******************** ७ ***********************
दगड माती देवच आहेत आपल्यासाठी. याबाबत एक व्हिडिओ आला फेसबुकवर. दगड, माती देवच. तसं पाहिल्यास उच्च शिक्षीत लोकंही आज दगड, मातीच्या देवाची पुजा करु लागले आहेत व हे प्रमाण वाढलेले आहे. ज्यात चमत्कार होतो व लाभ मिळतो. असं प्रभासचं म्हणणं होतं.
'उच्च शिक्षण...... म्हणतात की शिक्षणानं ज्ञान येतं. माणसं सुशिक्षित होतात. परंतु ते सर्व बोलणं वायफळ वाटतं. कारण लोकं कितीही सुशिक्षित झाले असले तरी ते अंधश्रद्धेतच गुरफटलेले असतात. यावरुन शिक्षण कशाला म्हणायचं आणि शिक्षण का बरं घ्यायचं? हा प्रश्न त्याचेसमोर उभा होता. उच्चशिक्षीत अंधश्रद्धा याचा अर्थ देव दगड, मातीत शोधणे. त्याची पुजा करणे व त्यासाठी अवाढव्य स्वरुपाचा खर्च करणे. एक एक मातीचा गणपती हा एक एक लाख रुपयापेक्षाही जास्त किंमतीचा बनत असून दहा दिवस झाल्यावर त्याला नाल्यात कचऱ्यात फेकणे, मांजर आडवी जाणे, कावळा पिंडाला शिवणे, रात्रीला घुबड दिसणे, हात खाजवणे, तीळ अमूक अमूक जागी असलेला पाहणे व त्यातील लाभ पाहणे, देव नवसाला पावतो म्हणत देवासाठी नवश करणे, प्रसंगी कोंबडू, बकरु वा एखाद्यावेळेस नरबळीही देणे. या सर्व अडाणीच नाही तर उच्चशिक्षितांच्या अंधश्रद्धा आहेत. आजही बरेचसे उच्चशिक्षीत लोकं गुप्त धन मिळते, असं मानत व समजत त्या गुप्तधनाच्या पाठीमागे लागलेले असतात. त्यासाठी कितीतरी रुपयाचा खर्च करतात व नरबळीही देतात. असं नेहमी प्रत्ययाला येतं. तशाच बऱ्याचशा अभिनेत्या व अभिनेते हे मांजर आडवी गेल्यावर रस्ता पार करीत नाहीत. काही लोकं तर घराच्या समोर कोहळा कुंकू लावून ठेवतात तर काही लोकं घराच्या दरवाज्यावर लिंबू मिरची वा उलटी बाहुली लटकवून ठेवतात. हेही प्रमाण अशिक्षितच नाही तर उच्चशिक्षीत लोकांच्या घरात दिसते. त्यातच सत्यनारायण, दगडाच्या देवासमोर अगरबत्ती लावणे, हळद कुंकू वाहणे याचंही प्रमाण उच्चशिक्षीत समुदायात दिसतं. काही लोकं याला थोतांड मानतात तर काही तसं करण्याला थोतांड मानत नाहीत. त्याचा लाभ होतो असं मानतात.'
प्रभासला वाटत होतं की अलिकडील काळात शिक्षणाला फार महत्व आलेले आहे व शिक्षणाला वाघिणीचं दूध म्हटलेलं आहे. परंतु आजच्या काळात शिक्षण हे वाघिणीचं दूधच वाटत नाही. कारण जे शिक्षण आपण घेतो, त्यानुसार शिक्षणाचा उद्देश मुळात पटण्यासारखा वाटत नाही.
शिक्षण हे वाघिणीचं दूध न वाटण्याची दोन कारणं होती. पहिलं कारण होतं, शिक्षण शिकूनही माणसाचं गुलामागत वागणं आणि दुसरं कारण म्हणजे उच्च शिक्षण शिकूनही अंधश्रद्धेत गुरफटून राहणं.'
