होवूर( मालवणी गीत)
पावसा जरा थांब.....
नदीक इलासा होवूर;
मनात उठला काहूर
घोव माझो पल्याडी
येतोलो कसो अल्याडी ....पावसा जरा थांब
उभ्या मीया बांधार
नजर माझी तीरार
मेल्या आता तरी थांब
त्वांड, घेवन घाटार जा लांब ...पावसा जरा थांब
होयत बघ आता सांज
वार्यानव मांडला तूफान
झोपडीत कुडकुडतहत
पोरा आमची न्हान ....पावसा जरा थांब
साया माश्यांची गातन
घेवून येतोलो साजन
ऊन-उनीत घास खाऊन
रातच्याक पडांदे जरा दमान ...पावसा जरा थांब
बाळकृष्ण सखाराम राणे.
(होवूर- पूर. गातन...दोरीत ओवलेले मासे.त्वांड-तोंड)