फजिती एक्सप्रेस - भाग 1 in Marathi Comedy stories by Akshay Varak books and stories PDF | फजिती एक्सप्रेस - भाग 1

Featured Books
Categories
Share

फजिती एक्सप्रेस - भाग 1

मी एक नवीन विनोदी कथा मालिका लिहित आहे ज्यात प्रत्येक भाग पूर्णपणे वेगळा आणि नवीन असेल. फक्त वाचून थांबू नका. तुमच्या प्रतिक्रिया, कमेंटमध्ये कशी वाटली ते नक्की कळवा! तुमच्या मजेशीर आणि मनमोकळ्या प्रतिक्रिया मला अजून धमाल कथा लिहिण्यात मदत करतील. चला, हसण्याची आणि मजा करण्याची तयारी करा!

© 2025 अक्षय वरक. ही कथा मालमत्ता माझी आहे. कोणत्याही प्रकारे पुनर्प्रकाशन किंवा व्यावसायिक वापरासाठी माझी परवानगी आवश्यक आहे.

___________________________________

कथा क्र.०१ 

"भुतांचा Reels आणि नंदूच्या Deals"

ही विनोदी कथा पूर्णतः काल्पनिक आहे. पुण्याचा नंदू सुट्टीला कोकणात जातो आणि तिथे त्याची होते एक भन्नाट भेट – सोशल मीडियावर जीव असलेल्या एका भुताशी!

__________________________________             

   पुण्यातला टेक्नोबाबा म्हणजे मी – नंदू ढमाले. लोक मला म्हणतात "तू हायटेक आहेस", पण खरं सांगू का, मी जरा ढकलतच शिकलेला आहे. एकदा Zoom वर मी माझं फेसफिल्टर लावूनच मीटिंग घेतली होती, तेव्हा बॉस म्हणाला, “नंदू, हॅलोवीन झालंय का रे?”तर अशी माझी स्टोरी, एका ऐतिहासिक शनिवारच्या दिवशी सुरू झाली. वर्क फ्रॉम होमने नाकिनव आल्या होता. म्हणून ठरवलं – चला कोकणात, आजीच्या गावाला, ‘निंबुटवाडी’ला जाऊ या. थोडं मन फ्रेश होईल आणि वायफाय स्लो असेल तरी हरकत नाही, मी बॉसला सांगितलंय "नेटवर्क नथिंग वर्क!"निंबुटवाडी – नाव जरा हास्यास्पद वाटतंय ना? पण तिथेच मला भेटला... तो! नाही नाही, प्रियकर नाही. तो होता... भूत!

मी गावी पोचलो तेव्हा आजीने मला चटणी-भाकरी आणि माठातलं पाणी दिलं. पण ती एकदम गंभीर झाली, "नंदू, रात्री अंगणात जाऊ नकोस हं... ‘तो’ येतो."मी हसत म्हणालो, "आज्जी, मी भूत नाही, बूट घालूनच फिरतो!"ती म्हणाली, "मस्करी नको करू, मागच्या वेळी गोट्याच्या लग्नात DJ वर नाचताना ‘तो’च आला होता!"

ती रात्र. अंधार. आकाशात चंद्र, पण माझ्या हातात मोबाईलचा फ्लॅशलाइट. मी घराच्या मागच्या आंब्याच्या झाडाकडे गेलो... कारण तिथे नेटवर्क चांगलं येतं. आणि मला Reels टाकायच्या होत्या!तेवढ्यात मागून आवाज आला – "अरे भाई! फोन चार्ज आहे का तुझ्याकडे?"मी चमकलो, मागे बघितलं. एक पांढऱ्या फडक्यातला प्राणी. डोळे दिव्यासारखे. केस... सोज्ज्वळ, म्हणजे "अर्धे उडून गेले होते".मी घाबरून विचारलं, "भूत आहेस का?"तो म्हणाला, "अय हां! पण मी फ्रीलान्स भूत आहे. सरकारी कोट्यात नाही पडलो अजून!"

त्या रात्री आम्ही दोघं गावाच्या चुलीवर चहा करणाऱ्या भुताच्या टपरीवर बसलो."तुझं नाव काय?" मी विचारलं."नथू पिशाच्च. पूर्वी पोस्टमन होतो. आता मेसेज देतो... पार्थिवांना!" त्याचं उत्तर."कसली मजा आहे रे तुझी! ना EMI, ना बॉस, ना Zoom मीटिंग!"तो म्हणाला, "मजा वाटतेय तुला, पण आम्हालाही स्ट्रेस आहे – दर अमावस्येला रिव्ह्यू मीटिंग असते. शंभर आत्मा बसून रिपोर्ट देतात – ‘कोण घाबरलं? कोण रडला? कोण Instagram लाईव्ह गेलं?’"

दुसऱ्या दिवशी मी सगळ्यांना सांगितलं की मी रात्री भुताशी गप्पा मारल्या. सगळे गावकरी घाबरले. पण मी म्हणालो, "भूत फार विनोदी आहे रे! त्याला memes आवडतात!"पण मग एक दिवस गडबड झाली. नथूचं नाव गावात पसरलं, आणि कोणी तरी त्याचं WhatsApp ग्रुप वर मेमे बनवून टाकलं. तो चिडला!"आता मी सगळ्यांना घाबरवणार!" तो गरजला.मी लगेच म्हटलं, "थांब! तुला एक Insta page काढून देतो – @Konkan_ghosts_with_jokes – तिथे तू स्वतःचे memes टाक!"

आज त्या पेजवर 50K फॉलोअर्स आहेत. नथू Influencer झालाय. त्याला कोल्हापुरच्या एका नागिन-भुताने collab सुद्धा विचारलंय!मी पुण्यात परत आलोय, पण अधूनमधून नथू मला DM करतो – "भाई, Sponsorship आलीय Zomghost कडून!"मी एकदा म्हणालो, "तू खरंच भूत आहेस का रे?"तो हसून म्हणाला, "सांगू का? खरं सांगितलं तर फॉलोअर्स जातील! भुताची मिस्ट्री असावं बरं वाटतं!"

कोकणात भुते असतात. पण ती डरावणारी नाहीत – ती डायलॉगबाज असतात. आणि जर तुमचं WiFi बंद असेल, तर कधी त्यांच्याशी गप्पा मारून घ्या – कदाचित तुम्हाला पण Influencer बनवतील!

समाप्त

-अक्षय वरक