🟡रवा मसाला इडली
🟡साहित्य
दोन वाट्या रवा
अर्धी वाटी दही
कोथिंबीर
मिरचीचे बारीक तुकडे
कढीलिंब
दोन लहान चमचे उडीद डाळ
काजू तुकडे
हळद
मोहरी हिंग
चिमूटभर सोडा
🟡कृती
रवा मंद आचेवर थोडासा भाजून घ्यावा
गार झाल्यावर अर्धी वाटी दही व लागेल तितके पाणी घालुन
सरसरीत भिजवून ठेवावा
दोन तासानंतर मिश्रण हलवून घेऊन
मोहरी हिंग फोडणी करावी
फोडणीत कढीलिंब, उडीद डाळ, मिरचीचे तुकडे व काजू तुकडा, किंचित हळद घालून
ही फोडणी भिजवलेल्या रव्यावर ओतावी
फोडणी मिश्रणात चांगली मिसळून परत पाच मिनिटे झाकुन ठेवावे
पाच मिनिटानो चवीनुसारं मीठ व चिमूटभर सोडा घालून
मिश्रण चांगले फेटुन घ्यावे
व नेहेमीप्रमाणे इडली करावी
सोबत ओले खोबरे,कोथिंबीर ,पुदिना मिरचीची हिरवी चटणी