************ ११ ********************
प्रभास व सृष्टी भारत देशातील रहिवाशी. तसा नेपाळ हा शेजारील देश होता. नेपाळमध्येही अराजकतेच्या कारणावरुन संघर्ष झाला होता व नेपाळमधील सत्ताधारी असलेल्या लोकांची घरं नेपाळमधील जनतेनं जाळून टाकली होती. त्यातच नेपाळमधील सत्ताधारी लोकं मरणाच्या भीतीनं देश सोडून पळून गेले होते. त्यातच प्रभास व सृष्टीला वाटत होतं की नेपाळकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे. भारताचीही सध्याची स्थिती तशीच आहे. शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात त्यांनी टेट परिक्षा आणली आहे. शिक्षकांचा रोजगार हिरावणे सुरु आहे. लोकांचाही रोजगार हिरावणे सुरु आहे. लोकांनाही कामधंदे नाहीत. हं, सरकार, मजूर, गोरगरीब लोकांना मोफत धान्य नक्कीच देतं. परंतु त्यातून लोकं आळशी बनत चालले आहेत. जर लोकं आळशी बनले आणि सरकारनं उद्या राशन बंद केलं तर कदाचित हे आजचे कमावते हात, ज्या हाताला कमावण्याची सवय राहणार नाही. ते हात कमवू शकणार नाहीत. मग पंचाईत होईल.
प्रभास व सृष्टी विचार करीत होती. नेपाळसारखे भारतातील गरीब लोकांचे रोजगार हिरावले जात आहेत. त्यातच शालार्थ आयडी सारखे कित्येक घोटाळे भ्रष्टाचारानं लिप्त आहेत. ज्यात नेत्यांचाही समावेश आहे. कित्येक नेत्यांनी बँकेच्या माध्यमातून गरीबांच्या पैशावर डल्ला मारला आहे. अन् नेपाळसारखेच काही उच्चवर्णीय मुठभर लोकांच्या हाती देशाची सत्ता आहे.
प्रभास व सृष्टी जेव्हा विचार करीत. तेव्हा त्यांनाही वाटत असे की आपली नोकरी गेली तर काय झालं. आपण लोकांसाठी लढावं. लोकांना एकत्र करावं. आंदोलन करावं. आंदोलन उभारावं. आता आपली परिस्थिती सधन आहे. त्यातच प्रभासला आठवत होती त्याची जात व त्याच्या जातीला मिळालेलं आरक्षण. त्याच्या जातीला आरक्षण मिळालं होतं व त्यासाठी गतकाळातील त्याच्याच समाजातील नेत्यांनी आंदोलन केलं होतं. उपोषणही केलं होतं.
प्रभास व सृष्टी चर्चा करीत होते. त्यातच त्यांनी ठरवलं की आपण आंदोलन करावं. सर्व शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी. आपण आंदोलन करावं. सरकारवर दबाव आणावा. त्यातच त्यांनी तसा विचार करताच आंदोलनाची दिशा ठरवली. त्यासाठी त्यांनी लोकांना एकत्र केलं व त्यांना सांगू लागले.
"आपण पाहतो ज्या किंड्यांना बेडूक खातो, तेच किडे तो बेडूक मरण पावताच त्याला खातात. काल प्राणी माणसांवर हावी होते. आज तोच माणूस त्याच प्राण्यांवर हावी झालाय. हे असं का घडलं? याला कारण आहे, निसर्गनियम. ज्या निसर्गनियमातून आपण आपला बचाव करु शकत नाही. हेच घडलं नेपाळमध्ये. जे तेथील लोकांच्या कृतीवरुन लक्षात येत आहे.
