Sarkari Nokri - 6 in Marathi Philosophy by Ankush Shingade books and stories PDF | सरकारी नोकरी - 6

Featured Books
Categories
Share

सरकारी नोकरी - 6

*********** ६ ***********************

            आरक्षण........ इतर समाजाला असलेलं आरक्षण. आरक्षण असल्यानं तथाकथित समाज पुढे गेला होता. तो भरपूर शिकला होता व नोकरीला लागला होता. त्या समाजात बराच असा बदल झाला होता. मात्र तो समाज शिकलेला असला तरी वा उच्चशिक्षीत झाला असला तरी त्यांच्यातील संस्कार तुटले होते. 
            प्रभासचा मित्र अमेय हा ओपन प्रवर्गातून होता व त्याच्या समाजाचा असा कोणताच लढा नव्हता की त्याच्या समाजाला आरक्षण मिळेल. त्यातच आरक्षणावरुन त्याच्या मनात नित्यनेमानं आरक्षणविरोधी विचार येत. त्याला वाटत होते की हे असं आरक्षण नकोच द्यायला. कारण आरक्षणानं देश कमजोर होत आहे व संस्कार तुटत आहे. तसं पाहिल्यास त्याचा कधीकधी प्रभासशी वार्तालाप होत असे. त्यावर याच आरक्षणावरुन वादविवादही होत असत. त्यातच प्रभास त्याला सांगत असे की संस्कार हे केले जात नाहीत, होत असतात. प्रभाससोबत एकदा अमेयचा असाच वार्तालाप. त्यातच प्रभास त्याला म्हणाला,
          "एका मुलाची आई सांगत होती की तिच्या मुलाला मोबाईल दिला नाही म्हणून त्यानं आपल्या घरचा टिव्ही फोडला. असं का घडलं. त्याचं कारण म्हणजे त्याच्या आई वडिलांचं टिव्ही पाहण्याचं व्यसन. ते मुल लहान असतांना त्याचे आईवडील सतत मोबाईलच पाहात असायचे. त्याची सवय मुलालाही लागली व तेही पुढे जावून मोबाईल पाहायला लागले. पुढं तर असं झालं की मुलगा व आई, दोघंही एकसाथ टिव्ही पाहायला लागले. ज्यातून ते मुल जेव्हा मोठं झालं, तेव्हा त्याला व्यसन लागून त्यानं टिव्ही फोडल्याची घटना घडली. म्हणतात की संस्कार हे केले जातात. ते होत नाहीत. परंतु ते सर्व धांदात खोटं आहे. यात भक्त प्रल्हादाचंच उदाहरण आहे की ज्याचेवर तो लहान असतांना हिरण्यकक्षपूनं त्याचेवर संस्कार करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्याला वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलं. परंतु काहीच परिणाम झाला नाही. यावरुन हे लक्षात येते की संस्कार हे कुत्र्याच्या शेपटीसारखे असतात. ज्याप्रमाणे कुत्र्याचे शेपूट कुठेही टाकलं, कसंही सरळ केलं तरी ते वाकडेच दिसते. तसंच संस्काराचं असतं. तेही कितीही चांगले केले तरी त्याचे परिणाम वाईटच दिसतीलच. याचं कारण आहे, त्याला जन्म देणाऱ्या आईवडिलांचं वागणं व त्याचेवर उद्भवणारी परिस्थिती. ती त्याच्या चांगल्या वागण्याला अनुसरून असायला हवी.
           संस्कार करावे लागत नाहीत. ते आपोआपच होतात. घरातल्या सदस्यांच्या वागण्यातून. असं म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. तसं पाहिल्यास आज संस्कार हे तुटत चालले आहेत. लोकं आपल्या घरातील जेष्ठ सदस्यांना वृद्धाश्रमात टाकत आहेत. ते वरीष्ठांचा आदर करीत नाहीत. त्यातच एखाद्यावेळेस अनाथ, अपंगांचीही सेवा शुश्रूषा करीत नाहीत. सतत मुलांसमोरही दारु पितात. निरनिराळी व्यसनं करतात. तेच दिसतं मुलांना व मुलंही पुढं जावून तसंच वागायला पाहतात.
