सरकारी नोकरी नावाची माझी एकशे अकरावी पुस्तक आणि एक्यांशिवी कादंबरी. ही कादंबरी वाचकांना देतांना अतिशय आनंद होत असून यात दोन शिक्षकाची दयनीय अवस्था वर्णीत केल्या गेली आहे. म्हणतात की शिक्षण खातं चांगलं आहे. परंतु शिक्षण नावाच्या पवित्र खात्यात कोणता त्रास होतो? याचं वर्णन यात आहे. कादंबरी तसं पाहिल्यास जास्त वाचाविशी वाटणार नाही. कारण सत्य परिस्थिती लोकांना वाचणं आवडत नाही. ती कंटाळवाणी वाटते. परंतु अशीही शिक्षकांच्या जीवनाची दुरावस्था राहू शकते काय? याचा बोध या कादंबरीतून होतो. याव्यतिरिक्त या कादंबरीत मराठ्यांच्या आरक्षणाबाबत थोडासा भाग आणल्या गेला आहे. हा भागही तेवढीच मराठ्यांची थोडीफार माहिती देवू शकतो.
सरकारी नोकरी - 1
सरकारी नोकरी या पुस्तकाविषयी सरकारी नोकरी नावाची माझी एकशे अकरावी पुस्तक आणि एक्यांशिवी कादंबरी. ही कादंबरी देतांना अतिशय आनंद होत असून यात दोन शिक्षकाची दयनीय अवस्था वर्णीत केल्या गेली आहे. म्हणतात की शिक्षण खातं चांगलं आहे. परंतु शिक्षण नावाच्या पवित्र खात्यात कोणता त्रास होतो? याचं वर्णन यात आहे. कादंबरी तसं पाहिल्यास जास्त वाचाविशी वाटणार नाही. कारण सत्य परिस्थिती लोकांना वाचणं आवडत नाही. ती कंटाळवाणी वाटते. परंतु अशीही शिक्षकांच्या जीवनाची दुरावस्था राहू शकते काय? याचा बोध या कादंबरीतून होतो. याव्यतिरिक्त या कादंबरीत मराठ्यांच्या आरक्षणाबाबत थोडासा भाग आणल्या गेला आहे. हा भागही तेवढीच मराठ्यांची ...Read More
सरकारी नोकरी - 2
*************** २ ************************* सृष्टी प्रेम करीत होती नोकरीवर. तिला होतं की सरकारी नोकरी लागावी. ज्यातून तिनं जे आजपर्यंत भोगलं. त्या यातनेतून मुक्ती मिळेल. तशी ती फार शिकली होती व देशात तिच्या समाजाला आरक्षण असल्यानं तिला शिकता आलं होतं. त्यातच नोकरीतही आरक्षण होतंच. तसं पाहिल्यास लवकरच तिला नोकरी लागली होती. प्रभास हा सृष्टीच्याच वर्गातील एक मुलगा. गावातच राहणारा. तोही बराच शिकला होता. परंतु त्याच्या समाजाला आरक्षण नव्हतं. त्यामुळं त्याला लवकर नोकरी लागली नाही. त्यासाठी त्याला प्रतिक्षाच करावी लागली बराच काळ. तद्नंतर त्यालाही नोकरी लागलीच. ...Read More
सरकारी नोकरी - 3
******************* ३ ******************** आरक्षण काही लोकांना मिळालं होतं तर काही लोकांना आरक्षण नव्हतं. ज्यांना आज आरक्षण तो समाज मागासलेला बनला होता व ज्यांना आरक्षण मिळालं होतं. त्यातील काही लोकं नक्कीच वर गेले होते. ज्यात आरक्षण असलेला समाज शिक्षीत होताच त्याला नोकरीत असलेल्या आरक्षणानं नोकऱ्याही लागल्या होत्या. ज्या सरकारी स्वरुपाच्या होत्या. परंतु त्यांना सरकारी नोकऱ्या जरी लागल्या असल्या तरी त्या सरकारी नोकऱ्या नोकरीवर असलेल्या वर्गाचे एवढे निकृष्ट हाल करीत होत्या की त्यांच्यावर नोकरी करुच नये. असं म्हणण्याची वेळ यायची. नोकरी करुच नये असं वाटायला लागत असे. आरक्षण असल्यानंच ज्यांना आरक्षण होतं, त्या सृष्टी व ...Read More
सरकारी नोकरी - 4
********************** ४ ************** शालार्थ आयडी घोटाळा अभियान यशस्वी होईल काय? सृष्टीला याबाबत विचार यायचा. विचार की हे जर अभियान यशस्वी झालं तर माझी नोकरी जाईल आणि मी कायमस्वरुपी नोकरीला मुकेल. तिला ही चिंता नव्हती की तिचे पैसे जाणार नाहीत. पैसे तर त्या शाळेतील संस्थाचालकाचेच जातील. परंतु नोकरी गमावण्याचं दुःख तिला होतं व ते दुःख तिला सतत जाणवत होतं. त्यातच त्या शालार्थ आयडी घोटाळ्यातून तिचं वेतनही बंद झालं होतं. प्रभासचा आणखी एक मित्र होता. ज्याचं नाव होतं अमेय. अमेय हा देखील शिकलेला होता. परंतु त्यालाही आरक्षण नव्हतं व त्याचा ...Read More
सरकारी नोकरी - 5
******************** ५ *********************** ते मराठा आरक्षण व मराठ्यांचा आरक्षणाचा तो लढा. नेमकं हे आरक्षण संभ्रम करणारं होतं. संभ्रम याचा अर्थ मराठ्यांना असलेलं आरक्षण. दि. १९ फेब्रुवारी २०२४ म्हणजे शिवजयंतीच्या लगेच दुसऱ्याच दिवशी महाराष्ट्र शासनाने राज्य मागासवर्ग आयोगामार्फत, ज्याचे अध्यक्ष मा. न्या. सुनिल शुक्रे होते. त्यांच्या अहवालानुसार मराठा समाजाचा विधानसभेत ठराव मंजूर करून १०% स्वतंत्र असे MSR-SEBC आरक्षण मराठा समाजाला दिलं. असं असतांना एक मराठा समाजाचा नेता आम्ही ओबीसी म्हणत कायद्याची लढाई लढत होता. तसेच ओबीसीतील आरक्षण असलेले आरक्षण आम्हाला द्या. आम्ही कुणबीच आहोत. असाही हवाला तो मराठा नेता देत होता. ज्यात तिनशे पन्नास जातींना फक्त ...Read More