Marathi Quote in Blog by Vrishali Gotkhindikar

Blog quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

🫧गव्हाचा चीक ..

गव्हाचा चीक हा अतीशय आवडता पदार्थ आहे..❤️

गव्हाचा चीक खाण्याने आरोग्याला होणारे लाभ
चीकामध्ये भरपूर कॅल्शियम असतं. त्यामुळे हाडे आणि केस यांच्या मजबुतीसाठी तर तो आवश्यकच आहे. याशिवाय कॅल्शियमच्या कमतरतेमुळे थकवा येणे, सतेज न राहणे, नैराश्य न येणे असेही त्रास जाणवतात. हे त्रास कमी करण्यासाठी चीक भरपूर खा.
असे गुगल सांगते...🙂

🫧साधारण पाऊण किलो गहू भिजत घातले
तीन दिवस रोज पाणी बदलून ते भिजत ठेवलें
तिसऱ्या दिवशी थोडे पाणी घालून हे गहू
मिक्सरला वाटून घेतले
आणि मोठ्या गाळणीतून त्याचे सत्व काढून घेतले
🫧एक वाटी गरम पाण्यास
एक वाटी सत्व असे प्रमाण घेऊन
उकळत्या पाण्यात आवडीप्रमाणे मीठ व थोडी खसखस घालून
चीक शिजवून घेतला
गरम पाण्यात हे गव्हाचे सत्व घातले की भराभर हात हलवावा लागतो
नाहीतर चिकात गुठळी व्हायची शक्यता असते
काहीं वेळातच चीक पारदर्शक दिसु लागतो
म्हणजेच तो तयार झाला
चिक मनसोक्त खाल्ला .

🫧यानंतर सत्व काढताना जो चोथा मागे उरतो
त्याचाही चांगला सदुपयोग केला
माझी आजी याच्या वड्या थापून वाळवत असे
आणि नंतर त्या तळून खायला देत असे
ती तिच्या भाषेत याला कोंडवड्या (ती या गव्हाच्या चोथ्याला कोंडा समजत असे म्हणून)म्हणात असे..🙂😄
तिची आठवण काढून मी पण अशा वड्या केल्या
त्यात जिरे ,मीठ, काळे तीळ, चीली फ्लेक्स घालून चांगले मिसळले व हातावर थापून ताटात तीन दिवस वाळवले.
तळुन छान लागत होत्या

🫧हया गव्हाच्या चिकाच्या बदामी हलव्या सारख्या दिसणाऱ्या गोड वड्या पण केल्या
यासाठी एक वाटी पाण्यात अर्धी वाटी साखर घातली
हे पाणी पाव चमचा हळद घालून उकळत ठेवलें
त्यात साधारण दुप्पट गव्हाचा चीक घालून
मिश्रण घट्ट झाल्यावर
एका थाळीला तूप लावुन हे मिश्रण त्यात थापले
गरम असतानाच तुकडे कापुन त्यावर काजु बदाम लावले
व फ्रिज ला सेट केले

🫧गार झाल्यावर वड्या काढून घेतल्या
या वड्या थोड्या चिकट होतात
पण चवीला छान लागतात.
एक दोन दिवस कशातरी टिकतात... अर्थात शिल्लक राहिल्या तरच 😄
असा चिक महोत्सव पार पडला...

Marathi Blog by Vrishali Gotkhindikar : 112023624
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now