Marathi Quote in Blog by Vrishali Gotkhindikar

Blog quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

🏵️चटपटित मखाणे.. आणि
🏵️मसाला सोया चंक्स

🏵️मखाणे योग्य प्रकारे आणि योग्य वेळी खाल्ले तर वजन कमी करण्यासाठी त्याचा चांगला फायदा होतो.
मखाण्यामध्ये मॅग्नीशियम असतें
उपयोगी अँटी-ऑक्सिडंट असतात.
हे अँटी-ऑक्सिडंट्स हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्याचे काम करतात.
मखाणे चा ग्लाईसेमिक इंडेक्स कमी असतो

🏵️प्रथम मखाणे कढईत कोरडेच भाजून
कुरकुरीत करून घ्यावे
ते ताटात काढून ठेवावे
आता कढईत एक मोठा चमचा साजुक तूप घालावे
तूप वितळले की त्यात
चवीनुसार फक्त मीठ व काळी मिरी पावडर घालावी
तुमच्या आवडीचा मसाला सुद्धां वापरू शकता 😊
ताबडतोब मखाणे घालून एकसारखे करून घ्यावे
चविष्ट
कुरकुरीत
पौष्टिक मखाणे तयार...

पुस्तक वाचताना
टीव्ही पाहताना
गप्पा मारताना..
कुठंही कधीही आस्वाद घेऊ शकता

घट्ट झाकण असलेल्या कंटेनर मध्ये भरुन ठेवावे म्हणजे मऊ होत नाहित..

🏵️मसाला सोया चंक्स

निसर्गाच्या चांगुलपणाने समृद्ध,
सोयाबीनमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि फायटोन्यूट्रिएंट्स भरपूर प्रमाणात असतात,
जे पुरेसे प्रमाणात सेवन केल्यावर तुमचे आरोग्य सुधारते.
इतकेच नाही तर सोयाबीनमध्ये फायबर, प्रथिने आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स देखील असतात, जे चयापचय वाढवणे, लठ्ठपणाशी लढा देण्यासारखे फायदे देतात.

सोया चे असे चंक तयार मिळतात
तेलात मंद आचेवर ते तळून घेणे
गरम असतानाच त्यावर मीठ मितकुट
अथवा आवडीचा मसाला टाकणे
गार झाल्यावर घट्ट झाकणाच्या डब्यात भरणे..

🏵️फोटोत दाखवले आहेत असे दोन डबे कायम माझ्याकडे डायनिंग टेबल वर ठेवलेले असतात
मनात येइल तेव्हां चटकन तोंडात टाकता येतात
पौष्टिक आणि चवीष्ट

🏵️जेवताना सुद्धां ऐन वेळेस गरम आमटीत टाकून हे खाता येतात
अथवा कुठल्याही भाजीत शिजून झाल्यावर शेवटच्या वाफेला मिसळता येतात

🏵️ज्यांच्या घरी किशोर वयाची मुले मुली आहेत त्यांना तर हे अतिशय उपयोगी आहेत 😊

Marathi Blog by Vrishali Gotkhindikar : 112033856
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now