           संस्कार हे दोन प्रकारचे आहेत. पहिला वाईट प्रकार व दुसरा चांगला प्रकार. त्यातच वाईट व चांगल्या प्रकाराचेही दोन दोन प्रकार आहेत. त्याला उपप्रकार म्हणता येईल. पहिल्या वाईट प्रकारात आईवडील कितीही चांगले असले तरी मुलांमध्ये वाईट संस्कार रुजणं तसंच त्यातीलच दुसरा प्रकार म्हणजे आईवडील चांगले नसेल तर मुलंही चांगले न निपजणं. जशी खाण तशी मातीच. मग लोकं म्हणतात की त्याचे मायबापच तसे. मग मुलं कुठून चांगली निपजणार.
         संस्काराच्या बाबतीतील दुसरा प्रकार आहे, मायबाप चांगले असणं, जेणेकरून त्यांचे चांगले संस्कार मुलांवर होतील व मुलं चांगले बनतील. तसाच त्यातील दुसरा प्रकार आहे, आईवडील कितीही वाईट असतील तरी त्यांच्यात चांगलेच संस्कार रुजणे. संस्कार हा काही दुकानातील भाजीपाला नाही की जो विकत आणता येईल. एखाद्या दुकानदाराला असं कधीच म्हणता येणार नाही की बाबारे मला अमूक अमूक रुपयाचा संस्कार दे. तसं होत नाही व होवूच शकत नाही. कारण संस्कार हे आपोआपच होत असतात. ते करावे लागत नाही वा करताच येत नाहीत. आज बरीचशी मंडळी आपल्या आईवडीलांना वृद्धाश्रमात टाकत असतात. त्यांची इच्छा नसली तरी. जे त्यांच्यासाठी तुरुंगच असतं. असं का होतं? त्याचं कारण आहे संस्कार. म्हणतात की माझा मुलगा चांगलाच निघणार. कारण माझं मूल माझ्याच आज्ञेत वागतं. ते जास्त बोलत नाही. वात्रट तर अजिबात बोलत नाही. शिव्या देत नाही. दारु पीत नाही. कोणतंच व्यसन नाही. परंतु जेव्हा त्याचा विवाह होतो. तेव्हा त्याचं सर्व आचरण बदलतं. ते मुल कुणाच्या शिव्याशापाला भीत नाही. आपल्या आई व वडिलांनाही भीत नाही. त्यांनाही स्पष्टच बोलत असतं. ज्यात काही वात्रट शब्दही असतात. मुलं अशी का वागतात. जे आचरण वात्रट स्वरुपाचं दिसतं आपल्याला. कारण ती मुलं बालपणात काही निरीक्षणं करीत असतात. त्याच आठवणी ते मनात घोळवत असतात. ज्या आठवणी कायमस्वरुपी स्मरणात राहतात.
         मुलं लहान असतात. तेव्हा लहानपणी पाहात असतात की आपली आई आपल्या आजीला रोज रोज रात्रीची भाजी व शिळीच पोळी देते. कधी देतही नाही. यात ज्या गोष्टी घडतात. त्यांची आठवण कायमस्वरुपी मनात घर करुन राहते. एखाद्यावेळेस जेव्हा मुलगा आईला त्याबद्दल विचारतो. तेव्हा त्याची आई त्याला रागावून बोलते. कधी एखाद्यावेळेस एखादी थापटही देते व म्हणते की फालतूच्या गोष्टीत नाक खुपसू नकोस. त्यानंतर तेच बाळ जेव्हा मोठं होते व पाहते की त्याची आजी मेलेली असते व त्याची आई त्याच्याच आजीच्या मुर्तीसमोर सुग्रास अन्न ठेवते. त्यावर तो मुलगा विचार करतो की काश! माझ्या आईनं माझी आजी जीवंत असतांना असंच सुग्रास अन्न तिला चारलं असतं तर..... खरंच ही मुर्ती ते अन्न खात असेल काय? तेच दृश्य दररोज दररोज पाहात असतांना व अनुभवत असतांना ते मूल सतत विचार करीत असतं बालपणापासूनच. त्यामुळंच ते घरात पुरेसं बोलत नाही. संवाद साधत नाही. असाच काळ जातो व जेव्हा त्याचा विवाह होतो. तेव्हा त्याचा स्वभाव बदलतो. तद्नंतर तो आपला असली चेहरा दाखवतो. तो असली चेहरा असतो. ज्या आईनं त्याच्या आजीच्या जीवंतपणी तिला शिळं अन्न दिलं व ते त्याच्या वडिलांनं निगरगट्ट राहून पाहिलं. त्याच आईवडिलांना वृद्धाश्रमात टाकणं.
