Marathi Quote in Blog by Vrishali Gotkhindikar

Blog quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

पोळी पुराण ..

पोळी ....
महाराष्ट्रीयन जीवनाचा महत्वाचा भाग
हीला पोळी /परोठे/फुलके /चपाती अशा अनेक नावाने ओळखले जाते
आम्ही रोजच्या जेवणात घडीची पोळी खातो .

मला पहिल्यापासून पोळी करायला फार आवडत असे .
तसे लग्न होई पर्यंत घरी कधीच कुठले काम मला आईने सांगितले नाही 😀

पण कधीतरी मला लहर आली की सुटीच्या दिवशी मीच आईकडून पोळी करायला दे
अशी भुणभुण लावायची ..
मग आई म्हणायची...
अग कशाला पाहिजे आत्तापासून शिकायला नंतर करायचेच आहे सगळे 😀
पण माझा हेका पाहून ती मला पोळी करायला शिकवायची .
भाकरी सुद्धा मी आईकडून शिकून तेव्हा चांगली करीत असे .

माझी आई शिक्षिका होती
मार्च एप्रिलच्या महिन्यात तिची सकाळची शाळा असे .

मी कॉलेजला गेल्यावर वडीलांची बदली सांगलीला झाली होती
त्याना आठ वाजता रेल्वेने जायचे असे .
डबा घेऊन ते जात असत .

या मार्च_ एप्रिल काळात मात्र वडिलांचा पोळी भाजीचा डबा माझ्याकडे असे .
माझ्या हातची पोळी भाजी खाऊन
त्यावेळेस वडील नेहेमी आईला म्हणत ,
“ताई (मला घरात ताई म्हणत)
सारखी पोळी भाजी तुला जमत नाही ..बर का .🙂
यात कौतुकाचा भाग जास्त होता .❤️

आई अशावेळेस फक्त हसत असे .
माझ्या लग्नानंतर कधी सुट्टी दिवशी आई आम्हा नवरा बायकोला जेवायला बोलवत असे.
तेव्हा वडील म्हणत..
आज माझ्या दोन पोळ्या ताई तु कर बरका ..🙂

आमच्या डॉक्टर अहोंना पोळीची जास्त सवय होती,त्यांना एकवेळ भात नसला तरी चालत असे .
पण पोळी हवीच...
भाकरी मात्र बिलकुल आवडत नसे .

त्यांच्यासाठी
ते दवाखान्यातून आल्यावर रात्री दहा वाजता मी गरम गरम पोळ्यासाठी तवा टाकत असे .
रविवारी सुद्धा आम्ही इतर काहीही वेगळे केले तरी पोळी करायलाच लागायची .

अहोंना इतर सर्व पदार्थ उत्तम करायला येतात
आणि ते हौसेने करतात सुद्धा..
अगदी चायनीज ,पंजाबी, गोडाचा शिरा, पुलाव, बिर्याणी हे पदार्थ तर खासियत आहे त्यांची ❤️
पण त्यांना पोळी मात्र अजिबात येत नाही

त्यामुळे मी एकटी कुठेही कार्यक्रमाला जाणार असेन तेव्हा
ते अगदी रिक़्वेस्ट करतात ..मला
दोन पोळ्या तेवढ्या करून जा .

मुलाची पण तीच तऱ्हा रोज पोळी पाहिजे तीसुद्धा गरम आणि आईच्या हातची
भाकरी अजिबात नको .

तशात आमच्याकडे सोळा वर्षे कुत्रा होता .
जिमी त्याचे नाव
त्याला पण पोळीच आवडत असे ..भाकरी केली की तो तोंड लावत नसे
मान फिरवून बसे ...😄

त्यामुळे रोजच्या दोन वेळच्या पोळ्या कधीच चुकल्या नाहीत

कधी नणंद जेवायला बोलावते मग आपण पण स्वयंपाक घरात जाऊन विचारतो
वन्स काय मदत करू तुम्हाला .?
लगेच त्या म्हणतात
सगळा स्वयंपाक तयार आहे बघ .
.आता फक्त पोळ्याचे काम ठेवले आहे तुला
मग आपण आनंदाने पोळ्या करायला सुरु करायचे ..🙂

भावाकडे सुट्टी दिवशी जावे भेटायला तर वहिनी म्हणते ..
ताई आता दोघेही जेवण करून जा बर का ,आज मी गुलाबजाम केलेत
आता कुकर लावते ,आणि भाजी फोडणीला टाकते

पोळ्या मात्र तुम्ही करायच्या ..
.या तुमच्या भाच्यांना तुमच्याच पोळ्या आवडतात .
अशा वेळेस अहो माझ्याकडे पाहून डोळ्यांनीच 😄हसतात ..😄

भाच्या मात्र एकदम खुष होऊन गरम गरम पोळ्या खातात
ते बघताना बरे वाटते ..🙂

लग्नानंतर हळूहळू पोळ्या बरोबर फुलके .वेगवेगळ्या प्रकारचे परोठे ,कुलचे,नान हे पण मी मस्त करू लागले.
माझी पाकक्रिया बहरू लागली 😀

मग जेवणाची आमंत्रणे चालून येऊ लागली
म्हणजे जेवायला येण्याची आमंत्रणे ..😄😄😄
कधी मैत्रीण म्हणत असे..
ए तु कुलचे खुप मस्त करतेस ...
उद्या येशील का
माझ्याकडे भिशी आहे ..
निदान मला कृती तरी. सांग
आता हीला कृती सांगण्यापेक्षा मी येईन शिकवायला असे म्हणायचे...

मग तिच्याकडे भिशी असल्याने ती अगदी बिझी होत असे ..
आणि तिला शिकवण्या ऐवजी मलाच सगळे पुर्ण करावे लागे ..🙂

छान झाल्याची पावती मात्र मिळत असे ..❤️

कधी भाची म्हणते आत्या उद्या आमच्याकडे रहायला येशील?
मी मैत्रीणीना बोलावले आहे
बाकी तयारी आई करेल
पण तू स्टफ पराठा करायचा आहेस
माझ्या मैत्रिणीना खुप आवडतो तु केलेला
आता ही प्रेमळ ऑर्डर कशी बरे टाळणार ❤️❤️

काकू तुझे नान अगदी हॉटेल सारखे होतात ग ...
फार आवडतात मला ...इति पुतण्या ..
मग खुष होऊन त्या चौघांना जेवायला बोलावणे ....

नान म्हणल्यावर पुलाव आणि पंजाबी स्वयंपाक आलाच ..
खाऊन तृप्त झाल्यावर ...मस्त झालाय सगळा स्वयंपाक ...
आता परत कर असा मस्त बेत ..🙂
असे पुतण्या म्हणे 🙂

काकू नक्कीच बोलावणार परत ही त्याला खात्री असतेच ...🙂🙂
असे आहे हे सगळे...
तसे हे पुराण खुप लांबेल 🙂😀
पोळीची आणि माझी गट्टी अशी आयुष्यभराची आहे ❤️

मला मात्र पोळ्या करणे नेहेमीच आवडते ..नो कंटाळा ..🙂🙂?

Marathi Blog by Vrishali Gotkhindikar : 112027764
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now