नेपाळचंच पाहा. आज नेपाळ जळत आहे. तेथील राजतंत्रांनं केलेल्या भ्रष्टाचारानं. आज नेपाळ जळत आहे, तेथील राजनीतीक द्वेषानं नव्हे तर हिंदूवादी तत्वानं. तसाच आज नेपाळ जळत आहे, तेथील मिडीयावर लावल्या गेलेल्या बंदीनं. त्यातच लोकं मनात येईल ते कारणं सांगून नेपाळचा असलेला गौरव रस्त्यावर आणत आहेत.
नेपाळ असा देश आहे की ज्याची भौगोलिक रचना लहान आहे. परंतु तो देश कधीही इंग्रजांचा गुलाम झालेला नाही. कारण आहे तेथील भौगोलिक परिस्थिती. मुळात नेपाळी लोकं हे काटक असून शुर व लढवय्ये आहेत. अशी त्यांची ओळख जगताला प्रसिद्ध आहे. आजही भारतात घराची सुरक्षा करतो म्हटल्यास नेपाळच्याच लोकांना जास्त प्राधान्य देवून ते लोकं शुर, काटक व लढवय्ये असल्यानं त्यांच्या नावानं भारतीय सैन्यात गोरखा रेजिमेंट नावाचं सैन्यदळ आहे व ते सैन्यदळ त्यांच्याच नावानं प्रसिद्ध आहे. असं असतांना नेपाळ हे राष्ट्र का धगधगत असावं? ही विचार करायला लावणारी बाब आहे.
नेपाळची भौगोलिक रचना अत्यंत वैविध्यपूर्ण आहे, ज्यामध्ये दक्षिणेकडील 'तराई' प्रदेश, मध्यभागी असलेला 'पहाडी' प्रदेश आणि उत्तरेकडील उंच 'हिमालयीन' पर्वत यांचा समावेश होतो. या तीन मुख्य पट्ट्यांमुळे नेपाळमध्ये नैसर्गिक विविधता दिसून येते, ज्यात जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्टचा समावेश आहे. नेपाळची भूमी दक्षिणोत्तर दिशेने तीन मुख्य पट्ट्यांमध्ये विभागली आहे. हा नेपाळच्या दक्षिणेकडील मैदानी प्रदेश आहे, जो गंगा नदीच्या मैदानांचा विस्तार आहे. येथे सुपीक जमीन आणि मोठे औद्योगिक क्षेत्र आहे. या प्रदेशात मलेरिया-प्रवण उष्णकटिबंधीय जंगलं होती, पण मलेरिया निर्मूलनानंतर अनेक लोक इकडे स्थलांतरित झाले आहेत. तसेच हा मध्यभागी असलेला भाग आहे, ज्यात अनेक डोंगर, दऱ्या आणि सपाट जमीन आढळते. या प्रदेशात काठमांडू आणि पोखरा यांसारख्या प्रसिद्ध दऱ्यांचा समावेश आहे. नेपाळचा हिमालयीन प्रदेश हा उत्तर भाग असून, येथे जगातील सर्वात उंच पर्वतशिखरे आहेत.
नेपाळमध्ये माउंट एव्हरेस्टसह अनेक उंच पर्वत आहेत, जे या देशाची ओळख बनले आहेत. त्यातच नेपाळमध्ये कोशी, गंडकी, कर्णाली यांसारख्या अनेक जीवनदायीणी नद्या वाहतात, ज्या गंगा नदीला मिळतात. तसेच जैवविविधतेच्या दृष्टीकोनातून विचार केल्यास नेपाळ हा देश उंचीमध्ये असलेल्या प्रचंड फरकामुळे तेथे उपोष्णकटिबंधीय जंगलांपासून ते अल्पाइन पर्वतांपर्यंत विविध प्रकारचे हवामान आढळते, ज्यामुळे विविध प्रकारची जैवविविधता तेथे आहे. तसाच नेपाळ हा एक स्थलरुद्ध देश आहे, म्हणजेच या देशाला समुद्रापर्यंत पोहोचण्यासाठी कोणताही मार्ग नाही. या सर्व कारणानं नेपाळमध्ये इंग्रजांचीही नजर गेली नाही व त्यामुळं नेपाळ या देशात पारतंत्र्य आलं नाही.