         आज आपण जेव्हा वृद्धाश्रमात पडतो ना. तेव्हा मात्र विचार येतो. विचार येतो की आपण असं का केलं की आपल्याला आपल्या लेकरानं वृद्धाश्रमात टाकलं. परंतु त्यामागे कारण असतं, आपल्या हातून आपल्या तरुणपणात आपल्या वर्तनबदलातून झालेल्या चुका. ज्या चुका ती वेळ गेल्यावर बदलूच शकत नाहीत. त्या चुकांची परियंती म्हणजे वृद्धाश्रम. जर त्या चुका झाल्याच नसत्या आपल्या हातून तर आज आपण आपल्याच लेकराच्या घरी आपल्या नातवंडासोबत अगदी सुखात राहिलो असतो.
         संस्काराबाबत आणखी सांगायचं झाल्यास आजच्या काळात आणखी एक प्रकार दिसतो. तो म्हणजे देवाच्या मुर्तीसमोर सुग्रास अन्न ठेवणं. त्यातच तेच अन्न गाईला देणं. म्हटलं जातं की ते अन्न गाईच्या माध्यमातून देवापर्यंत पोहोचतं. यावर एक कथाही आहे. या कथेत एक पंडीत व्यक्ती नदीजवळ पुजा करतो व पित्तरांची पुजा करतांना तो कावकाव ये म्हणत पित्तरांना पाणी टाकत असतो. अन्नही टाकत असतो. त्यावर एक साधाभोळा व्यक्ती त्याला कारण विचारतो व म्हणतो की आपण असं का करत आहात. त्यावर उत्तर देतांना पंडीत व्यक्ती म्हणतो की असं केल्यानं हे पाणी व अन्न माझ्या आईवडिलांना पोहोचेल. त्यात साधाभोळा व्यक्ती विचारतो की ते कुठे आहेत. त्यावर उत्तर असतं की ते स्वर्गात आहेत. तद्नंतर तो व्यक्ती स्वतः नदीत उतरुन पाणी फेकतो. असं कार्य तो दिवसभर करतो. त्यावर लगतचा पंडीत ते दृश्य पाहात असतांना त्याला आश्चर्य वाटतं व तो त्या साध्याभोळ्या शहाण्या व्यक्तीला विचारतो की हे असं का करत आहात. त्यावर उत्तर देतांना साधाभोळा व्यक्ती म्हणतो की माझी शेती ही दूर आहे व त्या शेतीत पिकं आहेत. मी माझ्या पिकांना पाणी देतोय. त्यावर आश्चर्य वाटून पंडीत व्यक्ती म्हणतोय की हे पाणी तुझ्या शेतीत कसं जाणार. तू वेडाच आहेस. त्यावर उत्तर देतांना साधाभोळा व्यक्ती म्हणतो की महाराज आपण टाकलेलं अन्न, पाणी जर इथून टाकून स्वर्गात जर जात असेल तर मी येथून टाकलेलं पाणी माझ्या दूरच्या शेतात का जाणार नाही. त्यानंतर पंडिताचे डोळे उघडतात. प्रश्न यात असा आहे की लोकं आपल्या आईवडिलांची सेवा त्यांच्या जीवंतपणी कधीच करीत नाहीत. त्यांना कधीही चांगलं ताजतवानं सुग्रास अन्न देत नाहीत. अन् ते मरण पावल्यानंतर त्यांची चांगली फोटो बनवतात व त्या फोटोसमोर ते अन्न आणि पाणी ठेवतात. खरंच ती मुर्ती ते जेवन तरी करते काय? समजा एखाद्यावेळेस एखाद्या अनाथ मुलाला वा एखाद्यावेळेस एखाद्या म्हाताऱ्याला जर भूक लागली असेल तर आपण त्याला साधं एक बिस्कीटंही देत नाही. परंतु