🍀ग्रीन स्मूदी🍀
🍀ग्रीन स्मूदी प्यायल्याने आरोग्य सुधारते, वजन नियंत्रणात राहते, पचनक्रिया सुधारते, रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि त्वचेची व केसांची चमक सुधारते. ही स्मूदी फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजांनी परिपूर्ण असल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते.
🍀ग्रीन स्मूदीचे प्रमुख फायदे
कमी करण्यास मदत:
ग्रीन स्मूदीमध्ये फायबर असते, ज्यामुळे पोट भरल्यासारखे वाटते आणि जास्त खाण्याची इच्छा कमी होते,
असे निष्णात डॉक्टर सांगतात
🍀साहित्य
सहा सात पाने पालक
एक मूठ कोथिंबीर
एक बचकभर पुदीना
एक कढीलिंब डहाळी (आठ दहा पाने )
खाऊची दोन पाने( विड्याची पाने )
एक बचक शेवगा पाने
दोन तुळस तुरे
एक लिंबाचा रस
एक सफरचंद तुकडे करून
पाव चमचा दालचिनी
पाव चमचा काळी मिरी पावडर
लाल मीठ अर्धा चमचा
एक इंच आल्याचा तुकडा
पाव चमचा हळद
पाव चमचा मेथी पावडर
कृती
एक पेला पाणी घालून प्रथम सर्व जिन्नस मिक्सर वर बारीक करून घेणे
नंतर अर्धा ते पाऊण पेला पाणी घालून परत एकदा एकजीव करणे
याची दोन ग्लास स्मूदी होते