नमस्कार -साहित्य लीला पंढरी- २८-१२ अंकात प्रकाशित कविता
*******
कविता- माझे काहीच नुरले
-----------
एकटेपणा नकोसा
मनही कंटाळलेले
जो तो दंगला स्वतःत
माझे काहीच नुरले ।।
पाहिले तुजला सखे
मन क्षणात भुलले
केले स्वाधीन तुझ्या
माझे काहीच नुरले ।।
नजरेने पाहिले जग
किती अनोखे वाटले
तुझ्यात विरघळलो
माझे काहीच नुरले ।।
हवा हात सोबतीचा
सखे तूच तोही दिला
जग सारे बदलले
माझे काहीच नुरले ।।
---------------------------------
-अरुण वि.देशपांडे-पुणे
९८५०१७७३४२
-----------------------------------