चांगलं सुग्रास अन्न मुर्तीसमोर त्या मुर्तीला देव मानून ठेवतो. कारण ती आपली श्रद्धा असते. परंतु कितीही आपण एखाद्या मुर्तीसमोर अन्न ठेवलं तरी विचार असा की खरंच ती मुर्ती खात असेल काय? आता गणपती विसर्जनाचंच पाहू. इथं तर लोकं असेही आहेत की ते दहा दिवस गणपतीची स्थापना करतात. त्या मुर्तीसमोर दहा दिवस लाडू, मोदक व वेगवेगळे सुग्रास अन्नाचे पदार्थ ठेवतात. अन् दहाव्या दिवशी त्याच मुर्तीला नाल्यात नेवून शिरवतात. लोकं एवढंच करीत नाहीत तर काही लोकं त्याच मुर्तीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर, घाणेरड्या रस्त्यावर ठेवतात. ज्यातून गणपती जर जीवंत असता तर नक्कीच रागावला असता व त्यानं शापच दिला असता. अशी त्याची अवस्था करुन टाकतो आपण. म्हणजे आपण ज्याला देव मानतो. त्या देवाचीच आपण अशी अवस्था करतो. तिथं आपले मायबाप. जे आपल्यासाठी स्वस्त असतात. जे आपल्यावर अजिबात रागवत नाहीत, आपण काहीही केलं तरीही. आपण स्वतःला एवढे महान समजतो की आपण काहीही करीत असतो. परंतु आपलं कृत्य आपली मुलं पाहात असतात. ती मुलं आपण करीत असलेल्या गोष्टी टिपत असतात. प्रसंगी त्यावेळेस ती मुलं आपल्याला काहीही म्हणत नाहीत. परंतु जेव्हा ती मोठी होतात. तेव्हा ती आपलं ऐकण्यापलिकडं जातात. कधी तीच मुलं नशेच्या आहारी जातात. कारण ते जेव्हा लहान असतात. तेव्हा आपण त्यांच्यासमोर त्यांना चांगल्या गोष्टी न शिकवता त्यांच्यासमोर नशा केलेली असते. मुलं तेच पाहात असतात व आपण बोलण्यापलिकडे गेल्यावर ती मुलं स्वतः नशा करीत असतात.
           महत्वाचं सांगायचं झाल्यास जसं कुत्र्याचं शेपूट वाकडंच असतं. मग ते कोणत्याही नळीत टाका. कसेही आणि काहीही करा. तसं संस्काराचं आहे. संस्कार हेही केले जात नाहीत. ते होत असतात. लहान मुल जेव्हा निरीक्षण करतात, चांगल्या आणि वाईट गुणांचे. त्यावर परीक्षण करीत असतात. ते मायबापातील चांगले गुण ओळखतात व तेच घेतात. असे संस्कार करतांना त्यावर त्यांना कितीही रागावलं. कितीही त्यांचं मन परीवर्तीत करण्याचा प्रयत्न जरी केला तरी त्यांचेवर होत असलेले संस्कार बदलत नाहीत. म्हणूनच संस्काराची पहिली पायरी आहे स्वतः मायबापांनी आपलं आचरण बदलवणं. ते जर चांगलं नसेल तर मुलं नक्कीच बिघडतात व त्याचे दुष्परिणाम आपल्याला त्याच्या तरुणपणातच पाहायला मिळतात हे तेवढंच खरं. म्हणूनच मायबापांनी आपलं वागणं सुधारण्याची गरज आहे. ते चांगले वागतील तर मुलं चांगले बनतील. ते जर व्याभिचार करतील तर मुलंही व्याभिचारीच बनतील यात शंका नाही."