नेपाळ या देशातील स्नानबद्धतेचा विचार केल्यास हा देश मध्य आशियामध्ये स्थित असून, त्याच्या उत्तरेला चीन (तिबेट) आणि दक्षिण, पूर्व व पश्चिमेला भारत आहे. अशा या देशात अलिकडील काळात झालेला हिंसाचार म्हणजे देशाची वाटचाल नेमकी कशाकडे? यावर प्रश्नचिन्हं लागतं.
नेपाळ हा देश भौगोलिक विस्तारानं लहान देश असला तरी या देशावर प्रभाव टाकणारे दोन देश आहेत. अमूरिका व चीन. त्यांना वाटते की आमची विचारसरणी या देशानं वापरावी वा तेथील लोकं आमच्याच विचारानं चालावेत. तसं पाहिल्यास जगात दोन प्रकारच्या विचारधारा निवास करीत असून एक विचारधारा लोकशाही व भांडवलशाही स्वरुपाची आहे. जी मुक्ततेच्या विचारसरणीचा विचार करते. मुक्तविचारसरणी म्हणजे स्वातंत्र्याशी संबंधीत विचारसरणी. ज्यानुसार प्रत्येकाला स्वातंत्र्य असणे. ज्या विचारसरणीत भारत, अमेरिका, ब्रिटन आदि राष्ट्राचा समावेश होतो. दुसरी विचारसरणी आहे कम्युनिस्ट प्रकारची. जिला माओवादी विचारसरणी म्हणतात. जी विचारसरणी रशिया, चीन हे देश वापरतात.
ही विचारसरणी नाही तर विचारधारा आहे व ही विचारधारा नेपाळमध्येही अस्तित्वात आहे व या विचारधारेनुसार नेपाळमध्ये दोन गट पडले आहेत. एक माओवादी गट, ज्याचं समर्थन चीन करीत होता व दुसरा भांडवलशाही गट. ज्याचं समर्थन अमेरिका करीत होता. तशीच माओवादी विचारसरणी त्या देशात बहुजन लोकांची असून त्यांची संख्या सत्तर टक्के होती. ज्या गटाच्या हातात राजसत्ता नव्हती व जो भांडवलशाही गट होता, त्या गटाची लोकसंख्या तीस टक्के होती व सत्ताही त्यांच्याच हातात होती. शिवाय जो गट भांडवलशाही व्यवस्थेला मानत होता. तोच गट लोकशाहीलाही मानत होता. परंतु तो गट जरी लोकशाही मानत असला तरी त्या गटाचं तसं मानणं म्हणजे वरवर दिखावा करणं होतं. तसंच त्या गटाच्या हातात सत्ता असल्यानं त्या गटानं मिडिया आपल्या हातात ठेवलेला असून सामान्य लोकांवर बंधनं टाकलेली होती. तसंच नोकऱ्या, उद्योग यातही बंधनं टाकलेली होती. शिवाय राजसत्ता हातात असलेला हाच गट मुक्त, अर्थव्यवस्थेचा पुरस्कर्ता असल्यानं तो भ्रष्टाचारही करीत होता. त्यातच एक महत्वपुर्ण कारण होतं, ब्राम्हण जात. राजसत्तेवर असलेली जात ही ब्राम्हण होती.
