“अवघड ...
तसे भेटत होतो आपण नेहेमीच इकडे तिकडे
एकमेकांच्या आवडी निवडी पण माहिती होत्या खूप जवळून ..
वेव्हलेंग्थ ज्याला म्हणतात ना तीही जुळायची बरीच ..!!!!
आणी अचानक एके दिवशी .
तु येवून माझे डोळे झाकलेस
आणी पटकन म्हणालास ..ए प्रेमात पडलोय मी तुझ्या ..
मी तुझे माझ्या डोळ्यावरच डोळ्या वरचे हात दूर केले
आणी चकित होवून तुझ्या कडे पाहिले ..
तुझ्या डोळ्यात एक वेगळीच “चमक “दिसली मला .
करशील ना माझ्या प्रेमाचा स्वीकार ..”..?
मी स्तब्ध झाले तुझ्या या प्रश्नावर ..
आयुष्याच्या या वळणावर ..तुझा “अनपेक्षित “,प्रश्न
उत्तर देणे पण माझ्या साठी “अवघड होवून बसलेय ..!!
वृषाली **