           प्रभासचं म्हणणं जरी बरोबर असलं तरी ते अमेयला पटलं नाही व अमेय त्याला म्हणाला,
          "तुम्ही मराठे, का मागत आहात आरक्षण? तुम्ही आरक्षण मागू नका. आरक्षण ही कुबडी आहे, आपल्याला कुबडं करणारी यंत्रणा. आपण पाहतो ना की इतर आरक्षण भोगणारा समाज कसा आहे ते?"
            ते अमेयचं बोलणं. मराठे का मागत आहेत आरक्षण? त्याचा तो प्रश्न. त्याचं प्रभासला म्हणणं होतं की आरक्षण ही कुबडी आहे व त्यानं समाज कमजोर होतो. हे सगळं बरोबर होतं. त्यावर प्रभास विचार करीत होता. विचार करीत होता आरक्षणावर. आरक्षण का द्यावं या शोधाचा इतिहास पाहिल्यास आपल्याला हेच जाणवेल की आपल्या पुर्वजांनी आरक्षण नव्हतं तेव्हा बरंच भोगलंय. त्याला इतिहास साक्षीला आहे. मराठा ही काही जात नाही. तो एक समुदाय आहे. असं लोकांचं म्हणणं. तसंच मराठा समुदाय म्हणजे फक्त महाराष्ट्रातच राहणाऱ्या अठरापगड जाती. ज्यात सर्वच जातींचा समावेश होतो. एकट्या कुणबी जातींचाच नाही. तसा उल्लेख कोणत्यात गॅझेटमध्ये नाही व मराठा जात अस्तित्वात असलेली कोणत्याच गॅझेटनं दाखविलेलीही नाही. तसंच त्यात अठरापगड जाती दाखविलेल्या आहेत. ज्या सर्व जाती या मराठा आहेत. असंही लोकांचं म्हणणं. बिचारे लोकं विना पुराव्यानच बोलतात. त्यांना माहितच नाही की मराठा ही जात आहे. जे हैदराबाद गॅझेटमध्ये नमूद आहे. परंतु हैदराबाद गॅझेट तयार करणाऱ्या व्यक्तीनं एक स्वल्पविराम दिला नसल्यानं मराठा कुणबी असं सरसकट लिहिण्यात आलं असावं. 
           मराठा ही जशी जात नाही. तो एक समुदाय आहे असं सांगतांना लोकं म्हणतात की मराठा जात बनली कशी व बनवली कशी ? त्याचं ते उत्तरही देतात, उत्तर असतं, आपल्याच काही जुन्या पिढीतील मातब्बर मंडळींनी स्वतःच्या स्वाभिमानासाठी विचार केलेल्या गोष्टी. विचार असा की पुर्वी भेदभाव बराच होता. तसे भेदभावाचेही दोन प्रकार होते. पहिला प्रकार म्हणजे जातीअंतर्गत असलेला भेदभाव व दुसरा प्रकार म्हणजे जातीबहिर्गत असलेला भेदभाव. जातीअंतर्गत भेदभाव म्हणजे जातीत असलेल्या पोटजातीतील भेदभाव. जसे एक मराठा चांभार, परदेशी चांभार व्यक्तीच्या हातचे खात नव्हता. त्याला भेदभाव मानत होता. तसेच एक बैल तेली लोकांशी दोन बैल तेली लोकं सोयरीक करीत नव्हते. तशाच होत्या कुणबी समाजातही पोटजाती. ज्यात एक महाराष्ट्रातील कुणबी जात इतर पोटजातीत विखुरलेल्या इतर कुणबी जातींना आपली जात म्हणून स्विकारत नव्हता. ज्यातून १८७२ ची जेव्हा जनगणना झाली वा १८८१ चा हैदराबाद गॅझेट बनला, तेव्हा त्यात सन्मानानं आम्ही मराठा कुणबी असं लोकांनी लिहिलं. साहजिकच मराठा हा त्या गॅझेटनंतर समुदाय राहिला नाही तर ती एक जात बनली. हे सगळं घडलं जातीअंतर्गत असलेल्या भेदभावानं. परंतु त्याला ती मंडळी प्रमाण देत नाहीत. विचार करीत नाहीत की हा फक्त स्वल्पविरामाचा फरक आहे. 
