🥭आंबा बर्फी किंवा वडी 🥭
आंब्याच्या दिवसात तीन चार वेळा आंबा वडी होतेच
घरच्या आंब्याचा रस घट्ट व रंग गडद केशरी असल्याने वड्या देखण्या व चविष्ट होतात 😊
कधी आपल्या सोबत घरी आला गेला पाहुणा खाऊन तृप्त होतो
तर कधी आपल्यालाच खायला शिल्लक उरत नाही
इतकी लोक येऊन खाऊन जातात 😀
कधी आप्तेष्टांना आठवणीने डब्यातून पोचवली जाते
या सगळ्या गोष्टीत सुद्धा एक समाधान असते
मात्र यामुळे फोटो काढायची संधी राहून जाते 😀
अखेर ती संधी मिळाली
ही माझ्या पद्धतीची आंबा वडी
🥭साहित्य
एक वाटी आंब्याचा रस
आंबा नसेल तेव्हा पल्प वापरता येतो)
एक वाटी ओले खोबरे
दोन मोठे चमचे चमचे मिल्क पावडर
साखर पाऊण वाटी
एक चमचा तूप
🥭कृती
आंब्याचा रस साखर व खोबरे सर्व एकत्र करून कढईत शिजायला ठेवणे
सतत हलवत राहणे
काही वेळाने गोळा होत आहे असे वाटले की दोन चमचे मिल्क पावडर
व चमचाभर तूप घालून चांगले घोटून घेणे
तूप लावलेल्या थाळीत मिश्रण ओतून
थाळी ठोकून घेणे
गार झाल्यावर आवडीच्या आकारात वड्या पाडणे
सजावट बदामाचे पातळ काप