नेपाळमध्ये जो भडका उडाला. त्याचं कारण ब्राम्हण, बहुजन भेदभाव, मिडियावरील बंदी, भ्रष्टाचार हीच नाहीत तर अमेरिका आणि चीनची कुटनीती आहे. अमेरिकेला वाटतं की माझ्या विचारसरणीची समाजरचना नेपाळमध्ये तयार व्हावी. तसंच चीनलाही वाटतं की माझ्या विचारसरणीची माणसं त्या ठिकाणी तयार व्हावीत. त्यांच्या त्यांच्या म्हणण्यानुसार नेपाळमध्ये माणसं तयार झालीत. त्यातच भ्रष्टाचार, मिडीयावर असलेली बंदी, भेदभाव ही कारणं सुद्धा कारणीभूत ठरली व भडका उडाला. ज्यात माजी पंतप्रधानाचं घर जाळलं गेलं. अनेक मंत्र्यांची घरं जाळली गेली व सरकारात असलेल्या लोकांना पळ काढावा लागला.
निसर्गाचा नियमच आहे, जन्म देणे व मृत्यू देणे. जन्म जो घेतो, त्याला मृत्यू येतोच. कधी एक व्यक्ती श्रीमंत बनतो तर दुसरा गरीब. अन् जो गरीब बनतो, तो काही काळानंतर श्रीमंत. यासाठी भगवान रामाचं उदाहरण देता येईल. भगवान राम भगवान असूनही त्यांना चौदा वर्ष वनवास झाला. तसाच क्रिष्ण भगवान असूनही त्यांचं बालपण गोकुळात गेलं. अन् आजोबा उग्रसेन जे एका काळात राजे होते तर एका काळात कैदी. तसंच पांडवांचंही झालं. राजे असूनही वनवासात फिरणारे पांडव लगेच युद्धानंतर राजे बनले.
विशेष सांगायचं झाल्यास लोकशाही असल्यावर लोकशाहीचा बुरखा पांघरुन तानाशाही चालत नाही. ते लोकांच्या लक्षात येतं. ते नेपाळमधील जनतेनं दाखवून दिलं. खरा बोध दिला नेपाळनं लोकांना. खरंच नेपाळच्या लोकांकडून बरंच शिकण्यासारखं आहे. त्यांनी तर राजसत्तेलाच कोलमडून टाकलं. जो विचार नेपाळच्या राजसत्तेनं कधीच केला नव्हता.
महत्वपुर्ण बाब ही की संधी ही प्रत्येकाला मिळते आयुष्य जगण्याची. त्यातच कोणी कोणाचा गुलाम नाही व कोणी कोणाला गुलामही समजू नये. अन् तसं समजून वागणूक देवू नये. तशी जर कोणी वागणूक देण्याचा प्रयत्न केला तर एक दिवस असा उगवतो आणि एक वेळ अशी येते की तो घटक नेस्तनाबूत झाल्याशिवाय राहात नाही. मग ते सरकार का असेना. अन् तो व्यक्तीविशेष का असेना. कोणताच घटक हा कोणाचीही जास्त दिवस तानाशाही खपवून घेत नाही हे नेपाळमधून दिसलं, त्यांच्या देशातल्या प्रत्यक्ष कृतीतून. याचाच अर्थ असा की कोणी कोणाला शुद्र समजून त्याला असलेल्या मुक्त स्वातंत्र्यावर गदा आणू नये. त्याला मुक्तपणे विहार करु द्यावे.
नेपाळमध्ये सरकारनं केलं. इथं न्यायालयाच्या निकालावरुन सरकारनंही तेच केलं आपल्यासोबत. सरकारला हे वाटत नाही की धावण्याची शर्यत जर लावली व त्या शर्यतीत एखाद्या पन्नास वर्षाच्या व्यक्तीसोबत पंचवीस वर्षाच्या तरुणाला उभं केलं तर साहजीकच पंचवीस वर्षाचा तरुण नक्कीच जिंकेल. पन्नास वर्षाचा नाही. ही टेटची परिक्षाही त्याच धर्तीवर आहे. या टेट परिक्षेत न्यायालयीन निकालावर विचार न करता सरकारनं सरसकट सर्वांनाच बौद्धिक कसोटीत धावायला लावले. ज्यांचं वय पंचवीस आहे. तसंच ज्यांचं वय हे पन्नास आहे. खरंच पन्नास वर्ष वयाच्या व्यक्तीची बौद्धिक क्षमता ही पन्नास वर्ष वयाच्या व्यक्तीएवढी असू शकेल काय? याचा सरकारने विचारच केला नाही. हं, अनुभव भरपूर असतो पन्नास वर्ष वयाच्या व्यक्तीला. परंतु स्मरणाची स्थिती ही पंचवीस वर्ष वयाच्या व्यक्तीची जेवढ्या प्रमाणात चांगली असते. तेवढ्या प्रमाणात पन्नास वर्ष वयाच्या व्यक्तीची स्मरणाची स्थिती चांगली राहात नाही. ज्यातून सरकारनं विचार करायला हवा होता. परंतु सरकारनं यावर विचार केलं नाही. म्हणनच आपण आंदोलन करावं. जेणेकरुन सरकारला जाग येईल व सरकार निर्णय बदलवायला लावेल न्यायालयाला."
