Free Marathi Quotes Quotes by Hari Alhat | 111798156

! जनहितार्थ जारी !
.......... मुले आणि त्यांचे संगोपन......

( संतती लायक असेल तर कमवून ठेवण्याची काहीच गरज नाही,
कारण ते स्वतः कमविल्या शिवाय रहाणार नाहीत )

( आणि संतती नालायक असेल, तर अजिबात कमवून ठेवण्याची गरज नाही. कारण आपल्या समोरच त्या संपत्तीला काडी लागल्याशिवाय रहाणार नाहीत )

( जबाबदारी जेवढ्या लहान वयात अंगावर पडते, तेवढे कर्तृत्व महान होते. म्हणून आपल्या मुलांना जबाबदारी घ्यायला शिकवा आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभे करा )

आजकालच्या मुलांना झाडावर चढून फळे काढता येत नाहीत, साधे घरातील माळ्यावर ठेवलेली वस्तुसुद्धा काढायला घाबरतात. उंच जागी चढतांना आईच्याकडून धीर मिळत नाही. तर "पडशील", "घसरशील", "तुला जमणार नाही", "उतर, कुणालातरी बोलावून करूया", असे शब्द ऐकायला मिळतात.*
या मुलांच्या आया आणि बाप, मुले मोठी झाली तरी मुलांच्या शाळेची बॅग शाळेला जाणाऱ्या रिक्षा किंवा व्हॅनमध्ये पोहोचवून देतात, हे पाहिल्यावर मुलांची किव येते )

( आज सत्तरी ओलांडलेल्या आई वडिलांनी मुलांना संघर्ष शिकवला, परंतू तीच मुले आपल्या मुलांना तसा संघर्ष का शिकवत नाहीत, याचे नवल वाटते ? )

( पाश्चिमात्य देशात मुले आपली सायकल (पंक्चर इ.) स्वतः दुरूस्त करतात, त्यांच्याकडे त्याचे किट असते. यात सर्व हत्यारे असतात, ज्याचा वापर मुले अगदी सहजतेने करतात )

( नवीन पिढीतील मुलांना स्वावलंबी करणे, हेच खरे पालकत्व आहे. त्यांना शर्टाचे किंवा ड्रेसचे बटन लावणे, इस्त्री करणे, आपापले कपडे धुणे, सकाळी उठल्यावर स्वतःची चादर घडी करून योग्य ठिकाणी ठेवणे, पुस्तकांना कव्हर लावणे, बूट पॉलिश करणे, सर्व चप्पल-बूट जोड नीट एक रेषेत ठेवणे, वेळप्रसंगी भांडी धुणे, कचरा साफ करणे हे आलेच पाहिजे ? )

लाड खाण्यापिण्याचे करा, कामात लाड वर्ज्य आहे.
स्वयंपाक खोलीत त्यांना मदतीला आवर्जून बोलवा, आठवड्यातून एकदा आई वडिलांच्यासाठी चहा बनवायला सांगा. दोन कप चहासाठी किती चहा, साखर व दुध लागते याचा अंदाज स्वतः केल्याशिवाय त्यांना कधीच येणार नाही ? हे करताना बऱ्याच वेळेस चटका ही लागतो, लागू दे! ही जखम दोन दिवसांची असते, पण आयुष्यभराची शिकवण देऊन जाते. या व अश्या कामातून मुलांना जबाबदारी घेण्याची सवय होते, तसेच ही कामे खालच्या दर्जाची नसतात हे ही समजते )

आजकाल एक वाक्य नेहेमी ऐकण्यात येते, "मला जे कष्ट करावे लागले ते माझ्या मुलांना करायला लागू नयेत

( विचार करा आपण कोणत्या मार्गाने जात आहोत ? )

View More   Marathi Quotes | Marathi Stories