वैकुंठाहून आली,तुळस माऊली...
तुळस माता महापतीव्रता, माझ्या ग दारात!!
टाकते सडा काढते रांगोळी झाडते अंगण..
दारी माझ्या सुंदर शोभे तुळस वृंदावन!!
घालते पाणी लागते चरणी पूर्वजन्माचे हित..
तनमन काया अर्पण केली तुझ्या पायावरत!!
करते जप लागू दे झोप मला आनंदात..
तुळस माता महापतिव्रता माझ्या ग दारात!!
तुझ्या नावाची होती गर्जना इथेचं स्वर्गत..
ब्रम्हा विष्णू आणि शंकर तुला जोडी हात!!
आषाढी वारी भरते भारी पंढरपूरात..
घालून माळा रूप सावळा नाचे साधू संतात!!
तुका म्हणे तुळशी माता उभी तू लग्नात..
लागते लग्न बहू प्रीतीने मोक्ष दारात..!!
तुळसी विवाह च्या खूप खूप शुभेच्छा 🙏🏻🙏🏻