प्रभासला लोकांना भडकवलं नव्हे तर आपल्या हक्कासाठी आंदोलन करायला उकसवलं होतं.
टेट परिक्षेच्या निकालातून नापास झालेल्या लोकांची संख्या बऱ्यापैकी होती. प्रभास व सृष्टी तसे लोकांना समजवू लागले होते. हळूहळू करत बरीच मंडळी एकत्र येवून सरकार व न्यायालयाच्या विरोधात लढत होती. ज्याला न्यायालयही अवमान समजत होतं. सरकारही आंदोलन दडपवून टाकण्याचा विचार करीत होते. त्यातच प्रभासनं उपोषणही आरंभलं होतं.
ते टेट विरोधात आंदोलन. त्यातच प्रभास करीत असलेलं उपोषण. ते उपोषण होतं त्याचं न्यायहक्कासाठी. वाटत होतं की ज्या ज्या शिक्षकांची मुलं लहान लहान आहेत. त्या त्या लोकांना सरकारनं नोकरीवर घ्यावं. त्यांचा संसार उघड्यावर पडू देवू नये.
प्रभासचं ते आंदोलन. ते आंदोलन होतं, गेलेली सरकारी नोकरी परत मिळविण्यासाठी. त्यातच त्यानं आरंभलेलं उपोषण. ज्याचा बोध त्यानं मराठा आरक्षणातून घेतला होता. ज्यातून प्रश्न मिटेल असं वाटत होतं प्रभासला.
आज अकरा दिवस झाले होते. प्रभास आंदोलन स्थळी बसला होता उपोषणाला. तो गळून गेला होता. त्यातच एक डॉक्टरांची चमू त्याच्या प्रकृतीकडे कटाक्षानं लक्ष देत होती. परंतु प्रकृती तरी किती साथ देईल? पोटात अन्नाचा एकही कण न जात असल्यानं त्याची प्रकृती गळणार नाही तर काय? परंतु सरकारला व न्यायालयाला जाग येत नव्हती.
प्रभासची वाढती चिंताजनक प्रकृती. त्यातच काही सरकारमधील मंत्री सांगत होते की ते आंदोलन दडपवून टाकावं. परंतु ते आंदोलन दडपवून टाकणार कसं? ते समस्त शिकलेल्या मातब्बर लोकांचं आंदोलन होतं. अन् त्यात समजा एखाद्या जीवाला कमीजास्त झाल्यास नेपाळसारखी स्थिती निर्माण होवू शकते असं सरकारला वाटत होतं. तसंच त्या आंदोलनातून निष्कर्ष लवकरात लवकर न काढल्यास व उपोषणातून प्रभास मरण पावल्यास आणखी आंदोलन चिघळू शकतं. प्रसारमाध्यमं आपलं सरकार उलथवून टाकू शकतं. अशी भीती सरकारच्या मनात निर्माण झाली होती. ज्यातून शेवटी सरकारला जाग आली व त्यांनी ऐन बाराव्या दिवशी आश्वासन देत सरकारनं प्रभासचं उपोषण सोडलं.
