मीच होतो दीप, मीच होतो वात"
मी चाललो गंधाशिवाय, पण सुगंध मला व्यापून गेला,
ना फुलं होती हातात माझ्या, ना वसंत कुठे थांबलेला।
क्षणांचे थेंब सांडत गेले, ओंजळीने मी का घेतले?
शब्द नव्हते ओठांवर, पण मौनाने मी गाणं केलं
कोणी दिलं नव्हतं वचन, तरी मी वाट बघत राहिलो,
आसवांच्या ओघातून, कवडसे शोधत मी चाललो।
नभात जरी चंद्र नव्हता, तरीही चांदणं सोबत होतं,
रात्र काळोखात हरवली, पण मीच त्या रात्रीचा दीप होतो
श्वासांतून येते जळजळ, आणि हृदयात होते वादळ,
मन सांगतं — ‘थांब', पण आत्मा म्हणे — ‘थोडं अजून चाल।’
मी फाटलेल्या क्षणांत शिवलं, एकतर्फी एक स्वप्न जुनं,
जिथे कुणी उभं नव्हतं, तिथे मीच होतो सावलीसारखं
मी विचारला स्वत:लाच — ‘तू कोण आहेस रे, जीवना?’
हसून उत्तर आलं — ‘तूच प्रश्न आणि तूच उत्तर मानवा।’
मीच होतो दीप, मीच होतो वात,
वाऱ्याशी लढणाऱ्या प्रकाशाचा मीच एकान्त हात