प्रभासला दम लागला. तसा तो थोडा थांबला. त्यानंतर अमेयशी बोलत असतांना पुन्हा म्हणाला,
"आपण नेहमी पाहतो की देव दगडाचा आहे व कितीही उच्च शिकलेले लोकं असतील, तेही देवाची पुजा करतात. कोणत्या देवाची करतात? जो देव मातीचा दगडाचा बनवलेला आहे. त्याची पुजा करतात. त्यात चमत्कार आणतात. त्यांना वाटते की अशा दगडाची पुजा केल्यानं आपल्याला फार मोठा लाभ होतो. लोकं अशा चमत्काराच्या लाभासाठी अशा मुर्तीची पुजा करुन त्या देवासाठी अतोनात खर्च करीत त्याची मनोभावानं सेवा करतात. ज्यात सत्यनारायण हवन पुजन केलं जातं. हे अनाडीच लोकं नाही तर चांगले शिकलेले उच्चशिक्षीत लोकं करतात. हीच अंधश्रद्धा आहे व या अंधश्रद्धेत अगदी लोक वेडे होवून कार्य करीत असतात. परंतु हे धांदात खोटं आहे. कारण मातीचा देव वा दगडाचा देव हा काहीही देत नाही. ते आपल्यालाही माहीत असतं. तरीही आपण त्याची मनोभावाने पुजा करतो. जरी आपण उच्चशिक्षीत असलो तरीही. कारण असते, आपली अंधश्रद्धा. देव पावतो असा असलेला आपला विश्वास. अन् विश्वासावरच सारं जग अवलंबून असतं.
देव...... देवाबद्दल लोकं बरंच काही लिहून जातात. कोणी देव मानतात तर कोणी देवाला मानत नाहीत. कोणी देव एकच आहे म्हणतात तर कोणी देव अनेक आहेत म्हणतात तर कोणी देव नाही असंही म्हणतात. ज्याला भाव म्हणायला हवं. माणसाची जशी भक्ती. तसाच त्याचा भाव. मग देव आहे वा देव नाही वा एक देव आहे अनेक देवं आहेत असे म्हणणे हे त्याच्या भाव आणि भक्तीवर अवलंबून असते. जशी भक्ती तसाच भाव. ज्यात काही लोकं दगडातही देव शोधतात, काही मातीत देव शोधतात, काही काष्ठात देव शोधतात तर काही माणसात देव शोधतात तर काही देव कशातच शोधत नाहीत. ते देवाचे अस्तित्व नाकारतात. अन् आपणही वेळोवेळी पाहतो की काही लोकं देवाची पुजा करीत नाहीत, तेही सुखीच असतात नव्हे तर जे दगड मातीच्या मुर्त देवाची पुजा करीत नाहीत, असेही सुखी भासतातच."
अमेय ते सगळं ऐकत होता. त्यावर तो म्हणाला,
"देव आहे रे. देव जर नसता तर ही सृष्टी तरी चालली असती काय? देव आहे किंवा नाही. हा एका व्यक्तीनं प्रश्न केला होता एकदा. त्यावर त्यावेळेस उत्तर काही सापडलं नाही व उत्तरही देता आलं नाही. देव आहे किंवा नाही, याचा प्रत्यय हा अनुभूतीतून येतो. देव हा आपल्या मानण्यावर आहे. देव आहे असं जर लोकांनी मानलं असतं तर दहा दिवस गणपतीला मानणाऱ्या लोकांनी गणपतीचे विसर्जन करतांना त्याला गटांगळ्या देत देत विसर्जन केलं नसतं. तसंच त्याला कचऱ्यात टाकूनही विसर्जन केलं नसतं. गणपतीच्या मुर्तीचं हळूवारपणे विसर्जन करायला हवं असं मानलं असतं. त्याचं दुखलं खुपलं जाणलं असतं. गणपती हाही एक जीवच आहे असं मानून त्याला हळूवारपणे पाण्यात बुडवून बाहेर काढून त्याला वर्षभर जपलं असतं. परंतु आपण ज्या गणपतीच्या मुर्तीला देव समजून त्याची मनोभावे सेवा करतो, त्याला मार बसो की त्याचे हातपाय तुटो, आपण विसर्जन करतांना जे त्या मुर्तीसोबत करतो. त्यावर विचार केल्यास असं वाटतं की देव नसेल व लोकं सोंग करीत असतील. परंतु खरं सांगायचं झाल्यास देव आहे व तो कोणत्याही मुर्तीत नाही वा दगडात नाही, असं आपण म्हणूच शकत नाही तर तो दगडातही आहे आणि मातीच्या मुर्तीतही आहे. कारण कोणताही दगड वा कोणतीही माती ही आपलं मनोरंजनच करीत नाही तर आपल्याला संकटातून व आजारातूनही वाचवत असते असं म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही.
