Fajiti Express - 9 in Marathi Comedy stories by Akshay Varak books and stories PDF | फजिती एक्सप्रेस - भाग 9

Featured Books
Categories
Share

फजिती एक्सप्रेस - भाग 9

कथा क्र.०४: तुझ्यात जीव रंगला-परत दे माझा मला


📌 कॉपीराइट सूचना:

"फजिती एक्सप्रेस"  या विनोदी कथा मालिकेचे सर्व हक्क लेखक अक्षय वरक यांच्याकडे राखीव आहेत.

ही कथामालिका, त्यातील संकल्पना, पात्रं, प्रसंग किंवा कोणताही भाग लेखकाच्या स्पष्ट परवानगीशिवाय प्रत, रूपांतरण, अनुवाद किंवा इतर कोणत्याही स्वरूपात वापरणे, प्रकाशित करणे, किंवा कुठेही शेअर करणे कायदेशीर गुन्हा ठरेल.

कृपया लेखकाचा सन्मान करा.

______________________________

फेसबुक रिक्वेस्टपासून सुरू झालेलं प्रेम, कविता साळुंखेंच्या साखरपुड्यावर येऊन संपतं – आणि मग उरतो फक्त कटिंग चहा आणि प्रेमाचे शिकलेले धडे!

___________________________________

माझं नाव प्रणव. माझ्याच प्रेमाचा खराटलेला अनुभव.

मी साधासुधा पुणेकर – एकदम बेक्कार इमोशनल.

फक्त ‘हाय’ म्हटलं तरी प्रेमात पडतो, आणि ‘बाय’ म्हटलं की डायरेक्ट Sad Songs Playlist ON करतो.

तर झालं असं…

मी M.A. चं शिकतोय (हो, प्रेमात पडायला जरा जास्त वेळ लागतो म्हणूनच!).

सगळं सुरळीत सुरू होतं – कॉलेज, कटिंग चहा, फेसबुक रील्सवर स्वप्नातल्या बायका बघणं...

जोपर्यंत ती आली नाही.

पहिला साक्षात्कार झाला आणि मस्तीत जीव अडकला

ती – कविता साळुंखे.

ती पहिल्यांदा दिसली तेव्हा मी वडापाव खात होतो. आणि योगायोग बघा – तिच्या हातात बटर स्कोच!

तीनी माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाली –

“Excuse me…”

माझ्या हृदयात तुरुतुरु घोडे धावायला लागले.

मी थोडा लाजून म्हणालो – “हो, सांग ना…”

ती – “थोडं सरक, टेबल साफ करायचंय!”

माझं प्रेम त्या रागीट 'साफ' शब्दात झाडून गेलं. पण काय करणार?

आधीच जीव गुंतला होता – आता साफसफाईत तो आणखीनच अडकला.

दुसऱ्या स्टेपचा कट्टा – रिक्वेस्ट सेंट, रिस्पॉन्स झिरो

फेसबुकवर सापडली.

तिच्या सगळ्या फोटोवर ❤️ टाकलं.

Caption वाचून सुद्धा poetry केली –

"तुझ्या हसण्याच्या रेषेत, माझं हृदय गेला हरवून!"

Friend Request पाठवली… आणि वाट बघत राहिलो.

ती 'Seen' पण करत नव्हती.

मनात म्हटलं –

"कदाचित नेटवर्क नाही मिळत असेल, कदाचित मोबाइल हरवला असेल… कदाचित ब्रह्मांडात हरवली असेल…"

पण मग कळालं –

ती Sydney ला गेलेली आहे.

तिच्या Story वर उलटा globe होता – “#wanderlust”!

आणि मी मात्र कटिंगच्या कपावर "Waiting for You" असं बोटानं लिहीत बसलो होतो.

एक दिवस माझ्या मित्राने चहा घेता घेता डोळ्यातलं दूध सांडवलं हो, डोळ्यातलंच – भावनांचं.

म्हणाला, “प्रणव, कविता साळुंखे हिचा साखरपुडा झालाय.”

मी पाण्यात तोंड बुडवत विचारलं – "कोणाशी?"

"तोच रे, इंस्टाचा कवी – ‘काव्यकुमार’.

रोज स्टोरी टाकतो – ‘ती जशी गुलाबाची फुलं, मी तिचा साखरदाणा’!”

त्या दिवशी मी माझ्या डायरीच्या पहिल्या पानावर लिहिलं –

"आता प्रेम नाही, फक्त कर्ज फेडायचंय आणि कविता विसरायचीय!"

पण मग चुकून ‘कविता’ ऐवजी कविता लिहिल्याचं लक्षात आलं –

तेव्हाच ठरवलं, love नाही तर lit-fest ला जाऊन शायरी म्हणणार!

कविता,तू आलीस, हसलीस, आणि निघून गेलीस –

पण तुझ्या बिनसंपर्क प्रेमानं माझा जीव झाकला.

आता तुझं लग्न ठरलं, फोटो Instagram वर १ लाख views –

...आणि माझ्या DP वर अजूनही काळा पट्टा आहे.

म्हणूनच तुला आज इथून साद देतोय –

> "परत दे बाई माझा मला!

तुज्यात जीव गुंतवताना खूप केलं… पण आता Netflix आणि नवा Crush चालू करायचाय!"

प्रेम शिकवलं की हसवून झुरायला लावायचं.

पण मित्रांनो, हे लक्षात ठेवा –

प्रेमात पडणं हे ठीक… पण स्वतःत हरवणं बेक्कार!

आता मी ठरवलंय –

Single आणि Proud राहणार!

आणि हो, कविता…

If you’re still seeing this –

Request तरी Accept कर ना ग!

म्हणजे follow करा @pranav_poet_for_life ही स्टोरी तरी बघशील! 😂📱

प्रणव (एकेकाळचा प्रेमवीर, आताचा चहावीर!)


◆**"फजिती एक्सप्रेस या धमाल कथामालिकेचा आतापर्यंतचा प्रवास आपण नक्कीच एन्जॉय केला असेल अशी मला खात्री आहे! तुमचा प्रतिसाद मला नेहमीच ऊर्जा देतो, म्हणून तुमचे अनुभव मला जरूर कळवा.

पण थांबा… हा प्रवास इथेच संपत नाहीये! लवकरच फजिती एक्सप्रेसमध्ये नवा प्रवासी चढणार आहे. त्याचं व्यक्तिमत्त्व भन्नाट आहे, त्याच्या गमतीजमती अफलातून आहेत आणि त्याची कथा तर तुम्हाला हसवून-हसवून लोटपोट करेल.

तर तयार राहा, कारण फजिती एक्सप्रेसचा पुढचा डबा अजून मजेशीर, अजून झकास आणि अजून खळखळून हसवणारा असणार आहे!"**

-अक्षय वरक

________________समाप्त______________