🌼तांदुळ पिठीची कापे
🌼साहित्य
एक वाटी तांदुळ पिठी
एक वाटी गूळ
एक वाटी ओला नारळ खोवून
दोन तीन सोललेले वेलदोडे
चिमुटभर मीठ
एक चमचा तूप
बदाम काप अथवा काजु सजावटी साठी
🌼कृती
प्रथम एक वाटी खोवलेल्या नारळात दोन वाटी पाणी घालून मिक्सरमध्ये त्याचे दुध काढून घेणे
या दुधात वाटीभर बारीक केलेला गुळ व दोन तीन वेलदोड्याची पुड घालून
परत एकदा फिरवून घेणे
थाळीला तूप लावुन ठेवणे
🌼एका कढईत तांदळाची पीठी घालून एक चमचा तूपावर खरपुस भाजुन घेणे
पीठ भाजले की त्यात थोडे मीठ घालुन
मिक्सर मधील गुळ घातलेले नारळाचे दुध घालावे
सतत हलवत रहावे
थोडया वेळात मिश्रण कढईच्या कडा सोडू लागेल
व गोळा होऊ लागेल
लगेच खाली काढून तूप लावलेल्या थाळीत थापावे
🌼गार झाल्यावर वड्या पाडून बदाम अथवा काजूने सजवावे
ही कापे थंडगार सुध्दा चवदार लागतात
श्रावण भाद्रपद महिन्यात नेवेद्या साठी गोड काही तरी लागतेच
हा सोपा पर्याय उत्तम आहे
अशीच नाचणीच्या पिठाची पण कापे करता येतात