देवाच्या अस्तित्वाबद्दल अनेक संत महात्म्ये व महापुरुषांनी आपआपले विचार मांडलेले आहेत. संत गाडगे महाराज म्हणतात की देव दगडातही नाही आणि मातीतही नाही. तसंच काही वैज्ञानिक म्हणतात की मी कोणत्याही दगड, मातीला देव मानत नाही, अन् हे मुर्तीचं विसर्जन करतांना पदोपदी जाणवतं. देवाचं जसं अतिशय क्रुरपणे विसर्जन केलं जातं ना, त्यावरुन वाटतं की देव नसेलच. परंतु महत्वाचं सांगायचं झाल्यास देव दगडातही आहे व मातीतही आहे, त्याचं कारण त्याचं मदतीला धावून येणं. आता देव कसा मदतीला धावून येतो? त्याला तुम्ही पाहिलं आहे का? असे आपण वारंवार म्हणतो व मानतो. त्याचं कारण सर्वात प्रथम दगड व माती काय आहे? हे समजून घ्यावं लागेल व तो दगड वा ती माती आपलं कसं पोट भागवतं, तेही समजून घ्यावं लागेल.
दगड म्हणजे काय व माती म्हणजे काय? हे समजून घेतांना शास्त्रीय दृष्टिकोन सांगणे गरजेचे समजतो. दगड याचा अर्थ तो दगड की ज्यावरुन अनवाणी पायानं चालल्यावर आपल्या शरीरातील व्याधी नष्ट होतात. उच्च रक्तदाब, न्युनतम रक्तदाब नियंत्रणात राहतो. कधीच मधूमेह होत नाही. काही दगडं तर असेही आहेत की ज्याला घासून कपाळावर लावल्यास आपले डोके कितीही दुखत असेल तरी ते बसते. याचाच अर्थ दगड हा आपल्या व्याधीच्या दृष्टिकोनातून कामात येतो. दुसरा फायदा म्हणजे हाच दगड आपलं बालपणापासून तर म्हातारे होईपर्यंत मनोरंजनही करतो, कधी टिक्कर बिल्ला खेळतांना तर कधी लगोरी हा खेळ खेळत असतांना. शिवाय तरुण होताच हा दगड आपलं संरक्षण करीत असतो. जसा एखाद्या स्रिला कोणी एखाद्यावेळेस एखादा मारायला आल्यावर तिला त्याचा प्रतिकार दगडांनी केल्यास त्याचे पळून जाणे, हा प्रयोग शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी पावनखिंडीत शत्रूंना अडविण्यासाठी केला होता. तसाच विदर्भात पांढूरणा इथे पोळ्याच्या पाडव्याला मनोरंजन म्हणून दगड मारण्याचा खेळ खेळला जातो. अश्मयुगातही याच दगडानं प्राण्यांची शिकार करुन माणूस आपलं पोट भरीत होता. एवढंच नाही तर पुर्वी आणि आताही हाच दगड आपल्या घरी, पाटा, वरवंटा, खल व मुसळ बनून आपल्या घरची कामं करीत असतो. एवढंच नाही तर आपलं घरही दगडांपासून बनवलं जात. याचाच अर्थ दगड हा आपल्याला संरक्षण देण्याचं काम करीत असून तो आपल्याला ऊन, वारा, पाऊस यापासून वाचवतो. याचाच अर्थ दगड हा आपल्या अतिशय उपयोगाचाच असून तो आपल्यासाठी देवच आहे की नाही. देवच आहे व ते आपल्या मानण्यावर अवलंबून आहे. आपल्याला एक दंतकथा माहीत आहे हिरण्यकक्षपूची. त्यानं खांबाला पाय मारताच त्याला खांबातून श्रीहरी विष्णूचं दर्शन झालं होतं. या दगडाच्या उपयोगावरुन दगडाला देव मानून आपल्या पुर्वजांनी त्याची पुजा करणं सुरु केलं होतं. तसंच मातीबाबतही आहे.
मातीबाबत समजून घेतांना ही माती आपल्याला अन्न, वस्र, निवारा पुरवते. काही लोकांची घरं ही मातीचीच असून माती देखील आपल्याला ऊन, वारा, पाऊस यापासून संरक्षण देते. शिवाय मातीतच आपलं अन्नधान्य पिकतं व आपलं पोट भरतं. मातीचे बनलेले बैल, मुर्त्या केवळ आपलं मनोरंजनच करीत नाहीत तर आपलं पोटंही भागवतात. उदाहरणार्थ एखादी मुर्ती बनवितांना बरेचसे कारागीर काम करीत असून ती मुर्ती बनविण्यातून त्यांना रोजगार उपलब्ध होतात. जसा ती मुर्ती बनविणारा कुंभार, त्या मुर्तीसाठी वस्र बनविणारा शिंपी, मुर्तीसाठी दागीणे बनविणारा सोनार, माती आणणारा चालक, माती ज्यांच्याकडून विकत आणतो तो व्यापारी, तसाच मुर्तीला पेंटींग करणारा पेंटर, अशा विविध व्यवसायीक लोकांचं पोट मुर्ती बनवीत असतांना भागतं. शिवाय मुर्ती बनविल्यानंतर ती जिथे स्थापन केली जाते. तिथं स्टेज बनविणारा बिछायतवाला, महाप्रसाद बनविणारा आचारी व त्याचे मजूर, पुजा करणारे पंडीत, तसेच त्या मुर्तीला हार बनविणारे, ते फुलं ज्या फुलझाडापासून मिळतात, ते पिकविणारे माळी अर्थात शेतकरी, एवढंच नाही तर ती मुर्ती शिरवीत असतांना गुलाल विकणारे व्यापारी, ढोल वाजविणारे, मांग, अन् मुर्ती पाण्यात नेतांना नेणारे नावाडी. इत्यादी सर्वांचे पोट एका मातीच्या मुर्तीच्या माध्यमातून भरत असते. याचाच अर्थ माती ही अतिशय महत्वपुर्ण आहे. तसाच आरोग्याबाबत विचार केल्यास माती ही आरोग्यवर्धिनी आहे. अलिकडील काळात मर्मचिकित्सा आलेली असून माती ही साबणापेक्षाही फार मोठं कार्य करते. माती ही सर्व प्रकारच्या त्वचारोगांवर उत्कृष्टपणे कार्य करते. तशीच माती ही आपलं मनोरंजनही करते. कारण मातीपासून बनविलेले खेळणे आपण वापरतो. याव्यतिरिक्त मातीपासून बनविलेली भांडी आपण अन्न तयार करण्यासाठी वापरतो आणि विवाहसमारंभ असो वा गोपालकाला असो वा श्रद्धाचे कार्यक्रम असो, आपण मातीपासून बनविलेले गाडगे, मडके नेहमी वापरत असतो. महत्वाचं सांगायचं झाल्यास माती ही बहुउपयोगी असल्यानं मातीलाही दगडाप्रमाणे देव मानण्याची प्रथा आपल्या पुर्वजांनी सुरु केली. विशेष म्हणजे माती व दगड हे आपल्या आयुष्यात केवळ मनोरंजनच करीत नाहीत तर ते आपल्या जीवनात बहुमुल्य असून आपले त्यांना देव मानून त्यांची पुजा करणे व त्याचे ऋण चुकविणे हे आपले आद्य कर्तव्य असल्याने आपल्या पुर्वजांनी माती वा दगडाच्या मुर्तीला पुजलं. त्यांना देव मानलं आणि ते गरजेचंही होतं. सुरुवातीला त्यात अंधश्रद्धा वा चमत्कार नसेलच आणि नाही. परंतु ही दोन्ही साधनं उपयोगाची असल्यानं व बऱ्याच लोकांचं त्यापासून पोट भागत असल्यानं आपल्या पुर्वजांना वाटलं की त्यांची येणारी पिढी माती व दगडांचा वापर करणार नाही. म्हणूनच त्यात चमत्कार शिरविला असेल. वाटलं असेल की निदान चमत्काराच्या नावानं तरी आपली येणारी भावी पिढी ही लाभाच्या दृष्टीकोनातून मुर्तीची पुजा अर्चना करेल. म्हणूनच आजची मंडळी ही माती वा दगडाच्या