रात्रभर दिवा पेटलेला होता,
आणि खोलीत अंधारच राहिला.
रस्त्याच्या कडेला बसलेला माणूस
पुन्हा पुन्हा आपली पिशवी चाचपतो,
जणू त्यातून
भाकरीचा तुकडा सापडणार आहे.
गल्लीवरून परतणाऱ्या मुलाच्या खिशात
काहीही नाही,
पण त्याच्या डोळ्यांत
गोडाचा उजेड अजूनही शिल्लक आहे.
आपल्या शहरांत
आशेचे हिशोब असेच आहेत—
दिवे पेटलेले असतात
आणि अंधार वाढतच जातो.
By Fazal Abubakkar Esaf