Marathi Quote in Blog by Vrishali Gotkhindikar

Blog quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

🌿 ज्वारीच्या पिठाची उकडपेंडी

🌿महाराष्ट्रात आपण तांदुळ पिठाची उकड करतो तसाच हा एक प्रकार
साधा सोपा चट्कन होणारा
विदर्भ किंवा मराठवाडा इथे तांदूळ कमी पण ज्वारी भरपूर असते
तिथे हा पदार्थ लोकप्रिय आहे

🌿साहित्य
एक वाटी ज्वारीचे पीठ
एक कांदा चिरून
कढीलिंब
मोहरी हिंग फोडणी
तिखट मीठ हळद चवीनुसार
भाजके शेंगदाणे
कोथिंबीर
ताक

🌿कृती
प्रथम कढईत थोडे जास्त तेल घालून
(जास्त तेल घातले तर हा पदार्थ उत्तम होतो )
मोहरी तडतडली की कढीलिंब व कांदा घालावा
कांदा थोडा परतला की लागलीच ज्वारीचे पीठ घालावे
गॅसची आच मंद करून पीठ परतत राहावे
पाच मिनिटे परतले की मग
हिंग, हळद ,तिखट घालावे
व पीठ सतत परतत राहावे
साधारण दहा मिनिटे झाली की खमंग वास येऊ लागतो व पीठ हलके लागू लागते
आता भाजके शेंगदाणे घालावे
एकदा परतून घेऊन
आता हळुहळू त्यात पाणी व थोडे ताक असे घालत रहावे व परतत राहावे
फार पाणी घालू नये
यानंतर पाच मिनिटात छान मोकळी उकडपेंडी तयार होते
कढई खाली उतरवून
डिश मध्ये काढावी
वरुन बारीक चिरलेला कांदा व कोथिंबीर टाकावी
टीप
ताक न वापरता नुसते पाणी सुद्धा घालता येते
खाताना सोबत ताक अथवा दही घ्यावे

Marathi Blog by Vrishali Gotkhindikar : 112034707

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now