✨ शब्दांपलीकडचं ✨
चांदण्या रात्रीत या 🌙,
आज तु समोर येशील का? 💭
आणि नेमकं काय आहे तुझ्या मनात ❤️,
ते माझ्याशी बोलशील का? 🗣️
नको तो भावनांचा कल्लोळ 🌊,
नको तो विचारांचा गोंधळ 🤯.
रोज वेगळे तर्क लावण्यापेक्षा,
एकदाच स्पष्ट सांगशील का? 🫶
नको तो विचारांचा पडदा 🚫,
आणि नात्यात कोणताही दुरावा ❌.
काय आहे ते कोडं नेमकं 🧩,
तू एकदा सोडवशील का? 🔑
खूप झाल्या शब्दांच्या कोटी ✍️,
आणि खूप झाल्या कविता 📝.
एकदा शब्दांपलीकडचं बोलून,
माझे आणि तुझे प्रेमगीत गाशील का? 💕
तू माझ्याकडे पाहत राहावे 👀,
मी हळूच लाजून हसावे 😊,
आणि या रम्य अंधाऱ्या भेटीत 🌌
नजरेचे बाण हृदयाला भिडतील का? 💘