           लोकं असंही म्हणतात की आम्ही कोणत्याही जातीचे असलो तरी आम्ही मराठा म्हणतांना आमचं रक्त सळसळतं. धमणीत एक वेगळीच रग येते. मरतुकडं शरीरही अगदी ताजंतवानं होतं. कारण आम्ही जरी वेगवेगळ्या जातीधर्माचे जरी असलो तरी महाराष्ट्रात राहात असल्यानं मराठाच आहोत. आपल्या पुर्वजांनीही म्हणजेच मराठा समुदायांनी जेव्हा गॅझेट बनत असतांना आपआपल्या जाती लिहिल्या. तेव्हा आपआपल्या जाती लिहित असतांना व असं म्हणत असतांना बराच मोठा त्यांना स्वाभिमान वाटला. छाती इंचभर तरी फुगली असेलच. ज्यातून मराठा ही विशिष्ट जात पडली. याबाबतही काही लोकांचं म्हणणं आहे की जर मराठा या जातीचा उल्लेख तत्सम गॅझेटमध्ये दिसत नाही तर मग मराठा ही जात नव्हती काय? नक्कीच याचं उत्तर मराठा ही जात होती, असंच असू शकेल. याचा पुरावा व प्रत्यय प्रत्यक्ष शिवाजी महाराजांचा इतिहास वाचतांना येतो. शिवाजी महाराजांच्या सैन्यात जे विविध लोकं होते, त्यांना मावळे संबोधले आहे, ज्यात मराठा ही जात प्रामुख्याने होती. परंतु महाराष्ट्रात राहणाऱ्या सर्वच जाती स्वतःला मराठा समजत असत. हा इतिहास वाचतांना लक्षात येतो. पुढे धनगर समाजाचे असलेले मल्हाररावही स्वतःला मराठेच संबोधत असत. यावरुन मल्हारराव होळकर हे मराठा जातीचे ठरले नाहीत. ते धनगरच ठरले. शिवाय मराठा संबोधून स्वतःचा स्वाभिमान दाखविण्याचा पुरावा आणखी त्यावेळेस दिसतो, ज्यावेळेस बाबासाहेबांनी मराठ्यांचा समावेश संविधानातील तिनशे पन्नासव्या जातीत केला होता. मराठ्यांनी चक्कंच म्हटलं होतं की आम्हाला आरक्षण नको. ही भीक आहे व ही भीक आम्ही घेणार नाही.
           आरक्षणाच्या मुद्यावरुन काही लोकं म्हणतात की ही कुबडी आहे. ही कुबडी कोणालाच मिळू नये. कारण आरक्षणानं देश कमजोर होतो. समाज कमजोर होतो. माणसं कमजोर होतात. अन् ते बरोबरच आहे. आरक्षण नसेल तर समाज कमजोर होतो. परंतु ते जरी खरं असलं तरी त्याच लोकांनी आजपर्यंतचा इतिहास लक्षातच घेतलेला नाही. आजपर्यंतचा इतिहास असा आहे की समाज भेदभावानं पोखरला होता. त्यात समाजाचे दोन भाग पडले होते. एक होता अस्पृश्य आणि दुसरा स्पृश्य. ज्यात वर येण्यासाठी आरक्षणाची गरज होती. दुसरा गट पाडला होता समाजानं. एक म्हणजे स्री व दुसरा पुरुष. ज्यात स्रिला दुय्यम दर्जा असून तिचेही हक्कं नाकारले गेले होते. तिला वर येण्यासाठी आरक्षण हवं होतं. त्यानंतर तिसरा गट होता की जो गट जंगलातच राहात होता. त्यांना वर आणण्यासाठी आरक्षण हवं होतं. अन् चवथा गट होता भटकंती करणाऱ्यांचा. त्यांनाही आरक्षणाची गरज होतीच. आज त्या घटकांना आरक्षण दिलं गेलं. म्हणूनच तो समाज आज उच्चस्तरावर पोहोचला आहे. त्यामुळंच आरक्षण ही कुबडी ठरत नाही. त्यातच दुसरी बाजू याविरुद्धची पाहिली तर असं लक्षात येतं की पुर्वी आरक्षण नव्हतं. तरीही देशातील स्री, देशातील अस्पृश्य, देशातील, आदिवासी व देशातील भटकंती करणारी मंडळी कोणत्या अवस्थेत होती. बिचारी कितीतरी प्रमाणात पराक्रमाचे कार्य करुनही समाजानं