनिर्णय दिनदर्शिकेत सावता माळी यांची पुण्यतिथी २५ जुलै अशी दर्शवली आहे.

सावता माळी हे कर्तव्य आणि कर्म करीत राहणे हीच खरी ईश्वारसेवा अशी प्रवृत्तिमार्गी शिकवण देणारे संत आहेत. वारकरी संप्रदायातील एक श्रेष्ठ आणि ज्येष्ठ संत म्हणून त्यांचा लौकिक आहे.श्री विठ्ठल हेच त्यांचे परमदैवत होते. ते कधीही पंढरपूरला गेले नाहीत.प्रत्यक्ष पांडुरंगच त्यांना भेटावयास आले. ते कर्ममार्गी संत होते. ‘कर्मे ईशु भजावा’ हीच त्यांची वृत्ती होती.पंढरपूरच्या विठ्ठलाची पालखी वर्षातून एकदा खास त्यांना भेटावयास येत असते.

अध्यात्म आणि भक्ती,आत्मबोध आणि लोकसंग्रह, कर्तव्य आणि सदाचार याची बेमालूम सांगड त्यांनी घातली.धर्माचरणातील अंध:श्रद्धा,कर्मठपणा,दांभिकता व बाह्य अवडंबर याबाबत त्यांनी कोणाचीच भीडभाड ठेवली नाही.त्यावर सतत कोरडे ओढले.अन्त:शुद्धी, तत्त्वचिंतन, सदाचार, निर्भयता,नीतिमत्ता, सहिष्णुता इत्यादी गुणांची त्यांनी भलावण केली. ईश्र्वराला प्रसन्न करून घ्यावयाचे असेल तर योग-याग-जप-तप,तीर्थव्रत, व्रतवैकल्ये या साधनांची बिलकूल आवश्यकता नाही. केवळ ईश्र्वराचे अंत:करणपूर्वक चिंतन हवे आहे.

###Good night!
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद

###Good night!
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .
$$$ संत नामदेव पुण्यतिथी निमित्ताने $$$
???राम कृष्ण हरी???
अनाथाचा नाथ दीनाचा दयाळ । भक्तांचा कृपाळ पांडुरंग ॥१॥ ये गा तूं विठ्ठला माझिया माहेरा । कृपेच्या सागरा पांडुरंगा ॥२॥ वर्णिती पुराणें न करीं लाजिरवाणें । बोलती वचनें सनकादिक ॥३॥ कृपेचा सागरू कैवल्यउदारू । रखुमाईचा वरू पांडुरंग ॥४॥ पुंडलिकाचे भेटी अससी वाळवंटीं । हात ठेवुनि कटीं विटेवरी ॥५॥ भक्तिलागीम कैसा उभा असे तिष्ठत । असे वाट पहात भीमातीरीं ॥६॥ येऊनी जन्मासी पाहावी पंढरी । तेणें भवसागरीं तरसील ॥७॥ नामा म्हणे मज हरीचा विश्वास । जालों असे दास जन्मोजन्मीं ॥८॥
??????????

###Good afternoon !
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .

###Good afternoon !
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .

###Good morning !
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .
# *!! जय हरी विट्ठल !!*

?

आज कमिका एकादशी निमित्य अभंगचींतन..

? *अभंग गाथा* ?

*भाव धरी तया तारील पाषाण ।*
*दुर्जना सज्जन काय करी ।।१||*
*करिता नव्हे नीट श्वानाचे हे पुंस ।*
*खापरा परीस काय करी ।।२||*
*निंबाचिया झाडा साखरेचे आळे ।*
*बीज तैसी फळे येती तया ।।३||*
*तुका म्हणे वज्र भंगे एक वेळ ।*
*कठीण हा खळ तयाहुनी ।।४||*

? *भाव निरूपण-*

शुध्द भाव ठेवुन जो पूजा करतो त्याला पाषाणातला देव देखील तारून नेतो.
दुर्जन,हट्टी व दुराग्रही माणसाचे मन वळवणे सज्जनाला कदापिही शक्य नसते,असे तुकाराम महाराज म्हणतात व दृष्टांत देतात की 'कुत्र्याचे वाकडे शेपूट कधीही सरळ करता येणार नाही.खापराला परीस लावला तरीही त्याचे सोने होणार नाही.कडुनिंबाच्या झाडाला साखरेचे आळे घालून काय उपयोग ? त्याचा कडूपणा जाणार नाही, कारण जसे बीज तसेच फळ येते.'

एक वेळ कठिण अशा वज्राचेही तुकडे करता येतील,पण दुर्जन,दुराग्रही,हट्टी माणसाचे हृदय त्यापेक्षा जास्त कठीण आहे.त्याचे परिवर्तन करता येणे अवघड आहे.

*।। रामकृष्ण हरी ।।*

?

###Good morning !

@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .

###Good morning !
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .

###Good morning !
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .