केल नजरेने तुझ्या बरबाद मला
काय आहे जादू तुझ्यात ठाऊक नाही तुला
आवाज पडता कानावर मन जाते हुरळून
येता तु समोर माझ्या वातावरण जाते सुंगधाने दरवळून
वाटे मला जग हे सुंदर सोबत तु असताना
मी सुद्धा पाहिले आहे माझ्या कडे पाहून तुला चोरून हसताना.. 🤭
ज्या भावना आहेत तुझ्यासाठी माझ्या मनात
त्या कळवते लिहून म्हणजे येईल तुझ्या ध्यानात
आपले हे नाते मला मैत्रीपलिकडे जायचे आहे घेऊन
आहे प्रेम तुझ्यावर सांगते हृदयावर हात ठेऊन
वाट पाहीन मी उत्तराची तुझ्या
तुझा हात नक्की देशील तु हाती माझ्या
फाडून टाक ही कविता जर तुझा असेल नकार
पण आहे मला खात्री तु नक्की देशील होकार.. 😌❤