बहावा ..
चैत्राची चाहूल लागली की बहावा जागा होतो तरतरून
निष्पर्ण त्याच्या खोडावर पालवी धरू लागते भरभरून
सुंदर ..नाजूक आणी पिवळेधम्मक घोस
बहावा वागऊ लागतो अंगा खांद्यावर
निसर्गानेच केली असते जणू मुक्तहस्ते
दागिन्यांची बरसात त्याच्या अंगावर ..
दागिन्यांची फार आवड त्याला ..रोज नवे नवे घालत असतो
जुन्या दागिन्यांना हलकेच ..
मग तो पायाशी आपल्या टाकत असतो
ऐन ग्रीष्माच्या तडाख्यात बहाव्याचे हे फुलणे..
जणू माणसाच्या मनाला रीझवण्या चे च असतात हे बहाणे
निसर्गाचे हे उपकार माणसाला फिटता फिटत नाही
त्याचे ऋण..त्याचे देणे कोणीच फेडू शकत नाही
बहावा असाच नियमित पणे दर वर्षी फुलत रहातो
माणसाच्या आनंदाने जगण्याचा तो एक भाग बनून राहतो ..
वृषाली ..