ई-दैनिक- ज्योतिर्मय -०४-०१-२०२६ अंकात प्रकाशित -आले नवं वर्ष आले
*******
सरले वर्ष जुनेरे झाले
नवे वर्ष हे जोशात आले
प्रेरणा देते नवीन वर्ष
नवी उमेद नि नवा हर्ष
संकल्प अधुरे जे राहिले
नव्याने मना ते आठवले
नव्याचे नऊ दिवस जसे
संकल्पांचे हाल होती तसे
नको मनाच्या कलाकलाने
वागावे ठरविल्या प्रमाणे
वेळ गेलेला तो येत नाही
पस्तावून उपयोग नाही
नव्या वर्षात नवा आरंभ
निश्चये करू कार्य प्रारंभ
******
कवी अरुण वि.देशपांडे-पुणे
९८५०१७७३४२