त्यांचं जगणं अगदी दयनीय करुन टाकलं होतं. आमचाही मराठा समाज हा मागासलेलाच होता. दऱ्याखोऱ्यातच राहात होतो आम्ही. म्हणूनच आम्हालाही आरक्षण हवं. तसाच स्रियांचाही इतिहास पाहिला आणि त्यांचा पराक्रम पुर्वीपासूनचा पाहिला की जाणवतं की स्रिला पुर्वीपासूनच पराक्रम करुनही प्रतिनिधीत्व मिळालेलं नाही. या देशातील स्री गार्गी, मैत्रेयी, भानुमती, उर्मिला, शांता, जीजाबाई, सावित्रीबाई, राणी लक्ष्मीबाई, या स्रियांचा योगदानी पराक्रम असूनही समाजानं स्रियांना दुय्यम ठरवत असलेल्या प्रथा बंद केल्या होत्या काय? त्याचं उत्तर नाही असंच येईल. शिवाय जे कर्ण, एकलव्य एवढंच नाही तर संत हरळ्या, संत रोहिदास, संत चोखामेळा, गणपत गायकवाड व त्याचा भाऊ रायप्पा महार या अस्पृश्य म्हणून गणल्या जाणाऱ्या लोकांच्या अंगी जरी शौर्य असलं तरी संपुर्ण अस्पृश्य समाज हा पुढे आला नाही. कारण होतं त्या काळात नसलेलं आरक्षण. एवढंच नाही तर जंगलातच राहणाऱ्या आदिवासी भिल्लं मंडळींचा वापर हा केवळ युद्ध करीत असतांना केल्या जायचा. परंतु त्या समाजाला कधीच तथाकथित समाजानं वर येवू दिलं नाही. आज मात्र तो समाज वर आला आहे व आपल्या अस्तित्वाच्या क्रमवारीत त्या समाजांनी आपलं स्थान टिकवून ठेवलं आहे. म्हणूनच आरक्षण ही अति महत्वाची गोष्ट असून हे सगळं आरक्षण असल्यामुळंच घडलं आहे. म्हणूनच आजचा मराठा समाजही आरक्षण मागत असून तो स्वतःची जात मराठा कुणबी म्हणून सांगत आहे. महत्वाचा मुद्दा हा की मराठा ही जात आहे, परंतु काही लोकांच्या म्हणण्यानुसार मराठा ही जरी जात नसली तरी तिही माणसंच आहेत याच देशातील. त्यांच्यातही बरीचशी अशी मंडळी आहेत की ज्या मंडळींची अवस्था ही अतिशय दयनीय आहे व ती इतर समाजांपेक्षा दयनीयच आहे. जरी ते कोणत्याही जातीचे नसले तरी त्यांनी स्विकारलेली कुणबी जात व तशा स्वरुपाचा हैदराबाद गॅझेटमध्ये असलेला उल्लेख हा सत्य असल्याने त्यांची जात कुणबीच आहे. हे सत्य नाकारताच येत नाही. त्याचे पुरावेही ते देत आहेत. मग त्यांना का बरं कुणबी समजू नये व त्यांचा कुणबी जातीच्या आरक्षणात समावेश करु नये? विशेष म्हणजे हा वादाचा मुद्दा नाही. अन् जो समाज त्यांची असलेली कुणबी जात नाकारत असेल, त्यांनी नेमकी त्यांची जात कोणती हे सांगावे. कारण मराठा या विशिष्ट जातीची नोंद कोणत्याही गॅझेटमध्ये नाही. म्हणूनच आजचा मराठा समाज हा कुणबीच असून मागास असल्यानं तो आरक्षण मागत आहे आणि ते त्याला द्यायला हवं. यात राजकीय हेतू जरी असेल तरी ही सत्य बाब आहे. म्हणूनच त्यांना ते मागत असलेलं आरक्षण द्यावं. जेणेकरुन त्यांच्यातील तळागाळातील माणूस वर येईल व आपले पुनरुत्थान करु शकेल हे तेवढंच खरं. परंतु असं जरी असलं तरी सरकार कोणती भुमिका घेते. यावर सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्यांच्या आरक्षणावर सरकारच विचार करणार असून ते काळच ठरविणार आहे. तेव्हा त्यावर जास्त विचार करण्यापेक्षा तुर्तास चूप राहिलेलं बरं. चूप राहणंही तेवढंच गरजेचं आहे.