आज आंदोलन व उपोषण सोडल्याला तीन महिने झाले होते. सरकार पुन्हा पाऊल उचलत नव्हतं. तसं पाहिल्यास प्रभासनं अनेक वेळेस सरकारला चेतवून सांगीतलं. परंतु तरीही सरकार त्यावर लक्ष न देता डोळेझाक करीत होतं. अशातच पुन्हा आंदोलन सुरु करण्याची धमकी प्रभासनं दिली आणि एक पत्रकार परिषद घेतली.
प्रभासनं घेतलेली पत्रकार परिषद. ज्यातून आपण जर आश्वासनानुसार वागलो नाही तर लोकांचा आपल्यावरील विश्वास उडेल. आपली बदनामी होईल. असं सरकारला वाटलं. त्यानंतर आपण कधीच निवडणुकीत निवडूनही येणार नाही. असंही त्यांना वाटलं. शेवटी दिलेलं आश्वासन पुर्ण करण्याची कार्यवाही झाली व एक अध्यादेश निघाला. ज्या अध्यादेशानुसार सर्व टेट परिक्षा नापास झालेल्या व नोकरीतून बाहेर काढलेल्या लोकांनाही रोजगार मिळाला.
ते आश्वासन व त्या आश्वासनाची परिपुर्ती होताच सर्व शिक्षक आपआपल्या नोकरीवर रुजू झाले होते. मात्र प्रभास काही रुजू झाला नाही. तो आपली दुकानदारीच सांभाळत राहिला. कदाचित त्याला वाटत होतं की आपली नोकरी पुर्ण होईपर्यंत सरकार आणखी एखाद्यावेळेस एखादं पिल्लू काढेल. ज्यातून पुन्हा आपली नोकरी धोक्यात येईल. त्यापेक्षा आपण नोकरीतून बाहेरच राहिलेलं बरं. जेणेकरुन आपल्याला ना नोकरीतील उतारचढाव पाहायला मिळतील, ना त्या उताराचढावासाठी आंदोलन करावं लागेल.
आज तो सुखी होता. जरी नोकरीएवढा पैसा तो आपल्या धंद्यातून कमवीत नव्हता तरीही. परंतु त्याला नोकरीत असलेली चिंता नव्हती. ना ऑनलाईन कामं होती. ना नोकरीतील इतरही त्रासदायक असलेल्या बाकीच्या गोष्टी होत्या. ज्या नोकरीवर असलेल्या शिक्षकांना सतावत होत्या.
टेट परिक्षा होती. परंतु ती नोकरीवर लागण्यापुर्वीच द्यावी लागत होती. आपण शिक्षक पदासाठी पात्र आहोत हे सिद्ध करण्यासाठी. त्याचं कारण होतं, सरकारचं अध्यापक महाविद्यालय काढणं. सरकारनं एवढे अध्यापकाचे महाविद्यालय काढले होते, की ज्या महाविद्यालयातून एका वर्षाला भरपूर शिक्षक निघत. त्यातच अशा शिक्षकांना नोकरीत सामावून घेतांना प्रश्न उभा असायचा. शिवाय कॉन्व्हेंटच्या शाळेनं तसा प्रश्न सरकारसमोर उपस्थित केला होता. मुलं ही कॉन्व्हेंट शाळेत जात असल्यानं अनुदानीत जिल्हा परिषद शाळेत मुलं सापडत नव्हती. शेवटी अध्यापक पदवी प्राप्त केलेल्या शिक्षकांना न्याय जर द्यायचाच असेल तर टेट पराक्षा बंधनकारक केली होती सरकारनं. जे पास होतील, त्या त्या वर्षानुसार त्यांची नियुक्ती होत असे. त्यातच त्यात पाच टक्के गुणांची आरक्षण असणाऱ्यांनाही सुट होती.