#नागपंचमी
आजचा खास मेनू
🟨पुरणाची दिंड..
🟨नागपंचमी दिवशी चिरणे, कापणे किसणे, कुटणे, वाटणे, भाजणे, तळणे, या गोष्टी करीत नाहीत
असे पूर्वापार कहाण्या मध्ये सांगितले आहे
फक्त उकडलेले पदार्थ केले जातात आजचा नेवेद्य असाच केला जातो
🟨साहित्य
एक वाटी हरबरा डाळ
एक वाटी गूळ
वेलदोडे जायफळ पावडर
कणिक
मीठ
तूप
🟨कृती
हरभरा डाळ धुवून शिजवून, गूळ समप्रमाणात घालून पुन्हा शिजवली वेलदोडे पूड व जायफळ घालून
पुरण तयार केले
थोडे तूप व मीठ घालून घट्ट कणिक भिजवली
पुरण गार झाल्यावर
कणकिच्या छोट्या गोळ्याची एक पातळ पुरी लाटून
मधोमध पुरण ठेवून चारी बाजूने पाकिटा प्रमाणे बंद करुन घेतले
बागेत हळदीची पाने बहरात आहेत
एका चाळणीत हळदीची पाने घालून ही दिंड वाफवून घेतली
खाताना वरून तूप घालून
सोबत वेलदोडे पुड व केशर घातलेले नारळाचे दूध