Marathi Quote in Blog by Vrishali Gotkhindikar

Blog quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

🥭आंब्याचे आप्पे

🟠 शेजीबाईच्या (शेजारीण)नातवाचा वाढदिवस होता
आदल्या दिवशीच आग्रहाचे आमंत्रण आले होते
शिवाय बर्थडे बॉय ने खास गोड आप्पे घेउन ये अशी फर्माईश केली होती
मी बरेच वेळेस गुळ घालुन रव्याचे आप्पे करते ते त्याला खुप आवडतात

🟠 शेजीबाई माझ्या घराच्या अगदीं शेजारी नाही रहात..
पण खुप वर्षापासुन घरोबा आहे
जवळ जवळ तीस वर्षे त्या भागात राहतो
आयुष्यातील अनेक प्रसंगांत एकत्र होतो
एकमेकांची अनेक सुख दुखः वाटून घेतली
तिची मुले..माझा मुलगा एकाच शाळेत..
एकत्र खेळली बागडली
मी नोकरी वाली..
ती होम मेकर
एकमेकांच्या अडचणीत साथ दिली
तिचे अहो वकील आमचे डॉक्टर..
दोघेही पक्के मित्र
आता तिची तीन नातवंडे आणि माझी नात ते पण दोस्त लोक आहेत
अशी ही मैत्री आता तिसऱ्या पिढीत गेलीय❤️

🟠 नंतर तिचा फोन आला दुपारी जेवायला इकडे ये आमच्या घरीच गोड आप्पे करु.
पण माझ्या घरी त्याच दिवशी काही ईतर काम काढले होते
आणि वाढदिवसाच्या गडबडीत आणि पसाऱ्यात आप्पे करायचे काम शांततेने होऊ शकणार नव्हते..
म्हणुन तयार आप्पे घेउन संध्याकाळी येते
हा निरोप तीला देऊन

🟠 मी घरीच आप्पे करायचे ठरवले
दुपारची जेवणानंतरची विश्रांती झाली आणि त्या कामाला लागले

🟠 दोन मोठ्या वाटया रवा
अर्धी वाटी दही
आणि दीड वाटी दुधात भिजत घातला
दोन तासांनी मिश्रण घट्ट झाले
आता त्यात व्हॅनिला इसेन्स घालावे आणि थोडे दूध घालावे असा विचार केला (मी यात नेहेमी व्हॅनिला इसेन्स घालते म्हणजे स्वाद चांगला येतो आणि त्याची चव केक सारखी लागते )
तेवढ्यात लक्षात आले घरी आंब्याचा रस आहेच त्याचा वापर करुन पाहूया

🟠 त्यात एक मोठी वाटीभर आमरस आणि पाव वाटी साखर (आमचा घरचा आंबा गोड असल्यानं साखर जास्त लागत नाहीं) घालून ते सरसरीत करून घेतले
यात थोडे मीठ आणि पाव चमचा सोडा घालून चांगले फेटुन घेतले

🟠 काजु, बदाम बारीक तुकडे करून घेतले
आप्पे पात्रात तूप घालुन याचे या पीठाचे आप्पे घालून वरती हे काजु बदाम लावले व दोन्हीकडून भाजुन घेतले

🟠 मस्त खरपुस वास घरभर सुटला होता😋
तीस पस्तीस आप्पे तयार झाले
त्यांना द्यायचे आप्पे गार झाल्यावर एका डब्यात भरले

🟠 आता चहाची वेळ झाली होती शिवाय खमंग वास सुटल्यामुळे 😋
आम्ही पण चहा सोबत ताजे ताजे आप्पे खाऊन घेतले 😀😀
मस्त फुलले होते आप्पे आणि चविष्ट तर होतेच...

🟠 संध्याकाळी वाढदिवस मस्त पार पडला
शेजीबाई आणि बर्थडे बॉय दोघेही खुश..❤️
तुझे हे मँगो आप्पे चांगलेच हिट झाले बर का..
असा शेरा सुध्दा मिळाला 🙂🙂
ध्यानी मनी नसताना नवीन पाककृती छान जमली होती 🙂🙂
मनात विचार आला हा एक नवा पदार्थ घडला म्हणायचा...😀
आमरस आहे तोपर्यंत आणखी एकदा हे करायला हवेत 😋

🟠 सजावट आंबा फोड आणि आमरस...

Marathi Blog by Vrishali Gotkhindikar : 112026127
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now