मुर्तीची पुजा अर्चना करतात. महत्वपुर्ण बाब ही की जरी माती व दगडापासून आपलं आरोग्य सुदृढ होत असलं, आपल्याला रोजगार मिळत असला, आपलं मनोरंजन होत असलं, माती आपल्या जीवनात उपयोगात येत असली, तरी माती व दगडात चमत्कार नाही तर तो माती व दगडाचा एक गुणधर्म आहे. परंतु यावरुन माती वा दगडातील देवत्व कमी होत नाही. माती वा दगड हे आपल्या बहुमूल्य उपयोगाचे असल्यानं ते देवच आहेत. मग त्यांची कोणी पुजा करुन त्यांना फुले वाहात असतील, कोणी सत्यनारायण करीत असतील तर त्यात गैर काही नाही. हं, सांगायचं एवढंच की त्या माती वा दगडाच्या मुर्तीसमोर अंधश्रद्धा व चमत्काराच्या नावानं कोणताही मुक्या जीवांचा बळी देवू नये म्हणजे झालं आणि शिवाय जास्त करुन पुजा अर्चनेच्या विनाकारण आहारी जावू नये म्हणजे झालं. मग ते अडाणी असो वा उच्चशिक्षीत का असेना. तसेच मांजर आडवी जाणे, मुंगूस दिसणे, साप दिसणे, स्वप्न पडणे, तीळ असणे, रात्री घुबड दिसणे, कावळा पिंडाला शिवणे या देखील अंधश्रद्धाच असून त्या किमान उच्चशिक्षीतांनी तरी पाळू नये व मांत्रिकांच्या आहारी जावू नये. शिवाय साप वा एखादा जीव चावल्यास मांत्रिकांकडे न जाता डॉक्टरकडे जावे. हे तेवढंच खरं. ज्यातून आपला जीव वाचेल. विशेष सांगायचं झाल्यास देव हा दगड मातीत नाही आहे, असं आपलं म्हणणं चुकीचं असून देव त्यातच आहे. कारण ते घटक निर्जीव असले तरी ते आपल्या सर्वतोपयोगी कामात येतात. मात्र आपण जर सुशिक्षित आहोत तर त्यात चमत्कार घालून त्या उद्देशानं पुजा अर्चना करु नये वा लोकांना आपल्या वास्तवतेच्या विचारानं भ्रमीत करु नये. हे तेवढंच खरं. ज्यातून लोकांचा दगड मातीवरचा विश्वास तुटेल व लोकं दगड, माती स्वरुप कोणत्याच मुर्त्याची पुजा अर्चना न करता उपासानं मरतील. जेणेकरुन लोकांना या वस्तू न बनविल्यानं रोजगार मिळणार नाही."
प्रभासनं अमेयचं सगळं ऐकलं. त्यानंतर तो म्हणाला,
"मी कुठे म्हणतोय की देव नाही. मीही देव मानतोच. परंतु आता आपल्या देव मानण्यानं काय होणार आहे. त्या समाजाला कोण सांगेल आता की देव आहे म्हणून. आपण आपल्याच हातानं एक समाज आपल्यातून तोडला. आता फक्त ती मंडळी आपली मजा पाहते. ती मंडळी हवं तर देवाच्या अस्तित्वावरुन आपली खिल्ली उडवते. म्हणजे काल जो समाज देव मानत होता. आपल्या प्रथा, परंपरा मानत होता. तो समाज आपल्याच वागण्यानं तुटला ना आपल्यापासून. आजही आपल्यातील आपला भेदभाव दूर गेला नाही. आपण त्यांच्याबद्दल आजही वरवर दाखवतो की आपल्यात भेदभाव नाही. परंतु आजही आपल्यात भेदभाव आहे. अन् आजही आपण त्यांच्याशी भेदभावानंच वागतो. आजही त्यांना आपण दूरच लोटवत आहोत. हे आपले वागणे बरोबर नाही. म्हणूनच आजही तो समाज आरक्षणानं पुढं गेला असल्यानं आपल्यापासून दूर राहात आहे. आपल्यात मिसळत नाही तो समाज. तो समाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानतो. त्यांना डोक्यावर घेतो. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधानाची देणगी दिली. लोकशाहीनं वागायला शिकवलं. त्यांनी दिलेल्या संविधानानुसार चालतो. वागतो. नोकऱ्या मिळवतो. आतं आमच्याच समाजाचं पाहा. आमचा समाजही आरक्षण मागू लागला आहे. हे शक्य झालं संविधानामुळं. कारण आमचे नेते असं हक्काचं आरक्षण मागण्यासाठी उपोषणावर बसले आहेत. आंदोलन करीत आहेत. उद्या मिळेलही आम्हाला आरक्षण. जे बाबासाहेबांच्याच कृपेनं असेल. त्यांनीच तशी आंदोलन करण्याची, आपला हक्कं मागण्याची, आपल्या हक्कावर गदा आल्यास त्यावर दाद मागण्याची तरतूद संविधानात करुन ठेवली आहे. जर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहून त्यात तरतूद केली नसती तर आजही देशात राजा असता, राजपद असतं व समाजाला राजपदाच्या म्हणण्यानुसार वागावंच लागलं असतं. आपले हक्कं अबाधित झाले असते. आपल्याला आंदोलन, संप, हरताळ करण्याचा अधिकार राहिला नसता. आपलं आंदोलन दडपल्या गेलं असतं.
आज आपल्याला हक्कं हवेत आपले. आपल्याला लाभ हवा आपला. जो लाभ आपण संविधानातील कलमानुसार मागू शकतो. परंतु बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचा समाज आपल्याला हवाहवासा वाटत नाही. फक्त आपल्याला काम असेल तरच त्यांच्या समाजाला विचारतो आपण. त्यांचा वापर करुन घेतो. काम झालं की फेकतो. अन् आजही आपण ज्या बाबासाहेबांनी आपल्याला संविधान व लोकशाहीची मुल्य दिलीत. त्यांना झिडकारतो नव्हे तर कधीकधी त्यांच्या मुर्तीची विटंबना करतो. त्यांच्या मुर्त्या तोडतो, त्यांच्या मुर्तीचे अवयव तोडतो. कधी त्यांच्या मुर्तीचे हातपाय, बोटं इत्यादी. तेव्हा विसरतोय आपण त्यांनी दिलेलं संविधान आणि त्याअंतर्गत दाद मागायच्या सोईसुविधा.
माहीत आहे अमेय, बाबासाहेबांनी कायद्याबाबतचे अधिकार एकाच व्यक्तीच्या वा व्यक्तीसमुहाच्या हाती ठेवलेले नाहीत. कायदे करण्याचा अधिकार हा कायदेमंडळाला दिलाय. त्याची अंमलबजावणी करण्याचा अधिकार कायदेमंडळाला दिलाय व त्या कायद्याअंतर्गत अधिकारांचे हनन झाल्यास त्यावर दाद देण्याचा अधिकार हा न्यायपालिकेला दिलाय. आता ना कायदेमंडळ शिरजोरी करुन आपल्याला दिलेल्या अधिकाराचं हनन करु शकत. ना न्यायपालिका आपल्याला मिळालेल्या अधिकाराचं हनन करु शकत. ना कार्यकारी मंडळ आपल्यावर आपले अधिकार गाजवू शकत. शिवाय ज्यानं अधिकार गाजविण्याचा साधा जरी प्रयत्न केला असेल, तरी पुरावे सादर केल्यास त्याला तोंडघशी पडावे लागते. हे सगळं बाबासाहेबांमुळंच घडलं. ते जर झाले नसते तर जगात असा कोणताच विद्वान नव्हता की ज्याला अशा प्रकारचं संविधान बनवता आलं असतं. लिहिता आलं असतं. शिवाय तुला माहीत नसेल की आज इतर सर्व देशात म्हणजेच जगातही बाबासाहेबांनीच लिहिलेल्या संविधानाचा स्विकार केलेला आहे. त्यांचंही संविधान हे आपल्यासारखंच लिहिलं जात आहे."
प्रभासचं ते बोलणं. अमेयला ते बोलणं पटलं होतं. कारण तो रास्त बोलून गेला होता. जे शंभर प्रतिशत खरं होतं.