            प्रभासला अगदी तसंच वाटलं व तसा विचार करीत तो अमेयला म्हणाला,
           "हे बघ, आरक्षण ही काही बुगडी नाही. आरक्षण जर नसतं मिळालं ना, एस सी एसटी जातीला तर आजही ती जात त्याच त्या वेशीबाहेर असती, भीक मागत व उष्ट्या पत्रावळी चाटत. तुला माहीत नसेल त्यांचा इतिहास तर माहीत करुन घे. कधीकाळी त्या समाजाला भीक मागावं लागत होती समाजाला. तरीही समाजातील कोणताच व्यक्ती त्यांना भीक देत नव्हता आणि त्यांना मंदीर प्रवेशही बंद असून गावात त्यांना येता येत नव्हतं. अन् गावातही ती मंडळी जेव्हा यायची. तेव्हा त्यांना घोड्यासारखं किंचाळत यावं लागायचं. कारण होतं त्यांचा स्पर्श. त्यांचा जर स्पर्श झालाच तर तुमच्याच समाजाला घरी जावून आंघोळ करावी लागली. तशी घटना घडू नये. म्हणून ते काळजी घेत. अन् ते यासाठी काळजी घेत की असा जर स्पर्श झालाच तर तुमचा समाज त्यांना वाळीत टाकत असे वा त्यांना जबरदस्त मारहाण करीत असे. त्यातच कधीकधी जीवानिशी मारुनही टाकत असे. आरक्षण आहे म्हणून आज तो समाज पुढं गेला स्वातंत्र्यानंतर. आरक्षण जर नसतं तर आजही आपल्या समाजानं त्यांना तसंच त्यांच्या परिस्थितीवर ठेवलं असतं. माहित आहे, दगड, माती हे देवच आहेत आपल्यासाठी. परंतु आपण त्यांच्याशी जसे वागलो ना. त्यानुसार त्यांनी दगड मातीला देव मानणं सोडलं. त्यांनी विज्ञानाला जवळ केलं. आज तो समाज देवी देवतांना नाव बोटं ठेवतो. त्याचं कारणही तसंच आहे. कारण आहे, आपले तेहतीस कोटी देव. आपल्या तेहतीस कोटी देवानंही कितीतरी पिढ्या न् पिढ्या, त्यांची परिस्थिती सुधरवली नव्हती. तो समाज हवं तर आपल्या संपत्तीचं रक्षण करायचा. आपलं रक्षण करायचा. देवाच्या गाभाऱ्याचंच नाही तर देवाचंही रक्षण करायचा. शत्रुंच्या हालचालीवर लक्ष ठेवायचा. कित्येक परकीय आक्रमणं हाकलून लावायचा. अन् तरीही आपण भेदभावच करीत होतो त्यांचा. त्यांच्याबद्दल आपल्या वागण्यात, विचार करण्यात भेदभावच होता.